देशभरात अनेक चीनी गोष्टींवर निर्बंध घालण्यात येत आहे. आतापर्यंत चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून झाला आहे. पण या टेक्नॉलॉजीच्या काळात चीनने तयार केलेले अनेक अॅप आतापर्यंत बंद करण्यात आले आहेत. या आधी लोकांच्या सर्वात आवडीचा अॅप म्हणून ओळख असलेल्या ‘टिकटॉक’ या अॅपवर बंदी घालण्यात आली आणि आता PUBG या सुप्रसिद्ध खेळावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. आता हा ऑनलाईन गेम तुम्हाला खेळता येणार नाही. हा गेम बॅन करण्यात आल्यानंतर अनेकांना दु:ख झाले. पण या गेमच्या अधिन गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मात्र फारच आनंद झाला आहे. त्यांच्यासाठी PUBG बॅन म्हणजे एकप्रकारची सुटका झाली इतका आनंद आहे. त्यामुळेच की काय यावर अनेक मीम्सचा पाऊस ट्विटरवर होऊ लागला आहे.
गौहर खान लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, व्हिडिओमुळे चर्चेला सुरूवात
दोन दिवसांपूर्वी झाली घोषणा
खरंतरं भारत-चीन बिघडलेल्या संबंधनानंतर अनेक बदल येतील हे माहीत होते. या आधी काही मोठे अॅप भारतातून बंद केल्यानंतर आणखी काही अॅप बंद होणार याची पूर्ण खात्री अनेकांना होती. पण लॉकडाऊनच्या काळात अनेकांना या खेळाने इतके वेड लावले होते की तासनतास किंवा दिवसभर मोबाईल किंवा डेस्कटॉपवर लोक हा खेळ खेळत राहायची. पण सप्टेंबरच्या सुरुवातीलाच याची कुणकुण लागली होती. 2 सप्टेंबर रोजी हा खेळ पूर्णपणे बंद होण्याची घोषणा झाली. सरकारतर्फे याची घोषणा करण्यात आली असून PUBGच नाही तर यासोबत आणखी 118 अॅप अशाच पद्धतीने बंद करण्यात येणार आहे. इतर अॅपबद्दल इतके नाही पण PUBG मुळे समस्त PUBG वासियांना फारच दु:ख झाले आहे हे मात्र नक्की!
आनंदोत्सव
PUBG खेळ बंद होण्याचे दु:ख हा गेम खेळणाऱ्याला जरी असले तरी देखील काही जणांसाठी हा आनंदोत्सव आहे. या खेळाने काहींना इतके वेड लावून ठेवले होते की, तहान भूक विसरुन या खेळामध्ये लोक मश्गुल होत होती. पण हा खेळ बंद झाल्यानंतर या खेळामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीचा सहवास मिळू न शकणाऱ्या लोकांमध्ये मात्र आनंदोत्सव साजरा होत आहे. हा आनंद ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल प्लॅटफॉर्मवर मीम्सच्या माध्यमातून येत आहे. हा खेळ बंद झाल्याचा आनंद इतका वेगवेगळ्या पद्धतीने मीम्सच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे की, अनेकांना या खेळाच्या बंद होण्यापेक्षा मीम्सचा आनंद हा अधिक आहे. त्यामुळेच इतकी क्रिएटीव्हीटी या माध्यमातून बाहेर येत आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात आधार दिलेल्या या ऑनलाईन खेळाला काहींनी तर सलामीही दिली आहे.
आई झाल्यावर या अभिनेत्रींनी केला बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक
Government banned 118 apps including #PUBG
Desi Parents: pic.twitter.com/3JW24dWfCq
— Sudhir Maurya (@_sharif_ladka_) September 2, 2020
Conversations around #PUBG Ban! 🥱 pic.twitter.com/EHNiIfN4Bn
— Danish Sait (@DanishSait) September 3, 2020
MAIN INDIAN GDP HOON..
Do listen till the end!
.
.
.
.#SpeakUpForSSCRaiwayStudents #PUBG #ModiBabuGDPBekabu pic.twitter.com/NHx67arBvi— अर्पित शर्मा (@iArpitSpeaks) September 3, 2020
येईल का नवा गेम
PUBG म्हणजेच (Players Unknown Battleground) नावाचा हा खेळ डेस्कटॉपसाठी 2017मध्ये आला. त्यानंतर त्याचे मोबाईल व्हर्जन हे 2018 साली आले. हा गेम इतक्या झपाट्याने जगभरात पसरला की, या खेळाची प्रसिद्धी अल्पावधीतच वाढली. पण आता हा खेळ बंद झाल्यानंतरच अशाच सारखा कोणता दुसरा गेम येईल का? असा प्रश्न अनेकांना आहे. कारण टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक कंपन्यानी टिकटॉक सारखेच काही अॅप आणले. इन्स्टानेही Reels नावाचे फिचर आणले. आता खेळालाही पर्यायी खेळ येईल अशी आशा अनेकांना आहे.
दरम्यान, ज्या पालकांना, गर्लफ्रेंड्सना या खेळापासून सुटकान मिळाली आहे. त्यांचे अभिनंदन करायला काहीच हरकत नाही.