देशद्रोही म्हणणाऱ्यांवर चिडली राखी सावंत म्हणाली…

देशद्रोही म्हणणाऱ्यांवर चिडली राखी सावंत म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सीपासून दूर असलेली राखी सावंत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती देशद्रोही म्हणून सोशल मीडियावर गाजत आहे. तिला देशद्रोही म्हणत अनेकांनी ट्रोल केले आहे. पण देशात लॉकडाऊन सुरु असताना अचानक राखी सावंतने देशद्रोह करणाऱ्यासारखं केलं तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर राखी सावंतने काही महिन्यांपूर्वी शेअर केलेला एक फोटो वादाचा विषय ठरला आहे. राखी सावंत पाकिस्तानला पाठिंबा देते आणि त्यांच्यासाठी काम करते अशी एक चर्चेची लाट सोशल मीडियावर उठली आहे. पण हे राखी सावंतच्या कानावर गेल्यानंतर ती चिडली आहे तिने तिला देशद्रोही म्हणणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.

ड्रग्ज संदर्भात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट

नेमकं प्रकरण काय?

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती पाकिस्तानच्या झेंड्यासोबत दिसत आहे. तिने हा फोटो साधारण एका वर्षापूर्वी शेअर केला होता. आता या फोटोचा आधार घेत अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.  राखी सावंत ही पाकिस्तानची म्होरकी असून तिचा हा फोटो म्हणजे ती पाकिस्तानला समर्थन करते हे सिद्ध होते. त्यामुळेच तिचा हा जुना फोटो सतत सोशल मीडियावर दिसू लागला आहे. 

चिडली राखी सावंत

राखी सावंत सतत ट्रोल होत असते. पण देशद्रोहाचा आरोप तिच्या चांगलाच वर्मी लागला. तिला ही गोष्ट कळल्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने या फोटोमागील सत्यता सांगितली आहे. ती म्हणाली की, हा फोटो मी केलेल्या एका चित्रपटातील आहे. कलम 370 वर आधारीत या चित्रपटात मी एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी घेतलेला हा फोटो आहे. हा फोटो पाहून जर कोणी मला ट्रोल करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. कारण कोणताही विचार न करता आणि कोणत्याही विषयाची माहिती नसताना तुम्ही मला ट्रोल करत आहात.  आता तुम्हाला खरं कळलं असेल तर असा फाल्तुपणा करणे बंद करा, असे म्हणत तिने तिला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. 

आदित्य चोप्राने 'वायआरएफ 50' बाबत घेतला हा महत्वाचा निर्णय

कंगनावर केले वार

देशात सध्या कोरोना आणि कंगना या दोन प्रकरणाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. कंगना रणौतच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये जणू भूकंप आला आहे. नेपोटिझम, ड्रग्ज माफिया अशा अनेक गोष्टींवर तिने खूप जणांना टार्गेट केले आहे. तिच्या या आरोपांवर राखी सावंतने निशाणा साधला आहे. ती लवकरच कंगनाचा खरेपणा समोर येईल असे म्हणत तिच्यावरही काही आरोप केले आहेत. या व्हिडिओमुळेही राखी सावंत ट्रोल होत आहेत अनेकांनी तिला या प्रकरणात बोलू नकोस असा सज्जड दम दिला आहे.

लग्नाच्या अफवेने आली प्रकाशझोतात

Instagram

प्रकाशझोतात राहणयासाठी ड्रामा क्वीन राखी सावंत काहीही करत असते. मध्यंतरीच्या काळात तिने लग्नाच्या बातमीने सगळ्यांना धक्का दिला. एका NRI बिझनेसमॅनसोबत तिने लग्न केल्याची बातमी सगळ्यांना दिली. तिने तिचे अनेक फोटो शेअर केले पण तिचा नवरा रितेश याचा एकही फोटो तिने आतापर्यंत शेअर केला नाही. त्यामुळे तिने लग्न केले की नुसता ड्रामा असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. 


आता राखी सावंतने उत्तर दिल्यानंतर तिला ट्रोल करणाऱ्यांना योग्य ते उत्तर मिळाले असेल हे नक्की!

हिना खानने शेअर केला बिग बॉस 14 च्या सेटवरचा हा व्हिडिओ