लग्नानंतर राखीला लागले आहेत आई होण्याचे वेध, व्हिडिओ केला शेअर

लग्नानंतर राखीला लागले आहेत आई होण्याचे वेध, व्हिडिओ केला शेअर

राखी सावंतचं नेमकं काय सुरु आहे. काही कळेनासे झाले आहे. तिचे लग्न होऊन महिना उलटत नाही तोच आता राखीला आई होण्याचे वेध लागले आहेत. हो तुम्ही ऐकत आहात ते अगदी खरे आहे राखीला आई होण्याचे खरेच वेध लागले आहेत हे आम्ही नाही स्वत: राखी सावंतच बोलत आहे. तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तिने आई होणार असल्याची बातमी दिली आहे.

अबब! हुबेहूब शाहरुख खान…सोशल मीडियावर या शाहरुखची चर्चा 

नेमकं खरं काय?

आता राखी सावंत आई होणार की नाही… याबाबत सध्या तरी काहीच सांगता येत नाही. कारण तिचा हा व्हिडिओ पाहता हा टिकटॉक असल्याचे  दिसत आहे. कारण या व्हिडिओमध्ये राखी सावंत, ‘ मै माँ बनना चाहती हूँ’ असे म्हणते. त्यावर एक आवाज येतो की, ये कैसे हो सकता है…. त्यावर राखी म्हणजे तुम्हारा फोटो मेरे पास है…. वगैरे वगैरे… आता तर तुम्हाला कळलं असेलचं की, हा सगळा राखी सावंतच्या ड्रामाचाच एक भाग आहे. त्यामुळे राखीने कितीही म्हटले तरी सध्या ती प्रेग्नेंट नाही हे मात्र नक्की आहे. 

राखीचा रितेश कधी देणार दर्शन

Instagram

राखी सावंतने लग्न केल्यापासून ती फारच चर्चेत आहे. तिने NRI रितेशसोबत अगदी गपचूप लग्न केले. तिने फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या लग्नाचा खुलासा झाला. पण सगळ्यांनाच हा एक स्टंट असावा असे वाटले. पण तिनेच सगळ्यांसमोर येऊन तिच्या लग्नाचा खुलासा केला. तिने तिच्या नवऱ्याचे नाव देखील सांगितले. पण त्याच्या नावाव्यतिरिक्त तिने अजून काहीही सांगितले नाही. त्यामुळे आता अनेकांना रितेशच्या दर्शनाची प्रतिक्षा आहे आणि त्याहीपेक्षा रितेश खरा आहे की नाही हे देखील माहीत नाही.

‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’

नवऱ्याला नाही यायचे मीडियासमोर

आता सगळ्यांनाच रितेशला भेटण्याची उत्सुकता आहे खरी पण रितेशलाच मीडियासमोर यायचे नाही. त्याला या कोणत्या गोष्टी नको होत्या म्हणूनच त्याने गपचूप लग्न केले असे राखीने सांगितले. त्यामुळे आता राखीचा रितेश मीडियासमोर येईल की, नाही हे नेमकं कळत नाही.

राखीला हवे मीडिया अटेंशन

Instagram

 राखीचे वागणे नेहमीच मीडियाला आकर्षित करणारे असते.त्यामुळेच तिच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला जात नाही.  त्यामुळेच राखी काहीना काही करतच असते. तिच्या लग्नाची चर्चा ‘राखी का स्वयंवर’ या रिअॅलिटी शो पासून होत आहे. त्या कार्यक्रमात इलेश या NRI सोबत तिचा साखरपुडा झाला होता. पण ते नाते ही फार काळ टिकू शकले नाही. त्याआधी तिचे अभिषेक अवस्तीसोबत अफेअर होते ते काही कारणास्तव तुटले. हल्लीच राखी सावंत आणि दिपक कलाल यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना अचानक तिच्या लग्नाची गोष्ट आली आणि तिही एका NRI सोबत. त्यामुळे सगळ्याच बाबतीच राखी ही मीडिया अटेंशन मिळवत असते. 

आता राखीच्या आई होण्याचा हा व्हिडिओ एक टिकटॉक व्हिडिओ आहे की, आणखी काहीतरी ते पाहावे लागेल. पण सध्या तरी राखीचा हा एक ड्रामा व्हिडिओ नक्की पाहा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.