रकुल प्रीत टॉलीवूडमधील सर्वात लहान, टॅलेंटेड आणि सेक्सी अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाची जादू आता रकुल प्रीतने बॉलीवूडवरदेखील दाखवायला सुरुवात केली आहे. नुकताच तिचा अजय देवगण आणि तब्बूबरोबर ‘दे दे प्यार दे’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला असून रकुल प्रीतच्या अभिनयाची चर्चा आहे. पण आता रकुल प्रीत तिच्या अभिनयासाठी नाही तर तिच्या एका फोटोशूटसाठी चर्चेत आली आहे. आपल्या स्टायलिश, बिनधास्त आणि बोल्ड लुकमुळे रकुल प्रीतवर सध्या तिच्या चाहत्यांचे डोळे खिळले आहेत. रकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सध्या तिचीच चर्चा आहे.
रकुलने सोशल मीडियावर दाखवला ग्लॅमरस अवतार
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रकुलने एक फोटो पोस्ट केला. जो अतिशय हॉट आहे. रकुल प्रीतने नेहमीच आपल्या निरागस चेहऱ्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. याशिवाय रकुल आपल्या कूल स्वभाव आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठीदेखील ओळखली जाते.
हॉट आणि बोल्ड लुक
या फोटोमध्ये रकुलप्रीत खूपच हॉट आणि बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. ग्लॅमर अवतारातील रकुलला या स्टाईलमध्ये पहिल्यांदाच पाहण्यात आलं आहे. रकुलने यावेळी वेलव्हेट ब्लू ब्लाऊजसह डेनिम जीन्स घातली असून तिने या जिन्सचं बटण ओपन ठेवलं आहे. यामध्ये रकुलने केलेला मेकअप अतिशय आकर्षक असून तिच्या चेहऱ्याला हा मेकअप खूपच सूट करत आहे. याशिवाय तिने घातलेला हा सिंपल ड्रेस असला तरीही तिच्या मेकअप आणि तिच्या अॅटिट्यूटमुळे तिचा हा लुक अधिक ग्लॅमरस झाला आहे. तिचा हा अवतार तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.
क्यूट लुक
या फोटोमध्ये रकुल अतिशय क्यूट आणि सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्माईलने तिच्या लुकला अधिक शोभा आणली आहे. ब्लू प्रिंट ड्रेससह घातलेले व्हाईट शूजदेखील रकुलच्या सौंदर्याची शोभा अधिक वाढवत आहे. हेअरस्टाईलबद्दल सांगायचं झाल्यास, तिने या ड्रेसवर पोनीटेल घातला असून तिच्या ड्रेसला परफेक्ट मॅच होत आहे.
रकुलप्रीतचे अनेक चाहते
रकुल प्रीतचे अनेक चाहते आहेत. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे रकुलप्रीतला इन्स्टाग्रामवर 8 मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी रकुल नेहमीच तिचे अप्रतिम फोटो शेअर करत असते. मात्र यावेळी शेअर केलेल्या फोटोने तर चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे.
रकुलचं करिअर
रकुल प्रीतने आपल्या करिअरची सुरुवात ही एक मॉडेल म्हणून केली. चित्रपटांमध्ये रकुलने वर्ष 2009 मध्ये कन्नड़ चित्रपट ‘गिन्नी’ मधून पदार्पण केलं. त्यानंतर तिने बऱ्याच तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं तर बॉलीवूडमध्ये तिने हिमांश कोहलीसह ‘यारिया’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटाने तिला जास्त नाव मिळवून दिलं नसलं तरीही सिद्धार्थ मल्होत्राबरोबरील ‘अय्यारी’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. आता नुकताच अजय देवगणबरोबर तिचा प्रदर्शित झालेला चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाई करत आहे. शिवाय टॉलीवूडमध्ये रकुलने तिचा चांगलाच जम बसवला आहे. निरागस चेहऱ्याची ही अभिनेत्री लवकरच अजून प्रसिद्ध होईल यात नक्कीच चाहत्यांना शंका नाही.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
‘इंदू की जवानी’ची घोषणा होताच वादाला सुरूवात
आयुषमान खुराणा आता देणार संविधानाचे धडे, ‘आर्टिकल 15’ चं धमाकेदार टीझर
अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन