ADVERTISEMENT
home / मनोरंजन
भल्लालदेव राणा दग्गुबतीचे हे फोटो पाहून फॅन्सना बसला धक्का

भल्लालदेव राणा दग्गुबतीचे हे फोटो पाहून फॅन्सना बसला धक्का

Rana Daggubati हे नाव घेतल्यावर डोळ्यांसमोर येतो टॉल डार्क आणि हँडसम असा हिरो. ज्याला बॉलीवूडमध्ये खास भूमिका मिळाल्या नाहीत पण दक्षिणेत तो चांगलाच स्थिरावला आहे. नुकत्याच आलेल्या बाहुबली सीरिजमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता आणि फॅनफोलोइंग मिळालं. पण आता मात्र त्याचे फॅन्स हैराण झाले आहेत. 

भल्लालदेवने शेअर केले हे फोटोज

तेलुगू आणि बॉलीवूड चित्रपटातील कलाकार राणा दुग्गबती सध्या त्याच्या लेटेस्ट फोटोजमुळे चर्चेत आहे. नुकतेच राणाने त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये त्याला ओळखणं कठीण जातंय. पाहा राणाचे हे फोटोज. 

Rana Daggubati चे फोटोज पाहून घाबरले फॅन्स

राणा दग्गुबतीचे हे फोटोज पाहून त्याच्या आरोग्याविषयी त्याचे फॅन्स चिंता व्यक्त करत आहेत. हे फोटोज पाहून आम्हालाही धक्का बसला कारण यामध्ये तो खूपच अशक्त दिसत आहे. त्याची फिजीक पूर्वीसारखी दिसत नसून त्याचं वजनही कमी झाल्यासारखं वाटतंय. हे फोटो पाहताच अनेक फॅन्स विचारत आहेत की, राणाला नेमकं झालंय काय?

ADVERTISEMENT

किडनी ट्रांसप्लांटबाबतची अफवा

राणा दग्गुबतीचे फोटो व्हायरल होताच अशी अफवा आहे की, लवकरच राणा किडनी ट्रांसप्लांट करणार आहे. पण किडनी ट्रांसप्लांटबाबतच्या बातमीवर राणाने लगेच रिएक्ट केलं आहे. एका बातमी संस्थेला त्याने सांगितलं आहे की, त्याने आधीही या प्रकारची अफवा ऐकली होती. पण असं काहीही नसून माझी तब्येत अगदी छान आहे.

हाउसफुल्ल 4 मध्ये दिसणार Rana Daggubati

राणा दग्गुबती चित्रपट हाउसफुल्ल 4 मध्येही दिसणार आहे. अक्षयकुमार स्टारर या चित्रपटात राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट विनोदी असून पुनर्जन्मावर आधारित याचं कथानक आहे. यामध्येही त्याची नकारात्मकच असणार आहे.

भल्लालदेवच्या भूमिकेमुळे झालं नाव

ADVERTISEMENT

राणा दग्गुबतीने बाहुबली चित्रपटांमध्ये भल्लालदेवची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्याचं खूप कौतुक झालं आणि त्याला रातोरात प्रचंड फॅन फोलोइंग मिळालं. या चित्रपटात जेवढं कौतुक बाहुबलीची भूमिका करणाऱ्या प्रभासचं झालं तेवढंच नाव राणाचंही झालं. या सीरिजमधील दोन्ही चित्रपटात राणाची प्रमुख भूमिका होती. 

अजय देवगणच्या चित्रपटातही राणा

एवढंच नाहीतर राणा पुन्हा एकदा बॉलीवूडमधील चित्रपटात दिसणार आहे. राणा लवकरच अजय देवगणच्या आगामी भुज द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत अजून जास्त माहिती समोर आलेली नाही.

आता राणाची तब्येत खरोखर बिघडली आहे की, ही एखाद्या भूमिकेची तयारी आहे. हे येत्या काळात कळेलच. जर हे शारीरिक बदल भूमिकेसाठी असतील तर राणाच्या फॅन्सना नक्कीच आनंद होईल. कारण बरेचदा स्टार्स एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवतात तर कधी घटवतातही. त्यामुळे राणाबाबतही असंच काही असावं अशी आशा करूया. 

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

बाहुबली ३ मध्ये दिसणार Avengers स्टार?

‘रामायण’ येणार मोठ्या पडद्यावर, ऋतिक रोशन- दीपिका पदुकोण दिसणार राम-सीतेच्या भूमिकेत

बाहुबली प्रभास आणि अनुष्काच्या नात्याबाबत नवा खुलासा

ADVERTISEMENT
04 Oct 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT