‘रामायण’ येणार मोठ्या पडद्यावर, ऋतिक रोशन- दीपिका पदुकोण दिसणार राम-सीतेच्या भूमिकेत

‘रामायण’ येणार मोठ्या पडद्यावर, ऋतिक रोशन- दीपिका पदुकोण दिसणार राम-सीतेच्या भूमिकेत

बॉलीवूडमध्ये सध्या नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. त्यामुळे या काळात एकापेक्षा एक एक्शन, कॉमेडी, रोमँटीक, बायोग्राफी आणि सोशल इश्यूवर बेस्ड चित्रपट बनत आहेत. यामध्ये अजून एक नाव सामील होणार आहे दिग्दर्शक नितेश तिवारीचा ‘रामायण’ हा चित्रपट. या चित्रपटाचं नाव आणि स्टारकास्ट वाचून तुमची उत्सुकताही नक्कीच वाढली असेल ना. जाणून घ्या या चित्रपटाबाबतच्या इंटरेस्टींग गोष्टी.

चर्चा रामायण चित्रपटातील कलाकारांची

बॉलीवूड चित्रपट ‘रामायण’ (Ramayana) हा हिंदू धर्मग्रंथावर आधारित आहे. हा चित्रपट नक्कीच बॉलीवूडच्या इतिहासात खास ठरेल असं वाटतंय. याच प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटाचं हटके कास्टींग आहे. बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) या चित्रपटात भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर राणी पद्मावती आणि मस्तानीच्या भूमिकेत झळकलेली दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी बऱ्याच काळापासून फॅन्स उत्सुक होते. अखेरही जोडी या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र झळकेल. त्यामुळे फॅन्सची इच्छापूर्ती होणार आहे.

बाहुबलीसुद्धा झळकणार प्रोजेक्टमध्ये

‘बाहुबली’ (Bahubali) म्हणजेच दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आता फक्त दक्षिणेपुरता मर्यादित राहिला नाही. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर देश-विदेशात प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. सूत्रानुसार, प्रभासलाही या चित्रपटासाठी विचारण्यात आलं आहे. तसंच या चित्रपटात प्रभास रामायणातील खलनायक आणि सर्वज्ञाता रावणाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. जर ही बातमी खरी ठरली तर मनोरंजन विश्वातील दोन सुपरस्टार ऋतिक आणि प्रभास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहणं खूपच औत्सुक्याचं ठरेल.

हा चित्रपटही येणार सीरिजमध्ये

दिग्दर्शक नितेश तिवारीचा हा चित्रपट ‘रामायण’, त्याच्यासाठी बहुप्रतीक्षित आणि महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट आहे. ‘छिछोरे’ आणि ‘दंगल’ सारखे हिट दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या चित्रपटानंतर खूपच अपेक्षा आहेत. आत्तापर्यंत येत असलेल्या बातम्यांनुसार, ‘रामायण’ हा चित्रपट तीन भागांमध्ये म्हणजेच सीरिजमध्ये येईल. हे तिन्ही चित्रपट थोड्या दिवसांच्या फरकाने रिलीज केले जातील. ब्रम्हास्त्रनंतर सीरिजमध्ये येणारा हा दुसरा चित्रपट असेल. या चित्रपटाचं बजेट तब्बल 600 कोटी रूपये किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. नितेश तिवारीने हेही स्पष्ट केलं आहे की, हिंदूंच्या या पवित्र महाकाव्याबाबत कोणतीही छेडछाड करण्यात येणार नाही.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.