रणबीरने सर्वांसमोर दिली आलियाला प्रेमाची कबुली

रणबीरने सर्वांसमोर दिली आलियाला प्रेमाची कबुली

गेल्या काही महिन्यांपासून आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. आलिया नेहमीच रणबीरबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी दिसते. नुकतीच आलिया आणि रणबीर एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र दिसले. इतकंच नाही तर रणबीरने सर्वांसमोर आलियाला प्रेमाची कबुली दिल्याचा व्हिडिओदेखील सध्या व्हायरल होतो. आहे. या कार्यक्रमात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, आलिया भट आणि रणबीर कपूर अशी चौकडी दिसली. दीपिका ही रणबीरची पूर्वी गर्लफ्रेंड होती. पण ब्रेकअप झाल्यानंतरही त्या दोघांनी आपली मैत्री चांगली ठेवली. त्यामुळे नेहमीच प्रेक्षकांनाही त्यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं. पण ही चौकडी गेल्यावर्षीपासून बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसली आहे. या पुरस्कार सोहळ्यातदेखील या चौकडीने धमाल केली. अगदी सुरुवातीच्या रेड कार्पेटपासून ते अगदी शेवटपर्यंत ही चौकडी एकत्र होती.

रणबीरने जाहीर केले आलियासाठी प्रेम

याच पुरस्कार सोहळ्यामध्ये एका क्षणी रणबीर कपूरने आलिया भटसाठी आपलं प्रेम जाहीर केलं. इश्कवाला लव्ह या गाण्यावर या दोघांनी रोमँटिक डान्स करत सर्वांसमोर आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम एकरित्या जाहीर केलं आहे. अर्थात हा सोहळ्याचा एक भाग असला तरीही आतापर्यंत रणबीरने असं कोणत्याही गर्लफ्रेंडसाठी केलेलं पाहण्यात आलेलं नाही. रणबीरने आलियाबद्दल आपल्या भावना अगदी पहिल्या दिवसापासून जाहीर केल्या आहेत. आलिया आणि रणबीर बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसतात. इतकंच नाही त्यांचं कुटुंबही बऱ्याच वेळा एकत्र दिसून येतं. रणबीर आणि आलियाची आई दोघीही खूप वेळा एकमेकांना भेटत असतात. इतकंच नाही ऋषी कपूर लवकरच भारतात परत येणार असून या दोघांचं लग्न बघण्याची त्यांना इच्छा असल्याची बातमीदेखील काही दिवसांपूर्वीच आली होती. आता हे असं बघून लवकरच हे दोघंही बोहल्यावर चढतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.


आलिया आणि दीपिकाची अप्रतिम केमिस्ट्री
 

 

 


View this post on Instagram


 

 

#aliabhatt #deepikapadukone 😋


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
या पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलीवूडमधील कलाकार आले होते. पण या सगळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते आलिया आणि दीपिकाच्या अप्रतिम केमिस्ट्रीने. रेड कार्पेटवर दोघीही खूप मस्ती करत होत्या. दोघींचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. आलिया आणि दीपिकाने अगदी एकमेकींना गालावर किसदेखील केलं. असं नेहमी म्हटलं जातं की, दोन यशस्वी महिला कधीही एकमेकींच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. पण आलिया आणि दीपिकाने हे नेहमीच चुकीचं ठरवलं आहे. दोघीही नेहमी एकत्र येतात आणि मजा करताना दिसतात. इतकंच नाही तर दोघीही एकमेकाच्या कामाबद्दलही चांगलं बोलताना नेहमीच दिसतात. या पुरस्कार सोहळ्यात या दोघी कायम एकत्र होत्या. सर्वात शेवटी जेव्हा ‘उत्कृष्ट अभिनेता’ म्हणून रणवीर सिंहचं नाव घेण्यात आलं तेव्हा रणवीर सर्वात पहिले दीपिकाला किस करून नंतर रणबीरला भेटून आणि आलियाची गळाभेट घेऊनच पुरस्कार घ्यायला स्टेजवर गेला. हा व्हिडिओदेखील व्हायरल होत असून या चौकडीची चांगलीच मैत्री असल्याचंही दिसून येत आहे.


फोटो सौजन्य - Instagram, Viral Bhayani, Manav manglani


हेदेखील वाचा - 


'या' रंगांच्या सणाला अशी घ्या मुलांची काळजी


जेव्हा दीपिका एक्स बॉयफ्रेंड रणबीरला करते सगळ्यांसमोर किस


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट