‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट

‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट

आलिया भट सध्या आपल्या खासगी आणि व्यावसायिक दोन्ही गोष्टींसाठी चर्चेत आहे. आलियाच्या व्यावसायिक बाजूबद्दल सांगायचं तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजला असून बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. यामध्ये रणवीर सिंगच्या बरोबरीने आलियाने काम केलं असून सगळ्यांकडूनच तिच्या कामाची वाहवाह होते आहे. तर दुसऱ्या बाजूला आलियाच्या खासगी आयुष्यातदेखील रणबीर कपूरचं नाव जोडलं गेल्यामुळे तिच्याबद्दल चर्चा आहे. आलिया आणि रणबीर यावर्षी ‘ब्रम्रास्त्र’ या अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अगदी पहिल्या दिवसापासून ही जोडी चर्चेत आहे.


ranbir aalia


आलियाचा खुलासा


पण आता खरी चर्चा रंगली आहे ती आलियाच्या लग्नाबद्दल. पण आलियाने याबाबतीत एक मोठा खुलासा करत आपलं लग्न झालं असल्याचं म्हटलं आहे. घाबरलात? घाबरून नका जाऊ आम्ही तुम्हाला पूर्ण बातमी सांगणारच आहोत. आलियाने असं म्हटलंय त्याचं कारण वेगळं आहे. सध्या तिच्या आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना ऊत आला आहे. पण आलियाने आपलं लग्न आपल्या कामाबरोबर सध्या झालं असल्याचं म्हटलं आहे. पडला ना जीव भांड्यात?  खरं तर आलिया सध्या अनेक चित्रीकरणांमध्ये व्यग्र आहे. तिला अजिबात वेळ नाही आणि त्यामुळेच आपलं कामाबरोबर लग्न लागलं असल्याचं आलियाने म्हटलं आहे. ती सध्या रणबीरबरोबर डेट करत असली तरीही लग्नाचा कोणताही विचार इतक्यात नसल्याचंही तिने सांगितलं आहे.


alia ranbri ayan %281%29


आलियाने स्पष्ट केलं रणबीरबरोबरचं नातं


नुकतीच बातमी आली होती की, रणबीर आणि आलियामध्ये सध्या भांडण चालू आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया एकमेकांशी भांडताना दिसत होते. हा व्हिडिओ गली बॉयच्या स्क्रिनिंगच्या वेळचा असून यावेळी रणबीर आणि आलिया एकत्र या स्क्रिनिंगला आले होते त्यावेळचा आहे. पण आलियाने या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. रणबीर आणि आपल्यातील सर्व गोष्टी व्यवस्थित असल्याचं आलियाने स्पष्ट केलंय. त्यानंतर या दोघांनी आपल्या आवडत्या शेफबरोबर व्हॅलेंटाईनदेखील साजरा केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्या व्हिडिओमध्ये प्रमोशनमुळे अतिशय थकली असल्याचं आणि त्रास झाल्यामुळे अशी दिसत असल्याचं आलियानं सांगितलं आहे. शिवाय अतिशय थकल्यामुळे चिडचिड झाली असल्याचंही तिने म्हटलं आहे.


alia ranbir ayan 1


अजून लग्नाबद्दल विचार करण्यासाठी लहान - आलिया


रणबीरबरोबर लवकरच आलिया लग्नाच्या बंधनात अडकणार अशा बातम्या गेले बरेच दिवस आहेत. यावर आलियाने सांगितलं की, लग्नाबद्दल विचार करण्यासाठी अजून ती फारच लहान आहे. तिला जेव्हा रणबीरबरोबर लग्न करायचं असेल तेव्हा ती स्वतः याबाबत स्पष्ट सांगेल असंही तिने म्हटलं आहे. सध्या मात्र आपलं लग्न हे आपल्या कामाबरोबरच लागलं असल्याचंही तिने सांगितलं आहे. आलियाने सध्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’ या चित्रपटाचं चित्रीकरण संपवलं आहे. शिवाय तिच्याकडे अजूनही बरेच चांगले प्रोजेक्ट आहेत. शिवाय रणबीरलादेखील त्याच्या संजू चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून आता त्याच्याकडे अनेक भूमिका येत आहेत. त्यामुळे आता आलिया आणि रणबीर कधी लग्न करणार आहेत याकडेच त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


प्रेमाचा निखळ अनुभव सांगणारं ‘अजुन अजुन’ गाणं


अभिनेत्री मिनिषा लांबाचं हॉट बिकिनी शूट


जितेंद्र आणि जयाप्रदा 24 वर्षांनी पुन्हा एकत्र