बॉलिवूडमध्ये नेमकं सुरु तरी काय आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच हळुहळू पडू लागला आहे. कोरोना काळ सुरु झाल्यापासून बॉलिवूडला जणू ग्रहणच लागले आहे. आता आणखी एका बातमीने सगळ्यांना चिंतेत टाकले आहे. हरहुन्नरी कलाकार रणदीप हुड्डा एका मोठ्या सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याचे कळत आहे. रणदीपच्या जवळच्या व्यक्तिनींच ही माहिती मीडियापर्यंत पोहोचवली असून रणदीपला नेमके काय झाले आहे? आणि कोणत्या कारणासाठी त्याला अॅडमिट करावे लागले याचा खुलासा अद्याप करण्यात आला नाही. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्याला अॅडमिट करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचेदेखील कळत आहे.
गरजू विद्यार्थ्यांना सोनु सूदचा मदतीचा हात,ऑनलाईन शिक्षणासाठी वाटले स्मार्टफोन
रणदीप हुड्डाची प्रकृती स्थिर
रणदीप हुड्डा ब्रीचकँडी हॉस्पिटलच्या बाहेर बुधवारी दिसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. तो त्याच्या वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये आला होता. त्यामुळे अनेकांच्या नजरा तिथेच रोखू राहिल्या. रणदीप कोणत्यातरी मोठ्या सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणार आहे हे आधीच अनेकांना माहीत होते. पण सर्जरीचे नेमके कारण काय ते माहीत नसल्यामुळे अनेकांना तो नेमकी कोणती सर्जरी करत आहे? आणि त्याला सर्जरीची गरज काय असे प्रश्न अनेकांना पडले होते. पण रणदीपला ही माहिती मीडियाला द्यायची नव्हती. त्यामुळे त्याने ऑपरेशन कोणते या संदर्भात काहीही सांगितले नाही. मीडियाकडून कोणतीही चुकीची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून त्याने हा संवाद टाळायचे ठरवले. रणदीपचे वडील स्वत:च पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांनीही कोणतीही माहिती देणे टाळले. पण त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला मंगळवारी रात्री फार दुखापत होत होती. म्हणूनच हॉस्पिटलमध्ये आणून तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागिन’फेम अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा, व्हिडिओ व्हायरल
हॉस्पिटलने पाळली गुप्तता
रणदीपच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलने गुप्तता पाळली असली तरी देखील त्यांनी ज्या पद्धतीने सेलिब्रिटींची माहिती देण्यात येते. ती माहिती दिलेली आहे. पण त्यामध्ये सर्जरी कोणत्या कारणासाठी झाली याचा उल्लेख अजिबात केलेला नाही. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीत सगळ्या नियमांचे पालन करत रणदीपची कोरोना टेस्ट करण्यात आली. ती निगेटीव्ह आली म्हणून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रणदीप आता बरा असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
नुकताच केला 44 वा वाढदिवस साजरा
अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलेल्या रणदीपने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘साहेब,बिबी और गँगस्टर’, ‘लाल रंग’, ‘सरबजीत’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘जिस्म’, ‘किक’, ‘हायवे’, ‘एक्सट्रॅक्शन’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. 20 ऑगस्ट रोजी त्याने आपला 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. एक्सट्रॅक्शन या चित्रपटाच्या यशानंतर त्याचा अधिकच बोलबाला झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे खूपच कौतुक होत आहे.
त्याच्या या यशस्वी सर्जरीनंतर तो लवकर बरा होवो अशी त्याच्या फॅन्सची आणि आमचीही इच्छा आहे.
करीना कपूरमुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानची येणार ऑटोबायोग्राफी