‘तान्हाजी' चित्रपटाचा पावरपॅक ट्रेलर 2 पाहिल्यानंतर वाढेल उत्सुकता

‘तान्हाजी' चित्रपटाचा पावरपॅक ट्रेलर 2 पाहिल्यानंतर वाढेल उत्सुकता

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाने सगळ्यांची उत्सुकता वाढवलेली आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट सुपरडुपर हिट असणार असे भाकीत आधीच वर्तवले आहे. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही सोमवारी रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर एका चित्रपट एक पाऊल पुढे आहे असेच जाणवले. तुम्ही हा ट्रेलर पाहिला नसेल तर तो आताच पाहा आणि चित्रपटासाठी तिकीट बुक करा कारण नव्या वर्षाची तुमची सुरुवात एकदम चांगली होणार आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी अटकेत...नेहरु परिवारावर टीका केल्यामुळे अडचणीत

या कारणामुळे ट्रेलर आहे हिट

चित्रपटाचा ट्रेलर दमदार असेल तर तो चित्रपट चालणार अशी खात्री  निर्मात्यांना सुद्धा असते. आता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ चित्रपट चर्चेत असताना त्याचा हा दुसरा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांना तो पाहावासा वाटणार नाही असे अजिबात होणार नाही. ट्रेलरच्या जमेच्या बाजू काय आहेत ते देखील जाणून घेऊया 

  1. संजय मिश्रा यांच्या आवाजातील या ट्रेलरचे नरेशन लगेचच लक्ष वेधून घेते.
  2.  दुसरा ट्रेलर थोडा अधिक माहिती देणारा आहे. यामध्ये सैफ अली खानने साकारलेली भूमिका अधिक उठून दिसत आहे. त्याचा अभिनय पाहता चीड येणं स्वाभाविक आहे कारण त्याचा दमदार अभिनय होता. 
  3.  4 फेब्रुवारी1760 हा दिवस मराठ्यांसाठी फारच महत्वाचा होता. ती लढाई कमीत कमी वेळात दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे. 
  4. चित्रपटातील अभिनेत्रींनाही यामध्ये दाखवण्यात आले आहे. त्यांचेही संवाद यामध्ये आहे. 
  5. चित्रपटातील डायलॉग उत्तम असणार याचा अंदाज या ट्रेलरमधूनच येत आहे. 

चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेकांच्या रिअॅक्शन

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या चित्रपटाचे दोन्ही ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट आवडणार याची खात्री दिली आहे. त्यामुळेच याची चर्चा अधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील सर्वच पात्र अगदी योग्य पद्धतीने निवडण्यात आल्याचे देखील अनेकांचे मत आहे. त्यामुळे सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर सध्या तान्हाजीची चर्चा आहे.

बनारसमध्ये दिसलं या अभिनेत्रीचं भक्तीमय रूप

आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे…

आता तुम्ही तुमच्या इतिहासाचा अभ्यास नीट केला असेल तर तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न असताना अचानक मुघलांनी केलेल्या हल्ल्याला परतवून लावण्याचे तानाजी मालुसरे यांनी निश्चित केले. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत त्यांनी हा मुघलांवर आताच्या भाषेत सर्जिकल स्ट्राईक केले होते. तानाजी मालुसरे यांच्याबाबत अगदी थोडक्यात माहिती झाली तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि धनिष्ठ मित्र होते. किल्ले सर करण्यावेळी शिवाजी महाराजांसोबत कायम तान्हाजी मालुसरे होते. 


आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट पाहण्याची तुमची उत्सुकताही नक्कीच वाढली असेल. या चित्रपटाचा मराठी ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.