‘साजणा'ने गाठली शंभरी, मालिकेचं यश आणि पूजाच्या वाढदिवसानिमित्त केलं सेलिब्रेशन

‘साजणा'ने गाठली शंभरी, मालिकेचं यश आणि पूजाच्या वाढदिवसानिमित्त केलं सेलिब्रेशन

एखादी मालिका लोकप्रिय होणं आणि त्या मालिकेचे 100 भाग पूर्ण होणे, हा यशाचा पहिला आणि मोठा टप्पा मानला जातो. त्यामुळे जेव्हा एखादी टेलिव्हिजन मालिका हा टप्पा गाठते जेव्हा ते यश मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. मराठी वाहिनीवरील 'साजणा' या मालिकेने यशाचा हा पहिला टप्पा नुकताच गाठला आहे. एक साधी आणि निस्वार्थी प्रेमकहाणी असलेली ही रमा आणि प्रताप यांची कथा, आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या एका वेगळ्या उंचीवर पोचली आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिका असलेला अभिजित श्वेतचंद्र आणि पूजा बिरारी यांचा अभिनय, खेडेगावातील संस्कृती आणि तिथली आधुनिकता यांचा सुंदर मिलाप या मालिकेतून प्रेक्षकांना आवडत आहे.ज्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यात ही मालिका यशस्वी ठरत आहे. 

साजणाच्या टीमने असं साजरं यशाचं केलं सेलिब्रेशन

मालिकेचं यश हे त्या मालिकेच्या टीमने केलेल्या मेहनतीवर अवलंबून असतं. मालिकेतील कलाकार आणि प्रॉडक्शन टीम यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतात. त्यामुळे या यशाचे खरे वाटेकरी असतात ते मालिकेतील कलाकार, कॅमरामन, प्रॉडक्शन टीम, निर्माते, दिग्दर्शक. नुकतच साजणाच्या टीमने साजरं केलं त्यांच्या मालिकेच्या 100 व्या भागाचं सेलिब्रेशन. यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत केक कापून हा क्षण साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सदस्याने एकमेकांचे अभिनंदन केलं. या यशात सर्वच घटकांचा मोठा वाटा आहे. ज्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांना टेलिव्हिजनसमोर खिळवून ठेवणं सहज शक्य झालं आहे. मालिकेच्या सेटवर या यशाचा आनंद द्विगुणित झाला ते म्हणजे या मालिकेतील प्रमुख पात्र असलेल्या अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या वाढदिवसामुळे.विशेष म्हणजे तिच्यासाठी ही वाढदिवसाची अनोखी भेटच होती. या निमित्ताने पूजाला सरप्राईझ देण्यासाठी प्रॉडक्शन टीमने तिच्या आई-वडिलांना सुद्धा सेटवर बोलावलं होतं. या मालिकेतील कलाकारांकडून पूजाला मिळत असलेलं कुटुंबाचं प्रेम बघून, तिचे वडीलदेखील भारावून गेले.

साजणाची रमा

साजणा मालिकेत पूजा रमाची भूमिका साकारत आहे. रमा ही एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे पुरेसं शिक्षण न घेऊ शकलेली पण तरिही स्वाभिमानी तरूणी आहे. शिक्षण नसलं तरी रमाकडे एक प्रकारचा बेडधकपणा आहे. तिची स्वप्नं इतरांपेक्षा वेगळी आणि मोठी आहेत. शिवाय आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी  तिची प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आहे. तिचं प्रेम एका श्रीमंत घरातील राजबिंड्या मुलावर जडलं आहे. प्रेमाचे हे विविध रंग दाखवणारी ही मालिका सध्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रमाप्रमाणेच पूजालादेखील स्वतः आनंदी राहायला आणि इतरांना आनंदी ठेवायला आवडतं.

पूजाने व्यक्त केल्या भावना

मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना पूजाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या

"साजणा मालिकेने शंभर भागांचा टप्पा गाठला यात प्रेक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीपासूनच त्यांचं प्रेम आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्य आहे. पडद्यामागचे कलाकार हे नेहमीच अशा यशात फार मोठा वाटा उचलत असतात. त्यामुळे आनंद साजरा करत असतांना, त्यांना यात सहभागी करून घेणं, ही त्यांच्या कामाला मिळणारी खरी पोचपावती असते. मालिकेच्या यशाचा पहिला टप्पा साजरा केला जात असतांना, माझा वाढदिवस सुद्धा सेटवर साजरा झाला असल्याने, हा दिवस आणखी आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरणार आहे."शिवाय मालिकेचं हे यश साजरं करताना प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाबद्दल आणि प्रेमाबद्दल सर्वच कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली. या मालिकेला भविष्यात असेच यश मिळो हीच चाहत्यांकडून सदिच्छा व्यक्त केली जात आहे. 

 

अधिक वाचा

जाने त्रास सहन केला मात्र 'चेहरा' लपवला नाही…

भुलभुलैय्या 2 : कार्तिक आर्यनचा पहिला लुक आला समोर

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’