'दबंग' सलमानचा हळवेपणा पुन्हा दिसला, पूरग्रस्त गाव घेतले दत्तक

'दबंग' सलमानचा हळवेपणा पुन्हा दिसला, पूरग्रस्त गाव घेतले दत्तक

बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत जे सढळ हाताने गरजू लोकांना मदत करत असतात आणि त्याचा गवगवादेखील करत नाही. यामध्ये सर्वात वर अक्षय कुमार आणि सलमान खान या दोन्ही स्टार्सचे नाव पुढे  आहे. आपल्या चित्रपटातून मिळालेली कमाई हे दोन्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी वापरतात. तसंच अनेक सोशल वर्क करण्यात हे दोन्ही कलाकार कधीही मागे हटत नाहीत. केवळ दानधर्म नाही तर गरजवंतांसाठी यांची संस्थाही आहे. सलमान खानने खास यासाठी ‘Being Human’ ही संस्था स्थापन केली आहे. सलमानच्या  मदतीचे प्रत्यंतर सतत दिसून येत असतं. आता पुन्हा एकदा केलेल्या मदतीमुळे सलमान चर्चेत आला आहे. 

शेरदिल सलमान

सलमानचे  लाखो करोडो चाहते आहेत. त्याची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते तासनतास त्याच्या घराखाली उभे राहातात. सलमान खानच्या बाबतीत अनेक कॉन्ट्रॉव्हर्सी होऊनही सलमानच्या फॅन फॉलोईंगमध्ये कधीही कमी झाली नाही. सलमान जितका रागीट समजला जातो तितकाच तो चांगली कामं करण्यातही पुढे असतो. रूपये, आसरा या सगळ्या माध्यमातून तो गरजवंतांना मदत करत असतो. नुकताचा त्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. सलमान खानने एक पूरग्रस्त गाव दत्तक घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये पावसाने मागच्या वर्षी थैमान घातले होते. अजूनही कोल्हापूरातील बरीच गावे सावरलेली नाहीत. त्यापैकीच एक गाव म्हणजे खिदरापूर (Khidrarpur). इथल्या लोकांना अजूनही मदतीची गरज आहे. त्यांना मदत पुरवण्याची जबाबदारी ही सलमान खानने उचलली आहे. कोल्हापूरमधील अनेक गावे यावेळी उद्धस्त झाली होती. त्यांना मदत करण्यासाठी अनेक लोकही पुढे आले होते. तरीही अजून  या लोकांना मदतीची गरज आहे याची माहिती मिळाल्यानंतर सलमानने या गावातील लोकांना मदत करण्याचे ठरवले आहे. 

फुकरे'फेम जोडी लवकरच अडकणार लग्नबंधनात, समुद्रकिनाऱ्यावर करणार लग्न

फाऊंडेशनमधून करणार मदत

सलमान खानला या गावाबद्दल कळल्यानंतर त्याने हे गाव दत्तक घ्यायचे ठरवले असून आपल्या फाऊंडेशनमधून सलमान खान या गावातील लोकांची जबाबदारी उचलून मदत  करणार आहे. सलमान खानने सोशल मीडियाद्वारे पूरग्रस्त व्यक्तींबद्दल आपल्याही भावनाही व्यक्त केल्या होत्या. प्रत्येक माणसासाठी निवारा ही मुख्य गरज असल्याचे सलमानचेही मत आहे. त्यामुळे या पुरामध्ये  ज्या व्यक्तींची घरे उद्धस्त झाली आहेत त्यांना मदत करण्याचे सलमानने ठरवले आहे. ऐलान फाऊंडेशनचे संचालक रवि कपूरनेही याबाबत आनंद व्यक्त केला असून सलमान मदत करणार असल्याचे कळल्यानंतर त्यांना उत्साह आला आहे.  सलमान इंडस्ट्रीतील लोकांनाही मदत करत असतो. 

बिग बॉस फेम असीम रियाजने खास व्यक्तीला दिली खास भेट

मदतीसाठी नेहमीच सलमान पुढे

View this post on Instagram

25 years and still Being strong . . @beingshera

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

इंडस्ट्रीमधील नव्या आणि जुन्या सर्वच लोकांचं म्हणणं आहे की, सलमान खान मदतीसाठी नेहमीच पुढे असतो. कोणालाही आपल्या चित्रपटासाठी आर्थिक मदत हवी असो अथवा इंडस्ट्रीमध्ये कोणाला लाँच करायचं असेल सलमान खान सर्वांचीच मदत करतो. प्रीत झिंटाची आर्थिक मदत असो अथवा दिया मिर्झाच्या आईसाठी लागणारी मदत असो, आपल्या मित्रांच्या  मुलांना इंडस्ट्रीमध्ये लाँच करणं असो जमेल त्या प्रत्येक गोष्टीत सलमान सर्वांना मदत करत असतो. तो मदतीसाठी नेहमीच पुढे असतो असंही त्याच्या बाबतीत सांगितलं जातं. इतकंच नाही तर त्याच्याबरोबर काम करणारे त्याचे गार्ड्स, सेट बाईज आणि त्याचे सर्व मदतनीसही त्याच्या मोठ्या मनाचे किस्से नेहमीच ऐकवत असतात असंही म्हटलं जातं. 

नेहा कक्करविषयी आदित्यच्या मनात आहेत या भावना, आदित्य म्हणाला...

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.