मुलांचं यश पालकांसाठी नेहमीच अभिमानास्पद असतं. ते पालक सर्व सामान्य असो अथवा सेलिब्रेटी. आईवडीलांसाठी त्यांचं सर्वसुख हे मुलांमध्येच दडलेलं असतं. नुकतंच बॉलीवूडचा किंग खान शाहरूखने त्याच्या मुलाचं यश सर्वांसोबत शेअर केलं आहे. अबरामने शाहरूखला अभिमान वाटावं असं यश मिळवलं आहे. या यशाबद्दल शाहरूखला त्याच्या मुलाचं फारच कौतुक वाटत आहे. बॉलीवूडचा किंगखान असूनही एखाद्या सामान्य पालकाप्रमाणे त्याने त्याच्या मुलाचं यश चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
शाहरूख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आतूर असतात. शाहरूखही मन्नतवर असताना त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी बंगल्याच्या बाल्कनीत येत असतो. केवळ शाहरूखच नाही तर त्याची पत्नी गौरी आणि मुलं सुहाना,आर्यन, अबरामबद्दलही जाणून घ्यायला चाहत्यांनाच नेहमीच आवडतं. नुकतंच अबरामने कराटे या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. अबरामला मिळालेल्या गोड मेडलमुळे संपूर्ण खान परिवारामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. शाहरूखने तर लेकाचं हे यश जाहीर करण्यासाठी इंन्स्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत शाहरूखने शेअर केलं आहे. " तुम्ही शिकत असता, तुम्ही भांडता आणि यशस्वी होत जाता. तुमच्या आयुष्यात या गोष्टी पुन्हा पुन्हा घडतात. मला वाटतं या मेडलमुळे माझ्या मुलांकडे माझ्यापेक्षा जास्त मेडल झाले आहेत. सहाजिकच माझ्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. मला आता माझ्या मुलांकडून बरंच काही शिकण्याची गरज आहे. ज्यामुळे मला खूपच अभिमान आणि प्रोत्साहन मिळत आहे." बॉलीवूडचा किंगखान असूनही शाहरूखचं वागणं त्याच्या मुलांसाठी मात्र सर्वसामान्य पालकांप्रमाणेच आहे हे यातून दिसून येतं.
अबराम हा शाहरूखचं सर्वात लहान अपत्य आहे. ज्यामुळे शाहरूख आणि त्याचा परिवार त्याची विशेष काळजी घेत असतात. शाहरूख, गौरी, आर्यन, सुहाना त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. चाहत्यांनाही अबरामला पाहणं, त्याच्याबद्दल जाणून घेणं नेहमी आवडतं. अबराम सध्या शाळेत जात आहे. त्यामुळे त्याच्या शैक्षणिक जीवनातील यश शाहरूख नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने आणखी एक स्पर्धा जिंकली होती. शाहरूखने तेव्हा शेअर केलं होतं की, " रेसचा एक दिवस... माझा छोटासा गोल्ड मेडल त्याच्या सिल्वर आणि ब्रॉंझ मेडल सोबत रेस जिंकताना." आता तर अबरामने चक्क गोल्ड मेडलच मिळवलं आहे. त्यामुळे शाहरूखचा आनंद गगनात मावत नाही आहे.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा -
आरजे सुमित आणि अभिनेत्री मयुरी घाडगे थिरकणार 'सांज' गाण्यात
राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यावर आता 'ही' अभिनेत्री करतेय मराठीत पदार्पण
‘मलंग'मध्ये झळकणार हा मराठी अभिनेता