ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज

सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज

विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) आता नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी खास गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीशिवाय हिंदी, तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीने पहिल्यांदाच गुजरातीत गाणं गायलं आहे. राधा-कृष्णाच्या अलौकिक प्रेमाला समर्पित ‘कानुडा’ हे भक्तीपर रास-गरबा गाणं रिलीज झालं आहे.

सावनीची इच्छापूर्ती

‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या म्युझिकल सिरीजमधील हे तिसरं गाणं आहे. या गाण्याबद्दल बोलताना सावनी म्हणाली की, “नवरात्रीत आमच्या घरी घट बसतात. माझी आई नऊ दिवस उपवास करते. प्रत्येक दिवसाचा वेगळा नैवेद्य असतो. या नऊ दिवसांतून एक वेगळीच उर्जा वर्षभरासाठी आपल्याला मिळते. त्यामुळे मला नवरात्रोत्सव खूप आवडतो. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. पण गुजराती गाणे गाण्याची इच्छा अपूर्ण होती. रास-गरब्याच्या या गाण्याने ती पूर्ण झाली.”

सावनीचा ट्रेडिशनल लुक

सावनी या गाण्यात रास-गरबा करतानाही दिसत आहे. या गाण्यासाठी सावनीने खास पारंपारिक गरबा लुकही केला. ज्यामध्ये तिने छान पांढरा घागरा-चोली, सुंदर लाल रंगाची सोनेरी लेसची ओढणी आणि त्यावर पारंपारिक दागिने घातले होते. या सुंदर लुकमध्ये तिचा फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये कान्हाच्या मूर्तीजवळ बसलेली दिसत आहे.

डान्स मूव्ह्ज करताना दिसणार सावनी

मुख्य म्हणजे पहिल्यांदाच आपल्या म्युझिक व्हिडीओमध्ये तिने डान्स-मूव्ह्जही केल्या आहेत. सावनीच्या या नव्या डान्स एक्टीव्हीटीबद्दल विचारलं असता तिने सांगितलं की, “गायक असल्याने लहानपणापासून नवरात्रीमध्ये मी नेहमी गाणी गायली आहेत. गरबा केला नव्हता. आता ती इच्छाही या नव्या सिंगलव्दारे पूर्ण झाली.”

ADVERTISEMENT

गाण्यासाठी घेतली खास मेहनत

या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा सावनी गुजराती भाषेत गायली आहे. या अनुभवाबद्दल सांगताना सावनी म्हणाली की, “मी सोडून या म्युझिक व्हिडीओवर काम करणारी संपूर्ण टीम गुजरातीच आहे. या गाण्याचे संगीतकार पार्थिव शाह आणि गीतकार प्रणव पांचाल आहेत. सह-गायक कौशल पिठाडिया हा अहमदाबादचा आहे. कौशलकडून मी गुजराती भाषेचा लहेजा शिकले. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हॉइस टेक्सचर्समध्ये गाणे गायले आहे. गुजराती फोक गातानाचा ब्रॉड व्हॉईस आणि माझा ओरिजनल आवाज अशा दोन वेगळ्या पध्दतीने एकाच गाण्यात गायले आहे. पहिल्यादांच लाईव्ह इन्सट्रूमेंट्ससह मी गायले आहे.”

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

हेही वाचा –

ऐकलीत का गायिका सावनी रविंद्रची नवी म्युझिकल सीरिज

ADVERTISEMENT

’माँ की रसोई’च्या निमित्ताने एकत्र आले दिग्गज

ही Remix गाणी एकेकाळी होती फारच प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का

26 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT