ब्रेकअपनंतर श्रुती हसन खऱ्या प्रेमाच्या शोधात, म्हणाली…

ब्रेकअपनंतर श्रुती हसन खऱ्या प्रेमाच्या शोधात, म्हणाली…

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन सध्या तिच्या करिअरपेक्षा तिच्या पर्सनलाईफमुळे अधिक चर्चेत आहे. नुकताच तिचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर सावरलेल्या श्रुती हसनने अखेर मौन सोडले आहे. आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलला असून ती आता खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. तिने स्वत:ही माहिती दिली असून ती जुने सगळे विसरुन move on झाली आहे आणि आता ती खूश आहे.

अभिनेत्री मौनी रॉयचं Hot Photoshoot, चाहते झाले घायाळ

प्रेमाने मला शिकवले

Instagram

श्रुती हसनचे सिरिअस रिलेशनशीप मायकल कॉर्सेलसोबत होते. त्यांनी त्यांचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. पण त्यांचे नाते तुटले, त्यानंतर दु:खाच्या गर्तेत लोटलेल्या श्रुतीने या विषयी कधीच काही सांगितले नाही. पण एका मुलाखतीदरम्यान तिने झालेल्या गोष्टीला दोष देण्यापेक्षा यातून धडा घेणे पसंत केले. त्यामुळेच ती म्हणाली की, प्रेमाने मला शिकवले.

नेमकी माशी कुठे शिंकली

Instagram

नात्याबद्दल बोलताना श्रुती म्हणाली की, मी खूप कूल आणि नाजूक स्वभावाची आहे. त्यामुळे माझ्यावर लोक अधिकार गाजवायला पाहतात. मी खूप इमोशनल असल्यामुळेच लोक माझ्यावर हक्क गाजवतात.  त्यामुळेच माझे हे नाते तुटले पण मला त्याचे दु:ख नाही. कारण यातून मला खूप काही शिकायला मिळाले. माणसं खराब असतात असे नाही. पण कधीकधी ते तुमच्यासोबत वाईट होतात. प्रेमाचा असा काही ठरलेला फॉर्म्युला नाही. त्यामुळे आदर्श प्रेम कसे असेल या बद्दल काहीच सांगता येत नाही. पण मला खऱ्या प्रेमाचा शोध नक्कीच आहे.

ट्विटरवर केली घोषणा

श्रुती हसनचे हे रिलेशनशीप कधीच लपून नव्हते उलट ते जगजाहीर होते. तिने कायमच तिचे नाते सगळ्यांसमोर ठेवले होते. पण ज्यावेळी त्यांनी एकमेंकापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र त्यांनी याची घोषणा ट्विटरवरच केली. कदाचित आमचे एकत्र राहणे कोणालाही मान्य नसावे. पण ही महिला माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची आणि बेस्ट व्यक्ती आहे. आम्ही कायम मित्र  राहू. 

आणखी एका रेट्रो गाण्यावर थिरकतेय नोरा फतेही, व्हिडिओ आऊट

ब्रेकअपनंतर झाले मित्र

हल्ली अनेक सेलिब्रिटी असे आहेत की, ज्यांनी ब्रेकअपनंतर कटुता न ठेवता त्या नात्याचा शेवट अगदी चांगला केला आहे. असे अनेक सेलिब्रिटी एकाच मालिकेत काम करताना त्यांचे नाते मागे ठेवून सेटवर मित्रांप्रमाणे राहतात.

श्रुती हसन साऊथचा प्रसिद्ध चेहरा

Instagram

श्रुती हसन साऊथ स्टार कमल हसन आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी असून साऊथच्या चित्रपटात तिचा बोलबाला आहे. साऊथमध्ये होणाऱ्या लिंगभेदाबद्दलही तिने या आधी आवाज उठवला आहे. साऊथच्या चित्रपटांमध्ये तेवढ्याच ताकदीच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींना मात्र कमी पगार दिला जातो. 

श्रुती हसनकडून एक शिकण्यासारखे नक्की आहे की, ब्रेकअपनंतरही आयुष्य आहे जे तुमच्या नात्यापेक्षा अधिक सुंदर आहे ते तुम्ही जगायला हवे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.