कॉपी’ सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

कॉपी’ सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

मराठी चित्रपटसृष्टीचा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार आणि प्रगतीच्या दिशेने होत असल्याचं दिसून येत आहे. विषय, आशय, सादरीकरणातही मराठी चित्रपट अव्वल ठरत आहेत. मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळणारं यश याची ग्वाही देत आहेत. असाच एक आशयघन सिनेमा मागील काही दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. समाजातील ज्वलंत विषयावर भाष्य करत वास्तववादी कथानक मांडणा-या या चित्रपटाचं शीर्षक ‘कॉपी’ असं आहे. रसिक दरबारी सादर होण्यापूर्वा देश-विदेशांमधील विविध नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये मराठी सिनेमाचा झेंडा मानानं फडकवणा-या ‘कॉपी’ या सिनेमाचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आला.

कॉपी चित्रपटाचं कथानक

श्री महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांनी ‘कॉपी’ची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची संकल्पनाही गणेश पाटील यांचीच आहे. पलाश भीमशी वधान यांच्या भारत एक्सीमची प्रस्तुती असलेल्या ‘कॉपी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला निर्माते, दिग्दर्शकांसोबतच कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिक्षण ही काळाची गरज असल्याचं सर्वच थोरामोठयांनी म्हटलं आहे, पण आज शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे. शासकीय उदासीनतेमुळे आज शिक्षक, विद्यार्था आणि पालक यांचे अतोनात हाल होत आहेत. आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर मुलांनाही नाना प्रकारच्या परीक्षांमधून स्वतःला सिद्ध करावं लागत आहे. यात शिक्षकांचाही एक वेगळाच प्रश्न आहे. देशभरात आज सगळीकडे थोडया फार फरकानं जे चित्र पहायला मिळत आहे तेच ‘कॉपी’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाने एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस सिने फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करत समीक्षकांपासून रसिकप्रेमींपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे जभरातील मान्यवरांनी कौतुकाची थाप पाठीवर मारलेला एक मराठमोळा चित्रपट ‘कॉपी’च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं सिनेमाचे निर्माते गणेश पाटील यांचं म्हणणं आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच चांगल्या प्रयत्नांना दाद दिली असून, वास्तववादी चित्रपटांना गर्दा केली असल्यानं ‘कॉपी’ सुद्धा नक्कीच त्यांच्या पसंतीस उतरेल अशी आशा वानखेडे आणि धबडे या दिग्दर्शक जोडीनं व्यक्त केली आहे.

            

कॉपी चित्रपटाची जमेची बाजू

एखाद्या ज्वलंत विषयाला उचित न्याय देणारे कलावंत ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे आणि जगन्नाथ निवंगुणे यांच्या जोडीला कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, निता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतिक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक, सिद्धी पारकर, सानिका निर्मल, सिद्धी पाटणे आणि विद्या भागवत आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. दिग्दर्शक द्वयींनीच चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे. संवादलेखन दयासागर वानखेडे यांनी केलं असून, राहुल साळवे यांनी गीतलेखन केलं आहे. नव्या दमाचे संगीतकार अशी ख्याती असणा-या रोहन-रोहन यांच्या जोडीला वसंत कडू यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं असून ध्वनी समीर शेलार यांचे आहे. वास्तववादी कथानकाचं दर्शन घडवणा-या या चित्रपटाचं छायांकन सिनेमॅटोग्राफर सँटिनिओ टेझिओ यांनी केलं आहे. संदिप कुचिकोरवे या चित्रपटाचे कलादिग्दर्शन असून रविंद्र तुकाराम हरळे कार्यकारी निर्माते आहेत. मेकअपमन लिली शेख असून जय घोंगे, तपिंदर सिंग, साकेत चौधरी, नवनाथ गोवेकर या सिनेमाचे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

नेहा कक्कड पुन्हा चर्चेत, स्पर्धकाने खुलेआम केलं Kiss

सनी लिओनसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी लावतोय ठुमके,गाणं रिलीज