ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#Coronavirus चा फटका आता मालिकांच्या चित्रीकरणालाही

#Coronavirus चा फटका आता मालिकांच्या चित्रीकरणालाही

सध्या भारतामध्येच नाही तर आता महाराष्ट्रातही पोहचलेल्या कोरोना व्हायरस (Corona virus) मुळे महाराष्ट्र सरकार योग्य ती पावले उचलत आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधील मुख्य मॉल्स, थिएटर्स, शाळा या ठिकाणी लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली असून  या सगळ्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण त्याचबरोबर आता कोरोना व्हायरसचा फटका चित्रपटसृष्टी आणि मालिकांच्या चित्रीकरणालाही बसला आहे. ‘इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन’ ने एक परिपत्रक काढून 19 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत मालिकांचे चित्रीकरण बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.  इतकंच नाही यामध्ये चित्रपट, वेबसिरीज, आणि इतर मनोरंजन डिजिटल प्लॅटफॉर्मचाही समावेश असणार आहे असं सांगण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही काळजी घेण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. 

समीरा रेड्डीने दिले सासूला आव्हान, सासूने केली बोलती बंद

कोरोना व्हायरसची भीती

सध्या कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच मनात भीती पसरली आहे. रोज नवीन नवीन गोष्टी कळत आहेत. अर्थात यातून बरे होणाऱ्यांची संख्याही खूप आहे. पण तरीही या आजाराने सध्या थैमान घातले आहे. त्यामुळे आपापल्या दृष्टीने  सर्व काळजी नीट घेण्यासाठी टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीही पुढे सरसावली आहे. या ठिकाणीही चित्रीकरणाच्या वेळी खूप गर्दी होते. या आजारामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे. त्यामुळे काळजी म्हणून 19 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत मालिकांचेही चित्रीकरण रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर याचा फटका चित्रपटाच्या चित्रीकरणांनाही बसला आहे. बऱ्याच ठिकाणी सध्या चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. हा निर्णय एकमताने  घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या निर्णयासाठी झालेल्या मीटिंगमध्ये अशोक पंडित (निर्माता, IFTDA चे अध्यक्ष), जेडी मजेठिया (टीव्ही मालिका निर्माता आणि IFTPC उपाध्यक्ष), टीपी अगरवाला (IMPPA अध्यक्ष), अशोक दुबे (FWICE चे सचिव), संग्राम शिर्के (WIFPA चे अध्यक्ष), निर्मात टिनू वर्मा, प्रदीप सिंह तसेच अनेक कार्यकारीही उपस्थित होते. 

ADVERTISEMENT

corona virus मुळे चित्रपटांवर होणार परिणाम, थिएटर राहणार 31 मार्चपर्यंत बंद

नक्की काय झाला निर्णय

सर्व निर्मात्यांनी तीन दिवसात आपले युनिट्स परत बोलावून घेतले आहे. ज्यांचे चित्रीकरण बाहेरगावी चालू आहे त्यांचे संपूर्ण युनिट पुन्हा बोलावून घेण्यात  आले आहे. जे. डी. मजेठियांनी सांगितले की, ‘सध्या देशात जे काही चालू आहे त्यानंतर, निर्माते, सर्व भारतीय चित्रपटसृष्टीमधील असोसिएशन्स यांनी चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेबसिरीज संपूर्ण भारतामध्ये चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व चित्रीकरण रद्द केले आहे.’ यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याचीही व्यवस्थित काळजी घेता येईल आणि कोरोना व्हायरसचा त्रासही होणार नाही. तसचं अध्यक्ष अशोक पंडित यांनी सांगितले की, उत्तर, दक्षिण, अन्य भाषिक सर्व इंडस्ट्रीने आमच्या  या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून 19 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत सर्व चित्रीकरण रद्द करण्याचे मान्य केले आहे. आम्ही सर्व निर्मात्यांना तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे जे काही शिल्लक असेल ते तीन दिवसात त्यांना व्यवस्थित आवरता येईल. त्यांचेही नुकसान होणार नाही. बंद असण्याच्या कालावधीत सेटवरील स्वच्छतेचीही काळजी घेण्यात येईल असंही सांगण्यात आले आहे. आरोग्यापेक्षा काहीही जास्त महत्त्वाचे नाही असे यावेळी अशोक दुबे यांनी सांगतले आहे.

आता corona virus वर बनणार चित्रपट,नावही झाले रजिस्टर

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT
15 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT