EX बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यामुळे उर्वशी रौतेला हैराण, फॅन्सना केली विनंती

 EX बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यामुळे उर्वशी रौतेला हैराण, फॅन्सना केली विनंती

सोशल मीडिया हल्ली सगळ्यांसाठीच हॉट प्लॅटफॉर्म असले तरी देखील त्याचा अतिरेक अनेकांना मनस्ताप ठरतो. गॉसिप हा विषय लोकांना आवडतो हे लक्षात घेत अनेक जण वेगवेगळ्या विषयावर कोणताही अभ्यास न करता व्हिडिओ बनवत असतात. काही व्हिडिओ हे कसलाही अभ्यास न करता तयार केलेले असतात. अशाच एका व्हिडिओमुळे उर्वशी रौतेला वैतागली आहे. तिचा EX बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यावर आधारीत हा व्हिडिओ असून आता या संदर्भात तिने स्वत:हून खुलासा केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

Instagram

सोशल मीडियावर अगदी काहीही टाकण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण इतरांच्या आयुष्यात डोकावणारे खासगी व्हिडिओ कोणालाच आवडत नाही. उर्वशीच्या बाबतीत असेच काही घडले आहे. तिचा EX बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यावर हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हार्दिक पांड्याकडून उर्वशी रौतेलाने पैशांची मदत मागितली असा आशय ठेवण्यात आला आहे. 2.04 मिनिटांचा व्हिडिओ असून उर्वशीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच या युट्युब चॅनेलकडे हा व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली आहे.शिवाय फॅन्सना या गोष्टीकडे लक्ष देऊ नका असे सांगितले आहे.

#BBM2 : एकमेकांना जपा आणि एकमेकांची काळजी घ्या - माधव देवचके

काय आहे उर्वशीची इन्स्टा स्टोरी

Instagram

तिच्या या व्हिडिओमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने एक इन्स्टा स्टोरीसुद्धा पोस्ट केली आहे. तिने सदर चॅनेलला हा व्हिडिओ काढून टाका असे सांगत मलाही एक कुटुंब आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागतात. या निरर्थक गोष्टीचा मला त्रास होतो,असे सांगत तिने त्या व्हिडिओचा स्क्रिन शॉट शेअर केला आहे. पैशांची खोटी मागणी करणारा हा व्हिडिओ तिला जास्तच खटकलेला दिसत आहे. एरव्ही तिच्या रिलेशनशीपवरील व्हिडिओजमुळे कितीही गॉसिप होत असली तरी तिला हा व्हिडिओ नकोसा झाला आहे. म्हणूनच ती या व्हिडिओवर  React झाली आहे.

मध्यरात्री का घेतली रणबीरने करण जोहरची भेट

ब्रेकअप झाले कधीच

Instagram

उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचे रिलेशनशीप कन्फर्म असल्याचे देखील कळले होते. पण एकाएकी त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर हार्दिक आणि उर्वशी कधीच एकत्र दिसले नाही. या ब्रेकअपनंतर दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे निघून गेलेली असताना आता अचानक या गोष्टी करणे म्हणजे नको त्या गोष्टी उकरुन काढणे असेच आहे

हार्दिकची कॉन्ट्राव्हर्सीज

Instagram

हार्दिक पांड्याबद्दल सांगायचे झाले तर तो हल्लीच त्याच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ट्रोल झाला होता. कॉफी विथ करण या शोमध्ये त्याने महिलांच्या रिलेशनशीपबद्दल केलेले असभ्य विधान त्याला चांगलेच भोवले होते. त्यामुळे संपूर्ण देशाने निषेध नोंदवला होता. पण आता हे सगळं शांत झालं आहे. त्याच्या विचित्र हेअरस्टाईल्सही फार प्रसिद्ध आहे. पाहायला गेलं तर त्याला प्रसिद्धीत राहायला एकूणच आवडतं. 

रोहित आणि विराटचं बिनसलं, विराटनंतर अनुष्कालाही केलं unfollow

उर्वशीच्या करिअरची सुरुवात

Instagram

 हॉट, सिझलींग अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाची ओळख आहे. तिने 2015 मिस युनिव्हर्स पॅजेंटमध्ये सहभागी झाली होती. तिने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘सनम रे’, ‘काबील’. ‘हेटस्टोरी’ या चित्रपटातून ती दिसली आहे. आता तिचा  ‘पागलपंती’ नावाचा चित्रपट येणार आहे. ती मॉडेल असून तिचे फोटोशूट सुरुच असतात.ती तिचे व्हिडिओ नेहमीच तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर करत असते.