ADVERTISEMENT
home / मनोरंजन
वरूण-साराच्या ‘कुली नं 1’ चित्रपटाला कोरोनाचं ग्रहण

वरूण-साराच्या ‘कुली नं 1’ चित्रपटाला कोरोनाचं ग्रहण

कोरोना व्हायरसचा फटका संपूर्ण मनोरंजन विश्वाला बसला आहे. ज्यामुळे टेलिव्हिजन मालिकांपासून ते अगदी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटापर्यंत सर्वांचं शूटिंग रद्द झालं आहे. लॉकडाऊन आधी ज्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं त्यांनादेखील कोरोनाचं ग्रहण नक्कीच लागलेलं आहे. कारण आता हे चित्रपट रिलीज कसे करायचे हा प्रश्न निर्माता आणि दिग्दर्शकांना पडला आहे. वरूण धवन आणि सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला ‘कुली नं 1’ देखील यातून वाचलेला नाही. ‘कुली नं 1’ चित्रपट एक मेला प्रदर्शित होणार होता. मात्र आता कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख देखील पुढे ढकलण्यात आली आहे.  

‘कुली नं 1’ आता नेमका कधी होणार प्रदर्शित

1995 साली प्रदर्शित झालेल्या कुली नं 1 चा रिमेक आहे. ज्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्माच्या जोडीने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं होतं. या चित्रपटातील गाणी देखील लोकप्रिय झाली होती. यासाठीच या चित्रपटाचे दिग्दर्शक डेविड धवन यांनी याचा रिमेक तयार केला. ज्यामध्ये त्यांनी गोविंदाच्या जागी स्वतःच्या मुलांला उभं केलं.  वरूण धवन आणि सारा अली खान या जोडीला कुली नं 1 चित्रपटात पाहण्यास चाहते नक्कीच उत्सुक आहेत. वरूण धवनदेखील कुली नं 1 मधील भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येण्यासाठी आतूर झाला आहे. मात्र आता या कोरोनाच्या संकटामुळे त्याच्या या चित्रपटालाच ग्रहण लागलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे अख्खं जग हवालदिल झालं आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढे ढकलेली तारिख नेमकी कधी असेल हे कोणालाच सांगता येणार नाही. जर हे संकट लवकर आटोक्यात आलं तर कदाचित जून अथवा जुलैमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. मात्र त्यावेळी एकाचवेळी असे रखडलेले किती चित्रपट प्रदर्शित होतील आणि प्रेक्षक या चित्रपटांना गर्दी करतील का हा मोठा प्रश्न आज निर्मात्यांपुढे निर्माण झाला आहे. 

कोरोनाचा फटका आणखी अनेक चित्रपटांना

कुली नं 1 प्रमाणेच रोहित शेट्टीचा सुर्यवंशी चित्रपटदेखील आता लवकर प्रदर्शित होणार नाही असा अंदाज व्यक्त होत आहे. सलमान खानचा राधे आणि रणवीर सिंहचा 83 यांच्या प्रदर्शनाच्या तारखादेखील पुढे ढकलण्यात येत आहेत. या आधीच इरफान खानचा अंग्रेजी मिडीयम चित्रपटगृहात न चालल्यामुळे तो डिजीटल माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला होता.  कोरोनामुळे आता संपूर्ण चित्रपटसृष्टी संकटात सापडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जिथे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे मनोरंजनाची चिंता खरंतर कोण करणार. मात्र देशावरचं हे संकट लवकर दूर व्हावं आणि सर्वांना पूर्वीप्रमाणे जगता यावं अशीच इच्छा यामुळे सर्वजण व्यक्त करत आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा –

लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये

ADVERTISEMENT

अनुराग कश्यपच्या ‘बमफाड’ मधून अजून एका स्टारकिडची बॉलीवूडमध्ये एंट्री

महानायकाने केला #weareone चा संकल्प, एक लाख मजुरांना दिला मदतीचा हात

07 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT