स्लिम-ट्रीम फिगर आणि सुंदर दिसणं कोणाला नाही आवडत? आजकाल प्रत्येक माणसाला विशेषतः महिलांना वजन वाढीची समस्या आहे. परफेक्ट आणि फिट दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी करत आहे. कोणी व्यायाम करत आहे तर कोणी योगा करत आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच अशा व्यक्तीही आहेत, ज्यांना अजिबातच कामातून वेळ मिळत नाही. पण तरीही त्यांना आपल्या फिटनेसकडे लक्ष मात्र द्यायचं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला काही असे उत्कृष्ट स्लिमिंग ड्रिंक्स सांगणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या रोजच्या व्यस्त कामातूनही फॉलो करता येतील आणि तुम्ही तुमचा फिटनेस योग्य राखू शकाल. या ड्रिंक्समुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळीदेखील योग्य राखली जाईल. हे प्यायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला लवकरच याचे परिणाम दिसून येतील. आम्ही तुम्हाला अशी तीन ड्रिंक्सची माहिती देणार आहोत. जे तुम्ही घरच्या घरी तयार करून पिऊ शकता आणि स्वतःचा योग्य फिटनेस राखू शकता. जाणून घेऊया याची रेसिपी –
1 . लेमन मिंट ड्रिंक
तुम्हाला जर लिंबू आणि पुदीना आवडत असेल तर यासारखं वजन कमी करण्यासाठी योग्य ड्रिंक नाही. हे अतिशय उत्कृष्ट इलाज आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला साधारण 10 – 12 पानं पुदीना, एक नॉर्मल आकाराची काकडी (पातळ गोल कापून घेतलेली), एक चमचा किसलेलं आलं, एक लिंबू (पातळ गोल कापलेले) आणि साधारण 8 कप पाणी इतक्या गोष्टी लागतील.
कसं बनवावं हे डिटॉक्स ड्रिंक – सर्वात पहिले या सर्व गोष्टी घेऊन एका कंटेनरमध्ये मिसळून रात्रभर ठेऊन द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी यातून पुदीन्याची पानं, लिंबू आणि आलं हे सर्व बाजूला काढा. आता हे पाणी तुम्ही दिवसभर पित राहा आणि रात्रीपर्यंत हे पाणी संपवण्याचा प्रयत्न करा. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी एक महिना करा. तुम्हाला लवकरच तुमच्या शरीरामधील फरक जाणवू लागेल.
2 . अलोव्हेरा मॅजिक ड्रिंक
ऱ्याच व्यक्तींना पुदीन्याची अलर्जी असते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःसाठी अलोव्हेरा अर्थात कोरफड आणि मधापासून बनवलेलं मॅजिक ड्रिंक बनवू शकतात. विश्वास ठेवा तुमचे वजन या डिटॉक्स ड्रिंकमुळे कधी कमी होईल हे तुम्हाला कळणारही नाही. हे बनवण्यासाठी तुम्हाला लागणारी सामग्री असेल ती म्हणजे 1 चमचा मध, 1 चमचा आल्याची पावडर अथवा रस, 1 चमचा लिंबाचा रस, 3 चमचे कोरफड जेल आणि एक ग्लास पाणी.
कसं बनवावं हे डिटॉक्स ड्रिंक – सर्वात पहिल्यांदा एका ग्लासामध्ये पाणी घ्या आणि मग त्यामध्ये कोरफड जेल वा ज्युस घाला. त्यामध्ये मध आणि आल्याची पावडर वा रस, तसंच लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी नियमित उठल्यानंतर प्या आणि नंतर तुम्हालाचा तुमच्यातील फरक जाणवेल. तुमच्या शरीरावर नक्कीच एक वेगळी जादू झाल्याचं तुमच्या लक्षात येईल.
3 . मल्टी टास्किंग स्लिमिंग ड्रिंक
दुधीपासून बनणारं हे खास ड्रिंग तुमचं वजन कमी तर करतंच पण त्याचबरोबर तुमच्या हृदय आणि मेंदूचीदेखील काळजी घेतं. वजन कमी करण्यासाठी दुधीपेक्षा दुसरी कोणतीही चांगली भाजी नाही. हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी असतील – ताजी दुधी साधारण ½ किलो, चिमूटभर काळी मिरी पावडर, 1 चमचा लिंबू रस, बारीक किसलेलं वा चिरलेलं आलं, सैंधव मीठ हे स्वादानुसार आणि अर्धा कप पाणी.
कसं बनवावं हे डिटॉक्स ड्रिंक – सर्वात पहिले तुम्ही दुधीचं साल काढून घ्या आणि त्याचे तुकडे करा. आता मिक्सरमध्ये दुधीचे तुकडे घालून त्यात काळी मिरी पावडर, आल्याचे तुकडे घालून त्याचा ज्युस बनवून घ्या. हे ज्युस एका ग्लासमध्ये काढून त्यामध्ये अर्धा कप पाणी, लिंबू रस आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे रोज सकाळी करून प्या. त्यानंतंर तुम्ही याची कमाल बघा. हे सर्व करून बघितल्यास, तुम्हाला इतर कोणतीही गोष्ट करायची गरज भासणार नाही.
लक्षात ठेवा – तुम्हाला जर या गोष्टीचा रिझल्ट लवकर हवा असेल तर हे डिटॉक्स ड्रिंक्स तर घ्या पण त्याचबरोबर तुम्ही कमीत कमी अर्धा ते पाऊण तास चाला आणि जर शक्य असेल तर तुम्ही जंक फूडपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वजन तेव्हाच कमी होईल जेव्हा तुमचे फॅट्स कमी होतील आणि तुमचं खाण्यावर नियंत्रण राहील.
फोटो सौजन्य – Shutterstock
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक
वजन घटवण्यासाठी उत्कृष्ट आहेत हे बाबा रामदेवचे घरगुती उपाय