बऱ्याच मुली आणि मुलं मुलींच्या मासिक पाळी दरम्यान अर्थात पिरियडदरम्यानही सेक्स करतात. त्यांना त्यामध्ये काहीही वावगं वाटत नाही आणि खरं तर ही गोष्ट अतिशय सामान्य आहे. सेक्स करणाऱ्या अनेक व्यक्ती ही गोष्ट करतात पण त्याबद्दल कधीही चर्चा मात्र होत नाही. कारण कदाचित लोकांना काय वाटेल हा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. तुम्हालादेखील जर कधी मासिक पाळीदरम्यान सेक्स करावा वाटला तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मासिक पाळी दरम्यान सेक्स करणं काही जणांना योग्य वाटत नाही तर काही जणांना त्यामध्ये काही गैर वाटत नाही. त्यामुळे जरी सेक्स करणार असलात तर त्यात वावगं काहीच नाही. पण त्याआधी काही गोष्टी जाणून घ्या.
1. यादरम्यान सेक्स केल्यास, मिळते क्रॅम्प्सपासून सुटका
GIPHY
तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. तुम्ही मासिक पाळीदरम्यान सेक्स केल्यास, मासिक पाळीमध्ये येणाऱ्या क्रॅम्प्सपासून तुम्हाला सुटका मिळते. कारण सेक्सनंतर एंडोर्फिन्स रिलीज होतात जे तुमच्यातील तणाव आणि होणारा त्रास दोन्ही कमी करतात. त्यामुळे तुम्हाला जर क्रॅम्प्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच ट्राय करून पाहू शकता.
2. पीरियड्सची होते लवकर सुट्टी!!
मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास, तुमच्या शरीरातील मेन्स्ट्रूअल टिश्यूजचा फ्लो वाढतो. त्यामुळे तुमची मासिक पाळी जास्त काळ राहात नाही. तसंच क्लॉटिंगचा प्रॉब्लेमही यामुळे निघून जातो.
3. स्टॅटिस्टिक्स सांगतं…
GIPHY
आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की, बरेच लोक मासिक पाळीदरम्यान सेक्स करतात. पण याशिवाय बोलत मात्र नाहीत. एका सर्व्हेनुसार साधारण 30% लोक हे मासिक पाळीदरम्यान सेक्स करतात. त्यांना यामध्ये काहीही वावगं वाटत नाही. तसंच मासिक पाळीदरम्यान सेक्स करताना त्यांना कोणतीही अडचणही निर्माण होत नाही. फक्त त्यासाठी तुमच्या मनाची किती तयारी आहे ते पाहणं गरजेचं आहे.
4. STIs.. उफ!
STI म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. यादरम्यान इन्फेक्शन होण्याचे चान्स नक्कीच वाढतात. कारण पूर्ण महिन्याच्या तुलनेत यावेळी तुमचा सर्व्हायकल वॉल जास्त प्रमाणात उघडा राहतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान सेक्स करायचा असेल तर तुमच्या जोडीदाराने कंडोमचा वापर करणं खूपच गरजेचं आहे.
5. तुम्हाला हेदेखील आवडू शकतं
GIPHY
मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत तुमच्या तब्बेतीची अवस्था नक्कीच थोडी बदलते. तुमच्या शरीरातील हार्मोन्स रिलीज होतात आणि तुम्हाला नक्कीच सेक्स करण्याची इच्छा होत असते. त्यामुळे जेव्हा तुमचा असा मूड असतो तेव्हा तुम्ही सेक्स करायलाच हवं. सहसा प्रत्येक महिलेला मासिक पाळी झाल्यानंतर सेक्स करण्याचा मूड येतोच. तिसऱ्या ते चौथ्या दिवशी तर असा मूड नक्कीच असतो. त्यावेळी कंडोमचा वापर करून सेक्स केल्यास, तुमच्या शरीरालाही थोडासा आराम मिळतो.
6. डॉक्टर काय सांगतात…
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणं यात काहीच गैर नाही. जर कपल्सपैकी दोघांनाही काहीही अडचण नसेल तर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे. यादरम्यान सेक्स न करण्याचं असं काहीही कारण नाही किंवा सेक्स केल्यास काही प्रॉब्लेम निर्माण होतो असंही नाही. उलट मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्यास, लग्न झालेली महिला पटकन गर्भवती राहण्याचा चान्सही जास्त असतो.
7. तुमच्या जोडीदाराचं काय म्हणणं आहे
GIPHY
डॉक्टर काहीही सांगू दे पण सर्वात महत्त्वाचं आहे ते तुमच्या जोडीदाराचं म्हणणं. यासंदर्भात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी न कचरता बोलायला हवं. तुम्हाला सेक्स हे तुमच्या जोडीदाराबरोबर करायचं आहे. त्यामुळे त्याला काय वाटतं अथवा तुम्हाला काय वाटतं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा कम्फर्ट लेव्हल असेल तर तुम्ही अशावेळी सेक्स करू शकता.
सेक्स करताना पुरुषांनी या 10 ठिकाणी करावा महिलांना स्पर्श
8. सर्व घाण होईल…
पिरियड्स दरम्यान सेक्स करायचं असेल तेव्हा नक्कीच मासिक पाळीमुळे तुम्ही घातलेली बेडशीट खराब होणार. त्यामुळे अशावेळी तुम्ही वेगळा टॉवेल अथवा वेगळी बेडशीट ठेवा जेणेकरून ती खराब झाली तरी ती धुवून पुन्हा पुढच्या महिन्यात वापरता येईल. अथवा तुम्हाला बेडशीट घाण होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाथरूममध्ये सेक्स करा. त्यामुळे घाण वाटण्याचाही प्रश्न येणार नाही.
9. बेडशीटवरील पर्याय
मासिक पाळी असो वा नसो सेक्स करताना बेडशीट खराब होण्याचं तुम्हाला टेन्शन असेल तर तुम्ही सेक्स झाल्यानंतर बेडशीट मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्यावर स्टॅन रिमूव्हर लावा आणि मग धुवा. असं केल्याने अजिबातच डाग राहणार नाहीत.
तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स
10. हे सर्व कसं करणार?
तुम्हाला जर मासिक पाळीच्या दिवसात सेक्स कसा करणार असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नॉर्मल मिशनरी पोझिशनमध्ये सेक्स करा. कारण जेव्हा तुम्ही पाठीच्या बाजूला झोपता तेव्हा रक्ताचा प्रवाह कमी होतो. तुम्हाला जर इंटरकोर्सशिवाय हे करायचं असेल तर तुम्ही टॅम्पॉन ट्राय करू शकता.
11. सर्वात मोठा गैरसमज गरोदरपणा !!
GIPHY
लोकांना वाटतं की, मासिक पाळीदरम्यान सेक्स केला तर गरोदर राहू शकतो. पण असं अजिबात नाही. कारण स्पर्म्स तुमच्या शरारामध्ये 72 तास राहातात. त्याचवेळी मासिक पाळी संपली तर गरोदरपणा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
12. सर्वस्वी तुमच्या मनावर अवलंबून
हे सर्वस्वी तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी कशा पोझिशनमध्ये तुमच्या जोडीदाराबरोबर कम्फर्टेबल आहात हे तुमच्याव्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही. त्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल असाल तेव्हाच हे करून पाहा.