ADVERTISEMENT
home / फॅशन
alia bhatt looks stunning in saree in marathi

आलिया भटचे हे साडी लुक्स तुम्हालाही करतील घायाळ

आलिया भट सध्या बॉलीवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे  कमी वयात आणि अगदी कमी वेळात तिने लोकप्रियता मिळवली आहे.  आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर तर सोशल मीडियावर सगळीकडे आलियाचीच चर्चा आहे. बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये ती सोशल मीडियावर नंबर वन आहे. तिच्या बुद्धिमत्ता आणि स्टाइलिंग सेंसचे लाखो चाहते आहेत. आलिया जितकी वेस्टर्न लुकमध्ये छान दिसते तितकीच ती लेंहगा आणि साडीमध्ये परफेक्ट दिसते. गंगुबाई काठियावाडीनंतर तर तिच्या साडी लुकवर प्रेक्षक फिदा आहेत. यासाठीच पाहा आलियाचे आत्तापर्यंतचे बेस्ट साडी लुक्स

गंगुबाई काठियावाडी चित्रपटात आलिया बराच वेळ साडीमध्ये दिसली आहे. मात्र यात तिने फक्त सफेद रंगाच्या साडी परिधान केल्या आहेत. मात्र जेव्हा ती गंगुबाई चित्रपटाचं प्रमोशन करत होती. तेव्हा मात्र तिने सफेदमधील आकर्षक डिझाइन आणि सिल्कमधील साड्या परिधान केल्या होत्या. या सिल्क साडीत आलिया भटचे सौंदर्य खूपच खुलून आलं आहे.  मोकळे केस आणि मोठे कानातले यामुळे हा लुक अगदी परफेक्ट झाला आहे. साडीवर गोल्डन बार्डर आहे आणि हलक्या पिवळ्या रंगाच्या फुलांची डिझाईन आहे. अगदी साधा पण घायाळ करणारा हा लुक तुम्ही देखील नक्कीच करून पाहू शकता. 

थोडं कलरफुल दिसायचं असेल तर आलियाचा हा साडी लुक अगदी मस्त आहे. गोल्डन बॉर्डर आणि रामा ग्रीन रंग यामुळे ही सिल्क साडी आलियावर खूपच शोभून दिसत आहे. या लुकला परफेक्ट करण्यासाठी तिने या साडीसोबत खास मोगऱ्याचा गजरा माळला आहे. अशा साड्यांवर जास्त दागदागिने घालण्यापेक्षा असे फक्त मोठे कानातले जास्त उठून दिसतात. असा परफेक्ट लुक तुम्ही एखाद्या लग्न अथवा मोठ्या इव्हेंटसाठी नक्कीच करू शकता. 

साडीमध्ये एकच रंग नको असेल तर आलियासारखी अशी मल्टी कलर साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता. मात्र जर अशी शिफॉनची साडी परिधान करणार असाल तर ती परफेक्ट टक करा ज्यामुळे तुम्हाला साडीत वावरणं सोपं जाईल. अशा साड्यांवर मॅच होईल अशा रंगाचं स्लीव्हलेस ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. आलियाप्रमाणे मध्ये भांग असलेला छोटा बन हेअर स्टाईलसाठी निवडा. मोठे कानातले आणि कमीत कमी मेकअप करा ज्यामुळे तुमचा लुक आधिक नॅचरल वाटेल. 

ADVERTISEMENT

साड्यांमध्ये बांधणी साडीला विसरून कसं चालेल. कारण बांधणी साडीचं सौंदर्यं काही औरच असतं. म्हणूनच आलियालाही या साडीचा मोह आवरता आलेला नाही. तिने परिधान केलेली हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी कोणाचंही मन मोहून टाकेल. लग्न समारंभ अथवा सणाला अशा साड्या अधिक शोभून दिसतात. मात्र या साडीसोबत जास्त दागिने न घातला आलियाप्रमाणे फक्त एक नाजूक मांगटिका परिधान करा. ज्यामुळे हा लुक जास्त आकर्षक दिसेल.

आलिया भटने एका पुरस्कार सोहळ्यात नेसलेली ही गुलाबी रंगाची साडी तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेईल. गोल्डन रंगाचा काठ असलेल्या या साध्या सिल्कच्या साडीतही आलियाचं सौंदर्य खुलून आलं आहे. कारण आलियाने यासोबत परिधान केला आहे एक डीप नेकचा पिंक ब्लाऊज जो स्लीव्हलेस आहे. हातात बांगड्या अथवा नेकलेसन न घालताही ती अतिशय सुंदर दिसत आहे. कानातले मात्र नेहमीप्रमाणे मोठे आणि लांब आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

18 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT