ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Bhagwan Dada

एका सीनसाठी या अभिनेत्याने पाडला होता खऱ्या नोटांचा पाऊस

गतकाळातील ज्येष्ठ अभिनेते भगवान दादा यांचे नाव निघाले की त्यांच्या विनोदाची आणि नृत्याची वेगळी शैली आठवल्याशिवाय राहत नाही. भगवान दादांचे खरे नाव भगवान आभाजी पालव होते. भगवान दादांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 रोजी अमरावती येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांचे वडील कापड गिरणीत काम करायचे. भगवान दादांनीही काही काळ घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी कष्टाची कामे केली. पण त्यांचा कल सुरुवातीपासूनच चित्रपटांकडे होता.

मूक चित्रपटांपासून सुरु केली चित्रपट कारकीर्दीस सुरुवात 

Bhagwan Dada
Bhagwan Dada

‘गुन्हेगार’ या चित्रपटातून त्यांनी मूक चित्रपट युगात पदार्पण केले होते. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासोबतच त्यांनी चित्रपटांची निर्मितीही सुरू केली. भगवान दादा हे कॉमेडीचे अजरामर राजे होते. केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही ते मस्त मौला व्यक्ती होते. अभिनयानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही हात आजमावला. 1951 मध्ये त्यांनी ‘अलबेला’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील ‘शोला जो भडके’ आणि ‘भोली सुरत दिल के खोटे’ ही गाणी आजही आठवतात. यामध्ये त्यांच्याबरोबर गीता बाली या मुख्य भूमिकेत होत्या. भगवान दादांना शेवरलेट कारची इतकी आवड होती की त्यांनी ‘शेवरलेट’ नावाच्या चित्रपटातही काम केले होते. एकेकाळी कष्टाची, अंगमेहनतीची कामे करणाऱ्या भगवान दादांनी चित्रपटांतून भरपूर कमाई केली. त्या काळात त्याच्याकडे 7 गाड्या होत्या. आठवड्यातील प्रत्येक दिवशी ते वेगवेगळ्या कारने सेटवर जायचे.  त्यांच्या दिग्दर्शनातील एका चित्रपटाच्या दृश्यात त्यांना पैशांचा पाऊस दाखवायचा होता, त्यासाठी त्यांनी खऱ्या नोटांचा वापर केला होता..भगवान दादा हॉलिवूड चित्रपट अभिनेता डग्लस फेअरबँक्सचे खूप मोठे चाहते होते. डग्लस यांच्यापासून प्रेरणा घेऊन भगवान दादा त्यांच्या चित्रपटांमध्ये बॉडी डबल घेण्याऐवजी स्वतःच स्टंट करायचे. त्यांनी केलेले स्टंट इतके खरे वाटायचे की राज कपूर त्यांना इंडियन डग्लस म्हणायचे.

भगवान दादांबरोबरच्या एका दृश्यामुळे ललिता पवार यांच्या आयुष्यावर झाला परिणाम 

Lalita Pawar
Lalita Pawar

भगवान दादांचा पहिला बोलपट हिम्मत-ए-मर्द (1934) होता. या चित्रपटात ललिता पवार मुख्य भूमिकेत होत्या. ललिता पवार यांच्या चरित्र ‘द मिसिंग स्टोरी ऑफ ललिता पवार’मध्ये भगवान दादांशी संबंधित एक किस्सा शेअर करण्यात आला आहे. 1942 मध्ये ललिता ‘जंग-ए-आझादी’ चित्रपटातील एका सीनचे शूटिंग करत होत्या. या सीनमध्ये अभिनेता भगवान दादा यांना ललिता पवार यांना थप्पड मारावी लागणार होती. भगवान दादांनी अनावधानाने ललिता पवार यांना एवढ्या जोरात चापट मारली की त्या जमिनीवर पडल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.बरेच दिवस त्या रुग्णालयातच होत्या.  इतकेच नव्हे तर या कारणामुळे त्यांचा उजवा डोळा कायमस्वरूपी लहान झाला होता. तेव्हापासून ललिता पवार यांनी  नकारात्मक भूमिका करायला सुरुवात केली. मात्र, आपल्यामुळे ललिता पवार यांना आयुष्यभराची दुखापत व नुकसान झाले याचे दुःख भगवान दादांना आयुष्यभर राहिले. 

शेवटच्या काळात करावा लागला आर्थिक संकटांचा सामना 

सुरुवातीला भगवान दादांचे चित्रपट भरभरून चालले. पण नंतर एक काळ असा आला की त्यांचे चित्रपट  काही कमाल करू शकले नाहीत. चित्रपटांमुळे त्यांना इतका त्रास सहन करावा लागला की त्यांना जुहू येथील बंगला आणि गाड्या विकल्या गेल्या. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना शेवटची काही वर्षे मुंबईतील चाळीत राहावे लागले.

ADVERTISEMENT

भगवान दादांच्या शेवटच्या काळात बहुतेक लोक त्यांना सोडून गेले. फक्त संगीतकार सी रामचंद्र, अभिनेते ओम प्रकाश आणि गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी त्यांची साथ कधीही सोडली नाही आणि ही मंडळी त्यांना भेटायला चाळीत जात असत. भगवान दादा यांचे ४ फेब्रुवारी २००२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

भगवान दादांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन! 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT