श्रावण सुरू झाला की घरोघरी अळूची वडी, अळूची भाजी बनवली जाते. उपवासाच्या दिवशी, सणासुदीला अळूची भाजी मस्ट असते. पावसाळ्यात भाजीचा अळू सहज मिळतो. त्यामुळे या काळात अळूची भाजी खायला हवी. अळूची भाजी ही एक रानभाजी असल्यामुळे त्याचे आरोग्यावर चांगले फायदे होतात. अळूची घट्ट भाजी, अळूची पातळ भाजी, अळूचं फतफतं असे अनेक प्रकार श्रावणात घरी केले जातात. पूर्वीच्या काळी गावाकडे अळूची भाजी थोडं तेल आणि हिरव्या मिरचीवर केली जायची. जास्त जिन्नस न घातला नुसत्या गावच्या पाण्याच्या चवीनेच भाजी स्वादिष्ट व्हायची. बरेच लोक तेव्हा तेलाचा वापर न करता दगडाची म्हणजेच ठिकरीची फोडणी अळूच्या भाजीला देत असत. ज्यामुळे भाजीला तेलाचीही गरज लागत नसे. मात्र आजकाल अनेक जिन्नस घालूनही भाजी हवी तशी चविष्ट होत नाही. यासाठीच फॉलो करा ही सोपी रेसिपी… तसंच वाचा या सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi, तोंडली भाजी रेसिपी, स्वादिष्ट आणि रूचकर (Tondli Chi Bhaji), अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
अळूची चविष्ट भाजी – Aluchi Bhaji Recipe In Marathi
अळूची भाजी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की यासाठी वडीचा नाही तर भाजीचा अळू तुम्हाला घ्यावा लागेल. शिवाय पावसाळ्यात अळू खाजरा असल्यामुळे भाजी निवडताना हाताला तेल लावा आणि भाजीत चिंच गूळ घालायला विसरू नका.
साहित्य –
- पाच सहा अळूची पाने
- अर्धी वाटी शेंगदाणे
- दोन चमचे चणाडाळ
- चिंचेचा छोटा गोळा
- गूळाचा खडा
- दोन चमचे गोडा मसाला
- चवीपुरतं मीठ
- दोन हिरव्या मिरच्या
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट
अळूची भाजी रेसिपी –
अळूची पाने स्वच्छ धुवून, पुसून, देठ वेगळे करून पाने आणि देठ बारीक चिरावेशेंगदाणे आणि चणाडाळ दोन तास आधी पाण्यात भिजत घालावे आणि कुकरमध्ये उकडून घ्यावे.फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवावी आणि त्यात तेल, मोहरी, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, हिंगाची फोडणी करावी. त्यावर बारीक चिरलेली अळूची पाने आणि देठ टाकावे. मीठ टाकून दहा मिनीटे भाजी शिजू द्यावी. भाजी घट्ट वाटत असेल तर वरून थोडं कोमट पाणी शिंपडावेशेंगदाणे आणि चणाडाळ टाकून ते भाजीत मिक्स करावे.चिंचेचा कोळ आणि गुळाचे पाणी टाकून भाजी परतून घ्यावी. वरून गोडा मसाला टाकून भाजीला फक्त एक वाफ द्यावी. गरम वाफाळता भात अथवा भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते.
आम्ही शेअर केलेली अळूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ती तुम्ही घरी ट्राय केली का हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक