home / Recipes
tondlichi bhaji recipe in marathi

तोंडली भाजी रेसिपी, स्वादिष्ट आणि रूचकर (Tondli Chi Bhaji)

तोंडली (Tondli Chi Bhaji) ही एक अतिशय पौष्टिक फळभाजी आहे. मसालेभातापासून विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये तोंडली वापरण्यात येतात. तोंडल्याची भाजी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असूनही अनेकांना ती आवडत नाही. या भाजीमध्ये अनेक पोषक तत्त्व दडलेली आहेत. तोंडलीच्या भाजीमधून शरीराला पुरेसे व्हिटॅमिन्स, लोह, फायबर्स, कॅल्शिअम आणि इतर पोषक घटक मिळतात. शिवाय तोंडली पचायला हलकी असल्यामुळे तोंडलीची भाजी खाण्यामुळे पचनशक्ती सुधारते. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी तोंडलीची भाजी खाणं फायदेशीर ठरू शकतं. तोंडली थोडी चवीला तुरट असल्यामुळे ती खाण्याचा कंटाळा येतो. मात्र जर तोंडलीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवली तर ती घरच्यांना नक्कीच आवडू शकते. यासाठीच ट्राय करा या तोंडली भाजी रेसिपी (Tondalichi Bhaji Recipe In Marathi)

अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)

तोंडलीची सुकी भाजी (Fry Tondli Chi Bhaji)

Tondlichi Bhaji Recipe In Marathi

तोंडलीची भाजी (Tondli Chi Bhaji In Marathi) रस्सा आणि सुकी अशा दोन्ही पद्धतीने बनवली जाते. जर ही भाजी पोळीसोबत खायची असेल अथवा सोबत फक्त वरणभात असेल तर सुकी तोंडलीची भाजी फारच रूचकर लागते.

साहित्य – 

 • पाव किलो मध्यम आकाराची तोंडली
 • एक मोठा कांदा
 • दोन हिरव्या मिरच्या
 • एक चमचा लसणाची पेस्ट
 • अर्धी वाटी ओले खोबरे
 • हिंग
 • जिरे
 • कोथिंबीर
 • दाण्याचा कुट
 • मीठ

कृती –

तोंडली स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या.तुमच्या आवडीनुसार आडवी अथवा उभी बारीक चिरून घ्या.

फ्राय पॅनमध्ये तेल गरम करा त्यात हिंग, हळद आणि जिरे परतून  घ्या.कांदा टाकून चांगला रंग येईपर्यंत परता.लसणाची पेस्ट परतून घ्या.त्यात चिरलेली तोंडली टाकून चांगली परतून घ्याभाजी वाफेवर शिजवून घ्या.भाजी शिजल्यावर वरून मीठ, दाण्याचा कूट, कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरा.

झणझणीत ठेचा रेसिपी, खास आहेत महाराष्ट्रीयन पद्धती (Thecha Recipe In Marathi)

तोंडलीच्या काचऱ्या (Kachrya Tondlichi Bhaji Recipe In Marathi)

Kachrya Tondlichi Bhaji Recipe In Marathi

आजवर तुम्ही बटाटे, केळी, रताळे, सुरण याचे काप अथवा काचऱ्या नक्कीच खाल्या असतील. पण त्याच पद्धतीने तुम्ही तोंडल्याच्या काचऱ्या अथवा काचऱ्या भाजी करू शकता. 

साहित्य –

 • मोठ्या आकाराची पाव किलो तोंडली
 • एक चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • हळद
 • अर्धा चमचा जिरे पावडर
 • अर्धा चमचा धणे पावडर
 • अर्धा चमचा गरम मसाला

कृती –

तोंडली स्वच्छ धुवून घ्या.स्वच्छ करून तोंडल्याचे उभे अथवा आडवे जाड काप करा. सर्व मसाले आणि मीठ एकत्र करा आणि ते कापाला लावून घ्या.तांदळाच्या पीठात घोळवून काचऱ्या शॅलो फ्राय करा. 

बटाट्याची विविध रेसिपी मराठीत (Batata Recipe In Marathi)

तोंडली आणि बटाटा भाजी (Batata Tondli Chi Bhaji)

Batata Tondlichi Bhaji Recipe In Marathi

तोंडलीची भाजी (Tondli Chi Bhaji In Marathi) थोडी तुरट लागत असल्यामुळे तिच्यासोबत एखादी दुसरी भाजी मिसळून तुम्ही तिची चव बॅलन्स करू शकता. यासाठी तोंडल्याच्या भाजीसोबत बटाटा मिक्स करा. 

साहित्य –

 • पाव किलो तोंडली
 • एक मध्यम आकाराचा बटाटा
 • एक कांदा
 • एक चमचा लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट
 • कोथिंबीर
 • अर्धी वाटीओले खोबरे
 • जिरे
 • हिंग
 • मीठ
 • कढीपत्ता
 • हळद

कृती –

तोंडली स्वच्छ धुवून पुसून घ्यातुमच्या आवडीनुसार ती उभी अथवा आडवी चिरून घ्या.बटाट्याच्या पातळ फोडी करून घ्याकढईत कांदा परतून घ्या. त्यात लसूण आणि मिरचीची पेस्ट मिसळा.हिंग, कडिपत्ता, जिरे  आणि हळद त्यात टाका आणि परतून घ्या. वरून तोंडली आणि बटाटा टाकाभाजी वाफेवर शिजवून घ्या  आणि त्यात चवीनुसार मीठ टाका.भाजी शिजल्यावर कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस टाकून भाजी पोळीसोबत सर्व्ह करा.

सोयाबीनची भाजी (Soybean Bhaji Recipe In Marathi)

भरलेली तोंडली (Bharli Tondli Chi Bhaji)

Tondlichi Bhaji Recipe In Marathi

जर तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने केलेली सुकी अथवा परतलेली तोंडल्याची भाजी आवडत नसेल तर वेगळी पद्धत ट्राय करण्यासाठी तुम्ही भरलेली तोंडली बनवू शकता.

साहित्य –

 • पाव किलो तोंडली
 • तेल
 • जिरे
 • मोहरी
 • हळद
 • लाल तिखट
 • एक चमचा सुके खोबरे
 • गूळ आणि चिंचेचा कोळ
 • एक चमचा दाण्याचे कूट
 • धणे पावडर
 • जिरे पावडर
 • गोडा मसाला
 • मीठ

कृती –

तोंडली धुवून स्वच्छ पुसून घ्यावी.तोंडल्याचे देठ आणि मागचा भाग कापून भरता येतील अशी एक चिर द्यावी.त्यानंतर सुके खोबरे, दाण्याचा कूट, सर्व मसाले, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ जाडसरवाटून एकत्र मसाला तयार करावा.हा मसाला तोंडल्यामध्ये भरून घ्यावा. कढईत फोडणी तयार करावी त्यात जिरे, हिंग आणि कडिपत्त्याची फोडणी द्यावी.फोडणीत सर्व भरलेली तोंडली सोडावी. थोडे पाणी शिंपडून वाफेवर ती शिजू द्यावी मग त्यामध्ये मीठ टाकावे. 

तोंडलीची सात्विक भाजी (Satvik Tondlichi Bhaji Recipe In Marathi)

Satvik tondlichi Bhaji Recipe In Marathi

तोंडली (Tondli Chi Bhaji)  ही एक सात्विक भाजी आहे. कारण ही भाजी खाण्यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट गॅसेस आणि पोटाचे विकार होऊ नयेत यासाठी नियमित तोंडलीची भाजी पथ्याची ठरू शकते.

साहित्य –

 • पाव किलो तोंडली
 • कढीपत्ता
 • एक चमचा दाण्याचे कूट
 • दोन चार हिरव्या मिरच्या
 • पाव वाटी ओले खोबरे
 • जिरे
 • हिंग
 • हळद
 • मीठ
 • कोथिंबीर

कृती –

तोंडली धुवून स्वच्छ पुसून घ्यावी.बारीक चिरून त्याचे काप करावे.कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे, हळद, कढीपत्त्याची फोडणी तयार करावी.हिरवी मिरची टाकून चांगले परतून घ्यावे.फोडणीत तोंडलीचे फोड टाकून चांगले परतून घ्यावे.भाजी वाफेवर शिजू द्यावी.वरून फक्त मीठ  दाण्याचे कूट आणि ओले खोबरे पेरावे.

तोंडलीची रस्सा भाजी (Tondli Chi Rassa Bhaji)

Tondlichi Bhaji Recipe In Marathi

घरात मस्तपैकी भाकरी आणि भाजीचा बेत करणार असाल तर भाकरीसोबत तोंडल्याची रस्सा भाजी (Tondli Chi Bhaji)  खूपच छान लागते. तोंडल्याची सुक्या भाजीप्रमाणेच तोंडल्याची रस्सा भाजीदेखील खूपच चविष्ट असते.

साहित्य –

 • पाव किलो तोंडली
 • जिरे
 • हळद
 • हिंग
 • मीठ
 • कढीपत्ता
 • दाण्याचे कुट
 • गोडा मसाला
 • लाल तिखट

कृती –

तोंडली स्वच्छ धुवून पुसून घ्याएका तोंडलीचे उभे सहा अथवा आडवे सात आठ अशा पद्धतीने पातळ काप करा.चिरलेली तोंडली स्टीमरमध्ये वाफवून घ्या.कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी तयार करा. त्यात लाल तिखट, गोडा मसाला मिसळाचांगले परतून घ्या आणि त्यात वाफवलेली तोंडली टाका.गरजेनुसार पाणी टाकून मीठ आणि दाण्याचा कूट टाका. गरम गरम भात आणि भाकरीसोबत ही रस्सा भाजी सर्व्ह करा.

मसालेदार तोंडली (Spicy Tondalichi Bhaji In Marathi)

Tondlichi Bhaji Recipe In Marathi

एखादी भाजी तेव्हाच चविष्ट लागते जेव्हा त्या भाजीमध्ये विविध प्रकारचे मसाले असतात. तोंडलीची भाजी(Tondli Chi Bhaji) देखील मसालेदार आणि चमचमीत असेल तर घरातील सर्वच मंडळी ती आवडीने खातील. यासाठी ही हटके रेसिपी जरूर ट्राय करा.

साहित्य –

 • पाव किलो तोंडली
 • एक बटाटा
 • एक कांदा
 • एक टोमॅटो
 • हिंग
 • जिरे
 • तेल 
 • मीठ
 • हळद
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चमचा गरम मसाला
 • अर्धा चमचा जिरे पावडर
 • अर्धा चमचा धणे पावडर
 • दोन चमचे बेसण
 • दोन चमचे साय, क्रीम
 • एक चमचा आलं लसणाची पेस्ट
 • एक चमचा कसूरी मेथी

कृती – 

तोंडली स्वच्छ धुवून पुसून घ्या. कांदा, बटाटा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.तोंडल्याचे चार तुकडे करा. कढईत तेल गरम करून जिरे आणि हिंगावर तोंडलीचे तुकडे परतून घ्या.कढईतून परतलेली तोंडली बाहेर काढून ठेवाकढईत चिरलेल्या बटाट्याच्या फोडी परतून घ्या.पुन्हा कढईत थोडं तेल टाका आणि त्यात जिरे, तेजपत्ता, कांदा परतून घ्या.परतलेल्या कांद्यामध्ये थोडं बेसण टाका आणि परतून घ्या.त्यानंतर ग्रेव्हीमध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून परतून घ्या.सर्व मसाले टाका आणि थोडं पाणी टाकून ते एकजीव करा.टोमॅटो टाकून परतून घ्या आणि झाकून वाफेवर शिजू द्या.थोडी साय अथवा क्रीम मिसळा आणि ग्रेव्ही तयार करा. थोडी कसूरी मेथी टाका आणि वरून तोंडल्याच्या आणि बटाट्याच्या परतलेल्या फोडी मिसळा.सर्व साहित्य एकत्र करा आणि वाफेवर शिजू द्या. गरज असल्यास थोडं पाणी टाकून तुम्ही ही रस्सा भाजी करू शकता अथवा सुकी भाजीदेखील करू शकता. 

तोंडली उपकरी (Tondlichi Upcurry) 

Tandlachi Upcurry In Marathi

कोकणात वेगवेगळ्या पदार्थांपासून उपकरी केली जाते. आंबा आणि काजू प्रमाणेच तुम्ही काजू आणि तोंडल्याची उपकरी करू शकता. यासाठीच ट्राय करा हा भाजीचा एक हटके प्रकार

साहित्य –

 • पाव किलो तोंडली
 • वाटीभर ओले काजू
 • दोन ते तीन हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा उडीद डाळ
 • गूळ
 • चवीपुरते मीठ
 • जिरे
 • हिंग
 • मोहरी
 • कढीपत्ता
 • हळद

कृती –

तोंडली धुवून स्वच्छ करा आणि चिरून घ्या.ओले काजू सोलून घ्या, काजूचा चिकटपणा जाण्यासाठी थोडावेळ गरम पाण्यात ठेवा. कढईत तेल गरम करा आणि त्यात हिंग, जिरे, मोहरी, हळद आणि उडीद डाळ परतून घ्या.हिरवी मिरची चिरून टाका आणि परतून घ्या.काजू आणि तोंडलीचे तुकडे टाका आणि परतून घ्या.भाजी वाफेवर शिजू द्या. शिजली की थोडं गरम पाणी टाकून पुन्हा शिजवा.चवीनुसार मीठ आणि गूळ टाका आणि गरम गरम सर्व्ह करा. 

18 Oct 2021
good points

Read More

read more articles like this