लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यासाठी अनेक सेलिब्रेटी कपल सज्ज झाले आहे. या वर्ष अखेरीस नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही सेलिब्रेटीजचा लग्नसोहळा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. एखाद्या सेलिब्रेटीचे लग्न म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. त्या सेलिब्रेटीच्या लग्नाची तारीख, निमंत्रण पत्रिका, ब्रायडल लुक, लग्न स्थळ, लग्न विधी असं सारं काही त्यांना जाणून घ्यायचं असतं. आता तर लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबद्ध होणार असून त्यांच्या लग्नाची तारीखदेखील जाहीर झाली आहे.
आलिया भटच्या बॉलीवूड डेब्यूसाठी या गोष्टीचा केला त्याग, सोनी राजदान यांचा खुलासा
डिसेंबरमध्ये रंगणार अंकिता-विकीचा लग्नसोहळा
अंकिता लोखंडे आणि विकी जैन काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघंही बऱ्याचदा एकत्र स्पॉट होतात. विकी जैन हा एक उद्योगपती आणि चित्रपट निर्माता आहे. अंकिताशी त्याची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. सुरूवातीला त्यांच्यात फक्त मैत्री होती मात्र हळू हळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. अंकिताला पहिल्या ब्रेकअपमधून बाहेर काढण्यासाठी विकीने खूप मदत केली होती. अंकिताचे आधी दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत नातं होतं. मात्र 2016 साली दोघंही रितसर वेगळे झाले. त्यानंतर विकी अंकिताच्या आयुष्यात आला. अंकिताच्या घरी कोणताही कार्यक्रम असो विकी जावयासारखाच वावरताना दिसतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता अंकिता आणि विकीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये या दोघांचे लग्न असण्याची शक्यता आहे. यासाठी अंकिताने डिसेंबर महिन्यातील 12, 13 आणि 14 या तारखा काढलेल्या आहे. यातील सोयीच्या शूभमुर्हुतावर लग्न विधी सुरू होण्याची शक्यता आहे.
‘क्रिश 4’ साठी ह्रतिक रोशन बनला गायक,एक्शनसोबत दाखवणार गाण्याची जादू
कसा असणार अंकिता-विकीचा विवाहसोहळा
अंकिता लोखंडेचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे सहाजिकच तिच्या लग्नाची सर्व माहिती चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायची असणार. असं असलं तरी अंकिता ग्रॅंड वेडिंग करणार नाही आहे. अंकिताला फक्त कुटुंब आणि थोड्या मित्रपरिवारासोबत विकीसोबत विधीवत आणि साधेपणाने लग्न करायचं आहे. अंकिता अथवा विकीकडून हा लग्नसोहळा कसा असेल याची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र लग्नाची तारीख ठरल्यामुळे अंकिताच्या घरी लगीनघाई मात्र नक्कीच सुरू झाली आहे. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या असून पाहुण्यांना आमंत्रण देण्यास सुरूवात झाल्याची सध्या चर्चा आहे.