ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘क्रिश 4’ साठी ह्रतिक रोशन बनला गायक,एक्शनसोबत दाखवणार गाण्याची जादू

‘क्रिश 4’ साठी ह्रतिक रोशन बनला गायक,एक्शनसोबत दाखवणार गाण्याची जादू

ह्रतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपट क्रिश 4 च्या तयारीत सध्या व्यस्त आहे. क्रिशच्या प्रत्येक सिरिजबद्दल चाहत्यांना नेहमीच कुतूहल वाटलं आहे. कारण कोई मिल गया, क्रिश, क्रिश 2, क्रिश 3 या सर्व चित्रपटातून चाहत्यांना काहीतरी नवं गवसलं आहे. ज्यामुळे आता क्रिश 4 ची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टचं काम फायनल स्टेजवर आहे. मात्र या दरम्यानच निर्माता राकेश रोशन यांनी या चित्रपटाबद्दल एक सरप्राइज चाहत्यांसमोर उघड केलं आहे. या चित्रपटात ह्रतिक रोशनच्या एक्शनची कमाल तर पाहायला मिळणारच आहे मात्र एवढंच नाही तर यात ह्रतिक चक्क एक गाणं देखील गाणार आहे. 

कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चं शूटिंग सुरू, अल्लू अर्जूनच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक

‘क्रिश 4’ कसा असेल

ह्रतिक रोशनने जूनमध्ये त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. कोई मिल गयाला या वर्षी पंधरा वर्षे झाली आहेत. ही घोषणा करताना ह्रतिकने शेअर केलं होतं की, भूतकाळ घडून गेला आणि पाहू या भविष्यात काय घडतंय ते… ज्यातून ह्रतिकने क्रिश 4 मध्ये नेमकं काय असणार याची कल्पना दिली होती. आता या चित्रपटाबद्दल संगीतकार राजेश रोशनने एक खुलासा केला आहे. ज्यामुळे चित्रपटाबद्दल कुतूहल अधिक वाढलं आहे. त्यांच्यामते या चित्रपटात चाहत्यांना ह्रतिक रोशनचा एक नवा अंदाज पाहायला मिळेल. राजेश रोशन हे राकेश रोशन यांचे भाऊ असून चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत. आता ह्रतिक रोशनही या चित्रपटासाठी गायक होण्याच्या तयारीला लागला आहे. ज्यामुळे रोशन कुटुंबातील सर्वच गुण या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 

रोहीत शेट्टीने दिली रणवीर सिंहला धमकी, म्हणाला ‘सूर्यवंशी’मधील

ADVERTISEMENT

‘क्रिश 4’ बद्दल वाढतंय कुतूहल

क्रिशच्या आधीच्या सीक्वलमध्ये पुढे काय घडणार याबद्दल उत्सुकता होतीच. मात्र क्रिश 4 मध्ये या उत्सुकतेसोबत भन्नाट एक्शन, डान्स आणि ह्रतिकच्या गाण्याची मेजवानीही असणार आहे. ह्रतिक पहिल्यांदाच चित्रपटात गाणार नाही आहे. त्याने याआधीही असे प्रयोग केलेले आहेत. जिंदगी मिलेगी ना दोबारा या चित्रपटात ह्रतिकने सेनोरिटा गाण्यात आणि दी काइट्स चित्रपटामध्येही एका ठिकाणी ह्रतिकने गाणं गायलं होतं. ह्रतिकचा डान्स आणि एक्शन जबरदस्त आहेच पण आता एका पूर्ण गाण्यातून त्याचा हा नवा पैलू सर्वासमोर येणार आहे. क्रिश 4 सोबतच ह्रतिक फायटर या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तो भारतीय पायलटच्या भूमिकेत असेल. 

Bigg Boss Marathi:घरात आलेत देवदूत आणि राक्षस, होणार राडा

28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT