महिलांना शॉपिंग करणे आणि निरनिराळे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्याची आवड असते. त्यामुळे वरचेवर तुम्ही सौंदर्य प्रसाधने खरेदी करत असता. मात्र तुम्ही तुमचा हेअर ब्रश कधी खरेदी केला होता आणि तो तुमच्या केसांसाठी योग्य आहे का हे तुम्हाला माहीत आहे का ? हेअर ब्रश खरेदी करताना आपण फार विचार करत नाही. दुकानदार देईल तो किंवा खरेदी करताना तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही हेअर ब्रश विकत घेता. मात्र प्रत्येक केसांच्या प्रकारासाठी त्याला योग्य असा हेअर ब्रश खरेदी करायला हवा. यासाठीच जाणून घ्या केसांसाठी हेअर ब्रश कसा निवडावा
हेअर ब्रश निवडताना काय काळजी घ्यावी
हेअर ब्रशमुळे केस सेट केले जातातच शिवाय यामुळे तुमच्या स्काल्पला चांगली मालिश होते. ज्यामुळे स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबूत आणि चमकदार होतात. केसांमध्ये अडकलेले धुळीचे कण, प्रदूषण हेअर ब्रश केल्यामुळे बाहेर टाकले जाते. बऱ्याचजा केसांची स्टाईल करण्यासाठी जसं की केस स्ट्रेट करण्यासाठी अथवा कर्ल करण्यासाठी हेअरर ब्रश खरेदी केले जातात. मात्र हेअर ब्रश खरेदी करताना तुम्ही हेअर ब्रशचे हात म्हणजेच Bristle तपासून पाहायला हवे.
हेअर ब्रशचे प्रकार
बाजारात विविध प्रकारचे हेअर ब्रश मिळतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि केसांच्या प्रकारानुसार यातील हेअर ब्रश निवडू शकता.
नॅचरल Bristle असलेला हेअर ब्रश
नैसर्गिक (Bristle) असलेले हेअर ब्रश केसांसाठी अतिशय चांगले असतात. या ब्रशमुळे तुमच्या केसांमधील सीबम (Sebum) अर्थात नैसर्गिक तेल निघून जात नाही. या ब्रशचा वापर केल्यामुळे केसांमधील मॉईस्चराईझ कमी होत नाही आणि केस मऊ आणि मुलायम राहतात. मात्र या प्रकारचे ब्रश खूप महाग असतात. अशा प्रकारचे ब्रश महाग असले तरी त्यांच्यावर पैसे खर्च करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. स्ट्रेट केसांना सिल्की करण्यासाठी तुम्ही हा हेअर ब्रश वापरू शकता.
सिथेंटिक Bristle असलेला हेअर ब्रश
ज्यांचे केस कुरळे अथवा फ्रिजी असतात त्यांच्यासाठी हा हेअर ब्रश अतिशय उत्तम असतो. कारण हा हेअर ब्रश इतर हेअर ब्रशसारखा तुमच्या केसांमध्ये अडकत नाही. ज्यामुळे केस अधिक गुंतत नाहीत आणि पटकन सेट होतात.मात्र हा हेअर ब्रश स्काल्पसाठी हळूवार नसतो त्यामुळे तो वापरण्याची पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी. घनदाट आणि कुरळ्या केसांसाठी हा ब्रश अगदी फायदेशीर आहे.
मिक्स्ड Bristle असलेला हेअर ब्रश
हा हेअर ब्रश सर्व प्रकारच्या केसांसाठी आणि नियमित वापरासाठी उपयुक्त आहे. कारण या हेअर ब्रशमध्ये नैचरल आणि सिथेंटिक असे दोन्ही प्रकारचे Bristle असतात. नॉर्मल ते जाड अशा सर्व प्रकारच्या केसांसाठी हेअर स्टायलिस्ट अशा प्रकारचा हेअर ब्रश वापरतात. या प्रकारचा हेअर ब्रश तुम्हाला सहज उपलब्ध होतो आणि तो फार महागदेखील नसतो.
पॅडल Bristle हेअर ब्रश
या प्रकारच्या हेअर Bristle एका हवा भरलेल्या गादीप्रमाणे असलेल्या भागावर लावलेले असतात. ज्यामुळे तुम्ही जेव्हा हा ब्रश वापरता तेव्हा तुमच्या स्काल्पवर गरजेनुसार दाब पडतो. ज्यामुळे स्काल्पला दुखापत न होता तुमचे गुंतलेले केस सेट होतात. केस सरळ करण्यासाठी नियमित वापरासाठी हा हेअर ब्रश नक्कीच चांगला आहे.
राऊंड हेअर ब्रश
या प्रकारचा हेअर ब्रश केसांची स्टाईल करण्यासाठी वापरला जातो. केस ब्लो ड्राय करण्यासाठी हा हेअर ब्रश वापरणं फायद्याचं ठरतं. कारण या हेअर ब्रशला छोटे छोटे छिद्र असतात. ज्यामुळे ड्रायरमधील गरम हवा केसांवर योग्य पद्धतीने आणि एकसमान पसरते. केसांना स्टाईल करण्यासाठी, व्हॉल्युम वाढवण्यासाठी, टेक्चर देण्यासाठी, केस स्ट्रेट करण्यासाठी तुम्हाला राऊंड अथा वेंडेट हेअर ब्रश नक्कीच वापरता येतात.
Detangler हेअर ब्रश
कुरळ्या केसांसाठी अथवा ज्यांच्या केसांमध्ये सतत गुंता होतो अशा लोकांनी हा ब्रश वापरावा. विशेष म्हणजे तुम्ही ओल्या केसांचा गुंता सोडवण्यासाठी Detangler हेअर ब्रश नक्कीच वापरू शकता. या हेअर ब्रशची रचना ओल्या केसांसाठी करण्यात आलेली असते. आजकाल यामध्ये ड्राय आणि वेट केसांसाठी असे दोन्ही प्रकार मिळतात. मात्र या ब्रशचा वापर केल्यामुळे केस जास्त प्रमाणात तुटत नाहीत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
कंगव्यापेक्षा केसांसाठी का फायदेशीर आहे हेअर ब्रश… जाणून घ्या
हेअर ब्रश करताना या चुका करणं पडेल महागात, वेळीच व्हा सावध