ADVERTISEMENT
home / Fitness
Benefits of stretching before workout in marathi

वर्कआऊटआधी स्ट्रेचिंग करण्याचे हे आहेत फायदे, जाणून घ्या

निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा आहे. कारण यामुळेच तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते. यासाठी जाणून घ्या आरोग्यदायी टिप्स मराठीतून | Health Tips In Marathi आणि Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व .. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला आरोग्याचं महत्त्व पटलं आहे. त्यामुळे आता अनेक लोक नियमित व्यायाम करण्यावर भर देताना दिसत आहेत. कामाच्या गडबडीत काही वेळ व्यायामासाठी काढणं सोपं नसलं तरी कठीण नक्कीच नाही. मात्र अनेकांना व्यायामासाठी वेळ काढता येतो. मात्र वार्मअप करण्याची ते टाळाटाळ करतात. स्ट्रेचिंग हा उत्तम वार्मअप आहे. म्हणूनच जाणून घ्या वर्कआऊट करण्याआधी स्ट्रेचिंग का करावं. यासोबतच डान्स वर्कआऊट करुन करा वजन कमी, जाणून घ्या कसे (Dance Workout For Weight Loss)

वर्कआऊटआधी स्ट्रेचिंग करण्याचे फायदे

वर्कआऊट आधी स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला पुढे कठीण आसन करताना जास्त त्रास होत नाही. जाणून घ्या फायदे

व्यायामापूर्वी शरीर तयार होतं 

कठीण वर्कआऊट करताना अनेक वेळा स्नायू जास्त ताणले जातात. अचानक शरीरात होणारे बदल शरीरासाठी त्रासदायक ठरतात आणि अंग दुखू लागतं. असं झालं तर तुम्हाला नंतर व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पण जर तुम्ही वर्कआऊटची सुरुवात स्ट्रेचिंगने केली तर तुमचे शरीर आधीच कठीण व्यायामांसाठी तयार राहते. 

ताण कमी होतो

Benefits of stretching before workout in marathi

जर तुम्ही व्यायामाची सुरूवात स्ट्रेचिंगने केली तर तुमचा ताण कमी होतो. कधी कधी मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेचिंगचा चांगला फायदा होतो. शरीराला स्ट्रेचिंग करण्याची सवय असेल तर एखाद्या दिवशी व्यायाम स्किप केला तरी तुम्ही फक्त स्ट्रेचिंग करून निवांत राहू शकता.

ADVERTISEMENT

स्नायूंना आराम मिळतो

स्टेचिंग न करता जेव्हा तुम्ही व्यायामाला सुरुवात करता तेव्हा स्नायू मोठ्या प्रमाणावर ताणले जातात. स्नायूंवर पडलेला हा ताण असह्य असतो. पण वर्कआऊट आधी स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या स्नायूंना ताण सहन करण्याची ताकद मिळते. ज्यामुळे कठीण व्यायाम करूनही तुमचे स्नायू आरामदायक स्थितीत राहतात.

रक्तसंचार सुधारतो

शरीर निरोगी राहण्यासाठी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहणं गरजेचं असतं. व्यायामाने शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढणं शक्य नसेल तेव्हा फक्त स्ट्रेचिंग करा. कारण स्ट्रेचिंगसाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय तुम्ही कुठेही स्ट्रेचिंग करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहते. 

लवचिकता वाढते

स्ट्रेचिंगमुळे तुमचे शरीर पुरेसं लवचिक होतं. तुमचं शरीर व्यायामापेक्षा स्ट्रेचिंगमुळे जास्त लवकर लवचिक होतं. म्हणूनच व्यायामाआधी स्ट्रेचिंग केल्याने तुम्हाला कठीण व्यायाम करणं जास्त सोपं जातं. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT