ADVERTISEMENT
home / फॅशन
Best lehenga combination for wedding season in marathi

लग्नकार्यासाठी परफेक्ट आहेत हे लेहंगा कॉम्बिनेशन

वेडिंग सीझन सुरू झाला की ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांची खरेदीची लगबग सुरू होते. लग्नात वधूवरांचे कपडे आकर्षक असतातच पण आजकाल त्यांचे मित्रमैत्रीण आणि नातेवाईकही परफेक्ट लुक्ससाठी खूप मेहनत घेतात. त्यामुळे तुमच्या एखाद्या जवळच्या मैत्रीण अथवा भावडाचं लग्न ठरलं असेल तर तुमच्या मनात वेडिंग आऊटफिटचं स्वप्नरंजन नक्कीच सुरू झालं असेल. यासाठी आम्ही तुमच्यासोबत असे काही लेहंगा कॉम्बिनेशन शेअर करत आहोत जे सध्या ट्रेंडमध्ये आहेत. यासोबतच जाणून घ्या मराठी उखाणे खास सणांसाठी (Marathi Ukhane For Female And Male)

लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा

भारतीय लग्नकार्य लाल रंगाशिवाय अपूर्णच आहे. लग्नात वधूवरांचे कपडे लाल रंगाचे असतातच पण त्यांच्यासोबत वेडिंग थीममध्ये नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीचे ड्रेस लाल रंगाचे असू शकतात. जर तुमच्या घरातील लग्नाची थीम लाल रंगाची असेल तर लाल आणि गोल्डन रंगाच्या कॉम्बिनेशनचा विचार जररू करा. कारण लाल एक क्लासी रंग आहे जो सर्वांवर उठून दिसतो. लाल आणि गोल्डन रंग जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो लुक नक्कीच रॉयल दिसू शकतो. बॉलीवूड वेडिंगमध्येही लाल रंग आवर्जून वापरला जातो. 

lehenga combination for wedding season

लग्नात हेव्ही वर्क केलेला लेहंगा वापरणार तर असा ड्रेप करा दुपट्टा

मस्टर्ड आणि फॉरेस्ट ग्रीन लेहंगा

वास्तविक पिवळा आणि हिरवा रंग आपण नेहमी वापरत नाही. मात्र लग्नकार्यात पिवळ्या आणि हिरव्या रंगाला फार महत्त्व आहे. त्यामुळे लग्नाच्या थीमप्रमाणे तुम्हाला पिवळ्या अथवा हिरव्या रंगाचे कपडे एखाद्या विधीसाठी नक्कीच वापरावे लागू शकतात. असं असेल तर तुम्ही मस्टर्ड आणि फॉरेस्ट ग्रीन रंगाचे कॉम्बिनेशन तुमच्या वेडिंग लेहंग्यामध्ये करू शकता. पिवळा रंग उत्साह तर हिरवा रंग समृद्धीचं प्रतिक असल्यामुळे हे रंग एकत्र आल्यावर एक छान वातावरण निर्माण करतात.

ADVERTISEMENT
lehenga combination for wedding season

नववधूसाठी आधुनिक भारतीय दागिन्यांचा ट्रेंड, लेटेस्ट डिझाईन्स

मस्टर्ड आणि लाल रंगाचा लेहंगा

लग्नाचे विधी असो वा रिसेप्शन तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी लाल आणि मस्टर्ड रंगाची निवड करू शकता. कारण हे दोन्ही रंग वेडिंग सीझनमध्ये खुलून दिसतात. अशा कॉम्बिनेशनवर तुम्ही कोणतेही हेव्ही दागदागिने परिधान करू शकता. संगीताच्या कार्यक्रमासाठी तर हा लुक अगदी परफेक्ट दिसू शकतो. 

lehenga combination for wedding season

हळदी समारंभासाठी ट्राय करा हे पिवळ्या रंगाचे एथनिक आऊटफिट

रूबी रेड अथवा केशरी रंगाचा लेंहगा –

लाल आणि थोड्या डार्क रंगाची शेड नको असेल तर तुम्ही रूबी रेडचा वापर लेहंग्यासाठी करू शकता. आजकाल रूबी रेजसोबत केशरी रंगाच्या कॉम्बिनेशनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण हा लुक अतिशय क्लासिक आणि हटके दिसतो. तुम्हाला या लुकमुळे दिवसभर उत्साही आणि छान वाटू शकतं. कारण हे कॉम्बिनेशन इतर रंगांपेक्षा थोडं हटके मजेशीर आहे. 

ADVERTISEMENT

lehenga combination for wedding season

पेस्टल कॉम्बिनेशन असलेला लेंहगा –

लग्नात आजकाल पेस्टल कॉम्बिनेशनचे आऊटफिट घालण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे जर तुम्हाला लाल, पिवळा, हिरवा असे पारंपरिक रंग नको असतील. तर एक हटके लुक करण्यासाठी तुम्ही सी ग्रीन, सॉफ्ट पिंक, सॉफ्ट ग्रे, असे कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. अशा रंगामुळे तुम्ही वधूवरांपेक्षाल जास्त उठूनही दिसणार नाही पण तुमच्या लुकवरून इतरांची नजरही हलणार नाही.

lehenga combination for wedding season

आम्ही शेअर केलेले हे वेडिंग लुक्स तुम्हाला कसे वाटले आणि यातील कोणते लेहंगा कॉम्बिशनेशन तुम्ही लग्नकार्यासाठी निवडले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

18 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT