कोरोनामुळे गेली दोन वर्षे फिरण्याचे प्रमाण थोडं कमी झालं आहे. मात्र आता सर्व पूर्ववत होताना सर्व पुन्हा एकदा त्यांच्या बकेटलिस्टमध्ये असलेल्या पर्यंटन स्थळांना भेट देत आहेत. सोशल मीडियावर एखाद्याचा बर्फात खेळताना फोटो अथवा व्हिडिओ पाहिला की तुम्हालाही बर्फाळ प्रदेशाला भेट द्यावी असं वाटू लागतं. भारतातही अशी अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हिमवर्षावाचा आनंद लुटू शकता. मात्र त्यासाठी तिथे हिमवर्षाव नेमका कधी आणि कुठे होतो हे तुम्हाला माहीत असायला हवं. यासोबतच वाचा भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi)
काश्मिर –
काश्मिर म्हणजे भारताचं नंदनवन… या ठिकाणी एकदा तरी जावं अशी अनेकांची इच्छा असते. हिवाळ्यात काश्मिर अधिक सुंदर दिसतं. काश्मिरमधील गुलमर्गला भारताचं स्की डेस्टिनेशन म्हटलं जातं. कारण इथलं सौदर्य परदेशातील कोणत्याही ठिकाणाला मागे टाकेल इतकं दिलखेचक आहे. हिमालयाची उंच शिखरं आणि चिनार वृक्ष, उंच उंच पर्वत रांगा आणि खोल खोल दऱ्या, तलाव, शिकारा सफर, हाऊसबोट अशा अनेक गोष्टींचा इथे तुम्ही आनंद लुटू शकता. त्यामुळे यंदा बर्फ पाहण्यासाठी काश्मिरला जरूर जा.
लेह लडाख –
लेह लडाखमध्ये जाऊन अती थंडी आणि अॅडवेंचरचा आनंद घेणं तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असेल. वास्तविक इथली थंडी सहन होण्याचा काळ सप्टेंबरनंतरचा आहे. मात्र ऑक्टोबर ते एप्रिलमध्ये लेहला जायला मिळालं तर तुम्हाला नक्कीच बर्फाचा वर्षाव पाहायला मिळू शकतो. कारण या काळात इथे मोठ्या प्रमाणवर हिमवर्षाव होतो. लेहला जाताना मात्र तुम्ही स्वतः फिट असणं गरजेचं आहे. कारण तिथलं वातावरण तुम्हाला सहन झालं तरच तिथे राहण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.
जाणून घ्या निसर्गावर कविता आणि सुविचार (Nature Quotes In Marathi)
मनाली
हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्याचा प्लॅन असेल तर मनाली हिमवर्षाव पाहण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला जास्त थंडी सहन होत नसेल पण तरीही बर्फ पाहायचा आहे मग मनाली तुमच्यासाठी बेस्ट आहे. हिवाळ्यात मनाली बर्फाने झाकलं जातं. शिवाय इथे पाहण्यासाठी अनेक सुंदर पर्यंटन स्थळ आहेत. बर्फ पाहण्यासाठी उन्हाळ्यात तुम्हाला थोडं चढून जावं लागेल.
अरूणाचल प्रदेश –
लेहप्रमाणेच अरूणाचलमध्ये अशी अनेक पर्यंटन स्थळ आहेत. जिथे तुम्ही हिमवर्षाव पाहण्यासाठी नक्कीच जाऊ शकता. अरूणाचल मधील तवांगमध्ये नोव्हेंबरपासून तापमान खूप कमी असतं. इतर वेळी ट्रेकिंग आणि अॅडवेंचरसाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. पण हिमवर्षाव पाहण्यासाठी तवांग भारतातील बेस्ट ठिकाण नक्कीच आहे.
सिक्कीम –
सिक्किममध्ये दार्जिलिंग, गॅंगटोक ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. पण जर तुम्हाला बर्फ पाहायचा असेल तर तुम्हाला लाचुंगला जायलाच हवं. लेह लडाखप्रमाणेच लाचुंगला जाताना तुम्हाला हवामानाचा अंदाज घेऊन मगच जायला हवं. कारण कधी कधी या ठिकाणी अती बर्फ पडल्यामुळे वादळ येतं आणि रस्ते बंद होतात. मात्र बर्फ पाहण्यासोबत तुम्ही सिक्किमच्या पर्यंटनाचा आनंदही घेऊ शकता.
उत्तराखंड –
उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी अशी अनेक डेस्टिनेशन आहेत जिथे तुम्हाला मस्त बर्फाचा आनंद घेता येतो. बर्फात स्पोर्टचा आनंद घ्यायचा असेल तर ऑलीला जा. मसूरीमध्ये गेलात तर तुम्हाला अनेक पर्यंटन स्थळं आणि हिमवर्षाव पाहायला मिळेल. चोपटा तर आईस फॉरेस्टच आहे. जो केदारनाथ वाईल्ड लाईफ सेंचुरीचा एक भाग आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बर्फातील जंगल सफारीचा आनंद घेता येईल.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Maharashtra In Marathi)