ADVERTISEMENT
home / Travel in India
Tea Estates in India You Can Explore

चहा प्रेमी असाल तर भारतातील या चहाच्या मळ्यांना जरूर भेट द्या

भारतात कोणत्याही राज्यात तुम्हाला चहा नक्कीच प्यायला मिळेल. भारतीयांमध्ये चहाचं वेड इतकं आहे की जागोजागी चहाचे स्टॉल पाहायला मिळतात. अनेकांची तर सकाळ चहानेच सुरू होते. म्हणूनच या पेयाला अमृतपेय असं म्हटलं जातं. सकाळ असो, संध्याकाळ असो वा रात्री जेवणानंतरची वेळ चहाप्रेमी कधीही चहासाठी तयार असतात. तुम्हीदेखील असे चहाप्रेमी असाल तर तुम्हाला चहापावडरची निर्मिती पाहण्यासाठी आणि निरनिराळ्या टेस्ट चाखण्यासाठी भारतातील या अप्रतिम चहाच्या मळ्यांना भेट द्यायलाच हवी. सोबत शेअर करा 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

जोरहाट, आसाम

चहाचे सर्वात जास्त उत्पादन हे आसाममध्ये केले जाते. त्यामुळे आसाममध्ये गेल्यावर तुम्हाला चहाच्या मळ्यांचे खरे सौंदर्य अनुभवता येते. सुंदर धबधबे आणि हिरवेगार चहाचे मळे आसाममध्ये तुमचं लक्ष वेधून घेतात. चहाप्रेमींसाठी तर आसाममधील जोरहाट (Jorhat) ही पंढरीच ठरू शकते. कारण हा संपूर्ण परिसर चहाच्या सुंगधांने कायम दरवळत असतो. आसाममध्ये तर दर वर्षी चहा महोत्सवच भरला जातो. या महोत्सवामध्ये तुम्हाला चहाची चव चाखायला मिळतेच शिवाय गोल्फ, जंगल सफारी आणि अशा अनेक मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी मिळते. मे ते नोव्हेंबर या ठिकाणी फिरण्यासाठी उत्तम काळ असतो.

दार्जिंलिंग, पश्चिम बंगाल

आसामच्या तुलनेच दार्जिंलिंग (Darjeeling) चा चहा हा थोडा फिक्का असतो. मात्र आरोग्याच्या दृष्टीने हा चहा नक्कीच फायदेशीर ठरतो. या ठिकाणी तुम्हाला मसाला चहासह ग्रीन टीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. काळसर, हिरवी, पांढरी अशा विविध रंगाची चहा तुम्हाला या ठिकाणी सहज मिळते. त्यामुळे दार्जिलिंगमध्ये सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर इथल्या चहाच्या मळ्यांमध्ये जरूर जा. मार्च चे नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ शकता. मी नुकताच दार्जिलिंगमधील या टी इस्टेटमध्ये चहाच्या मळ्यातून भटकंटी आणि फोटोसेशनचा आनंद घेतला. तुम्ही या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये फोटोसेशनही करू शकता.

मुन्नार, केरळ

केरळ हे भारताचं नंदनवन आहे. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. केरळ मधील मुन्नार (Munnar) हे चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. बाजारात मिळणाऱ्या अनेक चहा ब्रॅंडचे उत्पादन मुन्नारमध्ये केलं जातं. मुन्नारमध्ये चहाचे मळे पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मुक्कामदेखील करू शकता. निसर्गरम्य डोंगर आणि तलावासह तुम्हाला या ठिकाणी चहा संग्रहायलदेखील पाहायला मिळतं. 

ADVERTISEMENT

उटी, तमिळनाडू

तमिळनाडूमधील उटी (Ooty) हे भारतातील एक सुंदर हिल स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. हनिमूनसाठी अथवा कुंटुबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी उटी अप्रतिम पर्यटन स्थळ आहे. ऊटीमध्येही चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यावर तुम्ही मनसोक्त चहाच्या मळ्यांमध्ये फिरू शकता. चहाचे निरनिराळे प्रकार, चहाची स्मृती चिन्ह आणि घरगुती चॉकलेट इथे खूप प्रसिद्ध आहेत. उटीप्रमाणेच तमिळनाडूची निलगिरीचे चहाचे मळेही प्रसिद्ध आहेत.

केलगुर, कर्नाटक

कर्नाटकमधील केलगुर (Kelaguru) टी इस्टेट जवळजवळ 1500 एकरमध्ये पसरलेलं आहे. विशेष म्हणजे हे एक भारतातील असं ऑर्थोडॉक्स टी इस्टेट आहे जिथे जैविक पद्धतीने चहा बनवला जातो. या चहाच्या मळ्यांमध्ये सत्तर वर्ष जुना चहाचा कारखाना आहे जिथे पारंपरिक पद्धतीने आजही चहा बनवला जातो. सेंद्रिय पद्धतीने बनवलेला असल्यामुळे चहा प्रेमींमध्ये या चहाच्या मळ्याला भेट देण्याची क्रेझ जास्त दिसून येते.

आम्ही शेअर केलेली माहिती तुम्हाला कशा वाटली हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
31 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT