ADVERTISEMENT
home / Care
कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा ‘हे’ 15 बेस्ट शॅम्पू (Best Shampoo For Colored Hair)

कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा ‘हे’ 15 बेस्ट शॅम्पू (Best Shampoo For Colored Hair)

बदलत्या फॅशन ट्रेंड्सनुसार आपण केसांकडे कसं दुर्लक्ष करू शकतो. घनदाट, लांबसडक, काळेशार केस आपलं सौंदर्य खुलवतात. आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी हल्ली महिला तसंच पुरूष केसांची निरनिराळी स्टाइल देखील करतात. अशातच काही नवीन रंग ट्रेंडिंगमध्ये आहेत. हेअर कलर केल्यास तुम्हाला स्टायलिश लुक मिळण्यास मदत होईल.

कलर हेअरसाठी बेस्ट शॅम्पू (Best Shampoo For Colored Hair)

आवडता हेअर केल्यानंतर त्यांचं आरोग्य जपणं देखील तितकंच महत्त्वाचे आहे. कारण हेअर कलरची योग्य देखभाल न केल्यास केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरणं आवश्यक आहे. 

1. Herbal Essences Color Me Happy Shampoo

गुलाबाचा सुगंध असलेला हा शॅम्पू बहुतांश महिलांमध्ये लोकप्रिय आहे. या शॅम्पूमुळे हेअर कलर दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. हे हर्बल घटकांसह एक चांगले हर्बल शैम्पू आहे. या घटकांमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून केसांचं संरक्षण होते.
फायदे :
गुलाबाचा सुगंध
केस मऊ, चमकदार होतात
हेअर कलर दीर्घकाळ टिकून राहतो
तोटे :
सहज उपलब्ध न होणारे प्रोडक्ट

ADVERTISEMENT

वाचा – या सल्फेट फ्री शॅम्पूमळे तुमचे केस होतील मजबूत

2. L’Oreal Paris Everpure Color Care System

कलर केलेल्या केसांसाठी सल्फेटचा समावेश असलेला शॅम्पू कधीही वापरू नये, कारण सल्फेट केसांसाठी अतिशय हानिकारक असते. शॅम्पूमुळे केसांना मॉईश्चर मिळते, ज्यामुळे केसांचं संरक्षण होते. केसांची वाढ देखील होते
फायदे :
सल्फेटचा समावेश नाही
शॅम्पूमध्ये तेलचा समावेश
सौम्य सुगंध
तोटे :
महागडे प्रोडक्ट

3. Aveeno Living Color

शॅम्पूतील ओट फॉर्म्युला केसातील सर्व दुर्गंधी कमी करण्याचं कार्य करतो. यामुळे हेअर कलर देखील टिकून राहतो.
फायदे :
सौम्य सुगंध
केसांचं आरोग्य सुधारते
तोटे :
महागडे प्रोडक्ट
सहज उपलब्ध नाही

 

ADVERTISEMENT

4. Nexxus Color Assure Shampoo

शॅम्पूमध्ये व्हाईट ऑर्किड एक्स्ट्रेक्ट, बदाम तेलाचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे शॅम्पू सल्फेट फ्री आहे. शॅम्पूमध्ये पोषक घटक असल्यानं केसांचं आरोग्य सुधारते. केस तुटण्याची समस्या कमी होते.
फायदे :
सौम्य सुगंध
वजनानं हलके
तोटे नाहीत

5. Moroccanoil Moisture Repair Shampoo

कलर केसांसाठी हा शॅम्पू बेस्ट असल्याचं म्हटलं जातं. शॅम्पू आणि कंडिशिनर केसांचं चांगल्या पद्धतीनं संरक्षण करते. निस्तेज केसांचं आरोग्य सुधारते. केसांचं रंग देखील टिकून राहतो.
फायदे :
मॉईश्चरायझ मिळते
केस मऊ होतात
केसांची वाढ होते
तोटे :
महागडे प्रोडक्ट

कलर केसांसाठी उत्तम आयुर्वेदिक शॅम्पू (Ayurvedik Shampoo For Colored Hair)

बहुतांश जणींना केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणं अजिबात पसंत नसते. पण चिंता करू नका. तुमच्या कलर हेअरसाठी बाजारात आयुर्वेदिक शॅम्पूदेखील उपलब्ध आहेत.

ADVERTISEMENT

1. Lotus Herbals Kera-Veda Amlapura Shikakai Amla Herbal Shampoo

या शॅम्पूमध्ये शिकाकाई, आवळा, रीठा, त्रिफळा या घटकांचा समावएश आहे. हा शॅम्पू सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. हे घटक टाळू आणि केसातील अशुद्धी आणि प्रदुषके काढण्यास मदत करतात आणि केस मजबूत करतात. केस चमकदार आणि निरोगी होतात.
फायदे :
टाळूवरील त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारते
नियमित वापरासाठी योग्य
सौम्य सुगंध
तेलकट केसांसाठी उपयुक्त
तोटे :
केसांना जास्त प्रमाणात चमक येत नाही

2. BIOTIQUE Bio Green Apple – Fresh Daily Purifying Shampoo & Conditioner

सल्फेट फ्री असलेला हा शॅम्पू तेलकट केसांसाठी परफेक्ट आहे. यामध्ये ग्रीन अॅपल एक्स्ट्रॅक्ट, sea algae, सेन्टेला (Centella) चे घटक आहेत. हे घटक टाळूवरील त्वचा आणि केसाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
फायदे :
केसाचं वजन वाढते
केसांची चमक टिकवून ठेवते
कोड्यांची समस्या कमी होते
कोरडी आणि खाज सुटणाऱ्या टाळूची समस्या कमी होते
तोटे :
केस कोरडे होण्याची शक्यता

3. Meghdoot Herbal Sat Shikakai Ayurvedic Shampoo

शॅम्पूमध्ये आवळा, रीठा, मेथी, भृंगराज, शंखपुष्पी आणि शिकाकाईचा अर्क आहे. कोंडा, केसगळतीची समस्या कमी करून केसांना पोषकतत्त्वे मिळतात.
फायदे :
केस आणि टाळूच्या त्वचेला पोषकतत्त्वे मिळता
केसाचं आरोग्य सुधारते
नैसर्गिक पोषक घटकांमुळे केसांचं रंग दीर्घकाळ टिकतो
तोटे :
मर्यादित प्रमाणात उपलब्ध
केस अधिक प्रमाणात कोरडे होण्याची शक्यता
तेलकट केसामधील अतिरिक्त तेल लगेचच निघत नाही
SLS समावेश

4. Soultree Licorice Hair Repair Shampoo

Soultree Licorice Hair Repair Shampoo मध्ये सात आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि फुलांच्या अर्काचा समावेश आहे. यामध्ये व्हीट प्रोटीन, हीना, ज्येष्ठमध, हिबिस्कस वनस्पतीचा समावेश आहे. या घटकांमुळे तुमचे केस मजबूत होण्यास मदत होते. या शॅम्पूमुळे केस काळेशार आणि घनदाट देखील होतात.
फायदे :
केसांना नैसर्गिक चमक मिळते
केसांची वाढ होते
टाळूच्या अति संवेदनशिल त्वचेसाठी योग्य
SLS आणि पॅराबेनचा समावेश नाही
पशु चाचणीविरूद्ध
तोटे :
महागडे प्रोडक्ट
केस कोरडे न होण्यासाठी कंडिशनर लावावे

ADVERTISEMENT

5. Rivona Naturals Apple Cider Vinegar Shampoo

Apple Cider Vinegar चा अर्क तुमच्या केसांचं आरोग्य सुधारते. रक्तप्रवाह सुधारतो. केसांचं आणि केसांच्या रंगाचं नुकसान होत नाही.
फायदे :
कोंड्याची समस्या कमी होते
एसएलएस, पॅराबेन, मद्य अर्क, सिलिकॉन आणि फिथलेट्सचा समावेश नाही
पशु चाचणीविरूद्ध
तोटे :
महागडे प्रोडक्ट

कलर हेअरसाठी स्वस्त आणि मस्त शॅम्पू (Cheaper Shampoo For Colored Hair)

कलर हेअरसाठी महागडाच शॅम्पू वापरावा,असा काही नियम नाही. तुमच्या खिशाला परवडतील असे स्वस्त आणि मस्त शॅम्पूची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.

1. L’Oreal Paris Colour Protect Shampoo

L’Oreal Paris Colour Protect Shampoo कलर हेअरचं नुकसान होण्यापासून उत्तम संरक्षण करते. हा शॅम्पू वापरल्यास तुमचे केस काही दिवसांतच मऊ होतात. शॅम्पूमध्ये असलेला UV फिल्टर कलर प्रोटेक्ट फॉर्म्युला केसांचं आरोग्य सुधारण्याचं काम करतो. या शॅम्पूमुळे केसांची चमक वाढते तसंच केसांचं आतील-बाहेरील सौदर्य देखील सुधारते.
फायदे :
केस मऊ होतात
UV फिल्टरमुळे केसांचा रंग दीर्घकाळ टिकतो
केस कोरडे होत नाहीत
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते
तोटे :
SLS, पॅराबेन आणि रासायनिक द्रव्ययुक्त शॅम्पू
 

ADVERTISEMENT

2. Wella Professionals Brilliance Shampoo

Wella Professionals Brilliance Shampoo हे एक बेस्ट प्रोडक्ट असून बहुतांश दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध असते. डायमंड डस्ट हा शॅम्पूतील मुख्य घटक आहे. या घटकामुळे केसांचा रंग अधिक चमकदार दिसतो आणि जास्त काळ टिकतो. शॅम्पूतील पोषकतत्त्वांमुळे केस आणि त्वचेच्या आरोग्यावर चांगला प्रभाव दिसतो. टाळूवरील (Scalp) त्वचा तेलकट असते, अशा लोकांनी हा शॅम्पू वापरावा. तुमच्या केसांना आर्द्रता मिळते आणि केसांची वाढ देखील चांगली होती.
फायदे :
मॉईश्चरायझ मिळाल्यानं केस मऊ होतात
केसांचा रंग दीर्घकाळ टिकतो
सौम्य सुगंध
डायमंड डस्टमुळे केसांना चमक येते
तोटे :
कदाचित केस कोरडे होऊ शकतात
कंडिशनर वापरणं गरजेचं

3. Tresemme Color Revitalize Protection Shampoo

Tresemme Color Revitalize Protection Shampoo मध्ये भरपूर प्रमाणात ग्रीन टी, रोझमेरी आणि सूर्यफुलाचा अर्काचा समावेश आहे. शॅम्पूमुळे केस स्वच्छ होतात आणि मॉईश्चरायझदेखील होतात. हा शॅम्पू केसांचा रंग जवळपास आठ आठवडे टिकवून ठेवण्यास मदत करतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
फायदे :
टाळू आणि केसांमधील अतिरिक्त तेल शोषून घेते
केसांचा रंग दीर्घकाळ टिकवण्यास करते मदत
केस होतात मऊ आणि सुंदर
ग्रीन टी आणि सनफ्लावर एक्सट्रॅक्ट्समुळे केसांचा रंग आणखी छान दिसतो
तोटे :
कोरडे केस अति कोरडे होऊ शकतात
SLSचा समावेश

4. Dove Hair Therapy Color Rescue Shampoo

Dove Hair Therapy Color Rescue Shampooमध्ये मायक्रो-मॉईश्चर रिपेअर सीरमचा समावेश आहे. कलर केल्यामुळे नुकसान झालेल्या केसांचं आरोग्य सुधारते. शॅम्पूमध्ये ग्लिसरिन आणि सूर्यफूल बियांच्या तेल प्रचंड प्रमाणात आहे.
फायदे :
फ्रिजी केस नियंत्रणात आणते.
हेअर कलर दीर्घकाळ टिकतो
तोटे :
केस कोरडे होतात
केसांना कंडिशनर लावणे गरजेचं

5. Matrix Biolage Color Care Therapie

Matrix Biolage Color Care Therapy ऑर्किड अर्क आणि UV फिल्टर्स भरपूर प्रमाणात आहेत. शॅम्पूमुळे हेअर कलरच संरक्षण होते. केसांना मॉईश्चरायझ आणि चमक देखील मिळते
फायदे :
ऑर्किड अर्कामुळे केसं मऊ आणि चमकदार होतात
केसांचं रंग दीर्घकाळ टिकतो
केसगळती होत नाही
पॅराबेन मुक्त
तोटे :
केस विरळ होण्याची शक्यता
SLSचा समावेश

ADVERTISEMENT

अशी घ्या कलर हेअरची काळजी (Tips For Colored Hair)

स्टायलिश दिसण्यासाठी हल्ली तरुणांमध्ये वेगवेगळे हेअर कलर करण्याची स्टाईल ट्रेंड करत आहे. पण केवळ हेअर कलर केलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. कारण हेअर कलरचीही योग्य काळजी घ्यावी लागते. अन्यथा केसांचं प्रचंड नुकसान होऊ शकते.

1. कलर केल्यानंतर 72 तास केस शॅम्पूनं धुवू नयेत (Don’t Shampoo For 72 Hours)

हेअर कलर केल्यानंतर 72 तासांसाठी धुवू नयेत, अन्यथा केसांचा रंग उतरू शकतो. हेअर कलरनंतर उघडलेला त्वचेचा थर (Cuticle Layer) बंद होण्यासाठी तीन दिवसांचा अवधी लागतो. हेअर कलर दीर्घ काळ टिकून राहावा, यासाठी केस लगेचच धुवू नयेत.

2. वापरा सल्फेट फ्री शॅम्पू आणि कंडिशनर (Use Sulphate Free Shampoo And Conditioner)

बहुतांश शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये सल्फेटचा समावेश असतो. फेस येण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये हा घटक वापरला जातो. सल्फेटमुळे केसातील नैसर्गिक तेल आणि आर्द्रता कमी होते. तसंच हेअर कलर देखील उतरतो. हे नुकसान टाळण्यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू वापरा.

3. कंडिशनरमध्ये हेअर डायचा करा समावेश (Use Conditoner And Hair Dye)

जर तुम्ही केसांना गुलाबी, जांभळा किंवा निळा रंगाचे हायलाइट केलं असेल. पण तुम्हाला हे रंग केसांवर नकोसे झाले असतील तर केस धुताना कंडिशनमध्ये थोड्या प्रमाणात हेअर डाय मिसळावे. यामुळे तुमचे केस पुन्हा डाय होतील.

ADVERTISEMENT

कंडिशनरमध्ये हेअर डायचा - Shampoo For Colored Hair In Marathi

shutterstock

4. कोमट पाण्यानं केस धुणे (Wash Hair With Warm Water)

कलर्ड हेअर अतिशय गरम पाण्यानं धुणे हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमच्या केसांवरील रंग शॅम्पू आणि कंडिशनर लावल्यानं उतरतो. या उलट थंड पाण्यामुळे कंडिशनरद्वारे मिळालेला ओलावा टिकून राहतो.

5. केस शक्यतो कमी वेळा धुवावेत (Hair Should Be Washed Less)

नियमित केस धुण्याची सवय असल्यास वेळीच सावध व्हा. कारण यामुळे केसांचा रंग लवकरच उतरतो. एवढंच नाही तर केसांमधील नैसर्गिक ओलावा देखील कमी होतो. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवावेत.

ADVERTISEMENT

6. केस ट्रिम करत राहा (Trim Your Hair)

फाटे फुटलेल्या केसांवर रंग अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे 6 ते 8 आठवड्यानंतर केस ट्रिम करणं आवश्यक आहे. यामुळे केसांची चांगली वाढ देखील होते आणि केसांचा रंग देखील टिकून राहण्यास मदत होते.

केस ट्रिम करत राहा - Shampoo For Colored Hair In Marathi

shutterstock

7. लीव्ह इन ट्रिटमेंटची घ्या मदत (Apply Leave In Treatment)

कलर आणि केमिकल ट्रिटमेंट केलेल्या केसांसाठी अतिरिक्त हायड्रेशन मिळणं आवश्यक असते. शिवाय, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून केसांचं संरक्षण होणंही गरजेचं आहे. कलर केलेल्या केसांचं नुकसान टाळण्यासाठी Leave in Treatment करावी. यामुळे तुमचे केस मऊ आणि हायड्रेटेड राहतात. महत्त्वाचं म्हणजे केसांचा रंग टिकून राहतो.

ADVERTISEMENT

8. हीट प्रोटेक्टंट स्प्रेचा करा वापर (Use Of Heat Protectant Spray)

हीट ट्रिटमेंटमुळे केसांचा रंग उतरण्याची, आद्रर्ता कमी होण्याची आणि केसांचं नुकसान होण्याची भीती असते. हे नुकसान टाळण्यासाठी केसांवर हॉट टुल्स वापरताना हीट प्रोटेक्टंट स्प्रेचा वापर करावा. या स्प्रेमुळे केसांतील आद्रर्ता टिकून राहते, केसांचं बाहेरील सौंदर्य देखील जपलं जातं.

9. पुन्हा रंग प्रक्रियेसाठीही तयार व्हा (Be Ready For Coloring Again)

केसांवर पुन्हा रंग प्रक्रिया करण्यासाठी एक दिवस आधी केस शॅम्पूनं धुवावेत. कारण कलरपूर्वी केसातील तेल निघणं आवश्यक आहे. अन्यथा तेलकटपणामुळे केसांना रंग येणार नाही.

10. क्लोरिनच्या संपर्कात येणं टाळा (Avoid Chlorine Contact)

क्लोरिन हे रासायनिक द्रव्य आहे, याचा वापर स्विमिंग पूल स्वच्छ करण्यासाठी केला जातो. क्लोरिनयुक्त पाण्याचा संपर्कात तुम्ही आलात तर केसांचा रंग लवकर उतरू शकतो. शिवाय, केसांची गडद रंगाची शेड निस्तेज दिसू शकते, केस कोरडे देखील होतील. त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी स्विमर कॅपचा वापर करण्यास विसरू नका.

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. रंग केलेल्या केसांसासाठी नारळाचं तेल वापरणं योग्य आहे का?

पोत बिघडलेल्या केसांसाठी किंवा कलर हेअरना नारळाच्या तेलानं मसाज करणं ही उत्तम निवड आहे. हे तेल केसांसाठी सुरक्षित आणि पोषक ठरेल, शिवाय केस मऊ देखील होतील. अर्गन तेलानंही तुम्ही मसाज करू शकता. विशेषतः ज्यांची टाळूवरील त्वचा अधिक तेलटक आहे, त्यांनी हे तेल वापरावं.

ADVERTISEMENT

2. रंग केलेल्या केसांसाठी हानिकारक घटक कोणते?

सोडियम लॉरेल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट या दोन घटकांमुळे केसांवरील रंग उतरतो. या दोन्ही घटकांच्या संपर्कात येणे टाळावं. कारण यामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

3. कलर हेअरसाठी शॅम्पू निवडताना त्यात कोणते घटक नसावेत?

हेअर कलर दीर्घ काळ टिकून राहावा, यासाठी सुरुवातीपासूनच योग्य ती काळजी घ्यावी. अन्यथा केसांचा रंग लवकर उतरू शकतो. सल्फेट, पॅराबेन, सुगंध, ट्रायक्लोसन आणि पॉलिथिलीन ग्लायकोल हे घटक शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये नसावते. हे घटक असलेले शॅम्पू किंवा कंडिशनर निवडल्यास तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकते.

4. कलर प्रोटेक्शन शॅम्पू रंग न केलेल्या केसांसाठी वापरू शकतो?

कलर प्रोटेक्शन शॅम्पूची रचना विशेषतः हेअर कलरचा विचार करूनच केली जाते. पण कलर न केलेल्या केसांसाठीही हे शॅम्पू योग्य आहेत. अशा शॅम्पूच्या वापरामुळे रंग केलेल्याही केसांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होते. मुख्यतः केसांमधील नैसर्गिक तेल टिकून राहतं.

02 Jan 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT