ADVERTISEMENT
home / बिग बॉस
गायत्री दातारची एक्झिट

Bigg Boss Marathi: गायत्री दातारची एक्झिट,अनेकांना बसला धक्का

Bigg Boss Marathi च्या घरातून धक्कादायक एविक्शन या आठवड्यात झाले आहे. घरात आता केवळ एकच आठवडा शिल्लक राहिलेला असताना टीव्ही जगतातील हा प्रसिद्ध चेहरा म्हणजेच गायत्री दातार एविक्ट झाल्यामुळे अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे. फिनालेच्या इतके जवळ येऊन आणि इतका चांगला खेळ करुन गायत्रीची एक्झिट अनेकांना धक्का देणारी होती.  पण आता गायत्रीनंतर घरात जय, मीरा, उत्कर्ष, विकास, विशाल, मीनल आणि सोनाली हे सात जण राहिले आहेत. या आठवड्यात घरात शेवटचा कॅप्टन होण्याचा मान मीनलला मिळाला आहे. त्यामुळे तिला थेट फिनालेला जाण्याची संधी मिळाली आहे.

Bigg Boss Marathi: पुन्हा स्नेहा फसेल का जयच्या गोड बोलण्याला

गायत्रीच्या जाण्याने बसला धक्का

गायत्री दातारला सुरुवातीला पाहिल्यानंतर ही गायत्री नाही असे अनेकांना वाटले होते. पण जय, उत्कर्ष आणि मीरा यांच्यासोबत राहून तिने घरात अनेक वाद ओढावून घेतले. आरे ला कारे असे केल्यामुळे गायत्रीची खेळातील प्रतिमा प्रेक्षकांसाठी थोडी बिघडली होती. मीरा-गायत्रीला बाहेर काढून टाकण्याची मागणीही केली जात होती. पण काही दिवसांपूर्वी तिने उत्तम निर्णय घेत तिचा ग्रुप बदलला आणि ती प्रेक्षकांना आवडू लागली होती. पण नॉमिनेटेड सदस्यांपैकी सगळेच सदस्य तगडे आणि उत्तम फॅनबेस्ड असल्यामुळे त्याचा फटका गायत्रीला बसला असे दिसून येत आहे. उत्कर्ष आणि मीरा सेफ झाल्यामुळे जय आणि गायत्री यांच्यामध्ये गायत्री जाईल असा अंदाज अनेकांना आला होता. पण खेळाच्या इतक्या जवळ असताना गायत्री बाहेर पडल्यामुळे तिला काही गोष्टींचा फटका बसला हे नक्की!

मीनल झाली कॅप्टन

या सीझनमध्ये प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट होती ती म्हणजे या घरात जय-उत्कर्षचा ग्रुुप वगळता दुसऱ्या ग्रुपला कधीही कॅप्टन बनण्याचा मान मिळाला नव्हता.पण घरात काही दिवस राहिलेले असताना आता अखेर मीनलला घरात कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. इतक्या प्रयत्नांनी हे पद अखेर मिळवल्यामुळे हा आनंद विकास, विशाल आणि सोनाली यांना झाला आहे. या आठवड्यातील कॅप्टन्सी कार्य अशा प्रकारे झाले यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झाला. त्यांनाच नाही तर बाहेर प्रेक्षकांना देखील त्याचा आनंद झालेला दिसून आला आहे.

ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi: वाईल्ड कार्ड एंट्रीने पुन्हा आले हे स्पर्धक घरात

स्नेहा झाली खूपच स्ट्राँग

स्नेहा या घरात पुन्हा आल्यापासून थोड्या वेगळ्याच रुपात पाहायला मिळाली आहे. ती अशी आधी दिसायला हवी होती. त्याचा वेगळा परिणाम तिच्या खेळात झाला असता असे अनेकांना वाटते. सध्या घरात असताना ती विशाल, सोनाली यांच्यासोबत जास्त दिसत आहे. तिचा हा खेळ आधी दिसला असता तर त्याचा फायदा तिला नक्कीच झाला असता. खेळात सध्या स्नेहा खूपच स्ट्राँग दिसत आहे. स्नेहा, तृप्ती, आदिश या घरात काही दिवस हुकूमशहा म्हणून वावरले. त्यामुळे या खेळात थोडी जास्त मजा आली. इतकेच नाही तर स्नेहाने जयला चांगलेच कार्य करुन घेतले. 

गायत्री दातार या घरातून बाहेर पडल्यानंतर मीरा- उत्कर्ष- जय यांना खूप वाईट वाटले हे दिसून आले. पण त्यातही खेळ असू शकतो असे अनेकांना वाटले. आता या नव्या आठवड्यात नेमकं काय होईल? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघची धमाकेदार एंट्री,जयची केली पोलखोल

ADVERTISEMENT
13 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT