ADVERTISEMENT
home / बिग बॉस
स्नेहा वाघची धमाकेदार एंट्री

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघची धमाकेदार एंट्री,जयची केली पोलखोल

 बिग बॉस मराठीचा हा आठवडा खूपच रंजक झाला आहे. कारण घरात काही वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत.घरातून बाहेर गेलेले सदस्य म्हणजेच तृप्ती देसाई, आदिश वैद्य आणि स्नेहा वाघची या घरामध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. स्नेहा वाघने या घरात येताच जे काही केले त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सांरघे… म्हणत प्रेम वाटणारी स्नेहा आता घायाळ वाघीण बनून घरात परतली आहे. ती घरातून बाहेर पडली त्यावेळी खूप जणांना ती चुकीचे खेळल्यामुळे आणि जयसोबत राहिल्यामुळे बाद झाल्याचे वाटले होते. पण ‘ये पब्लिक है सब जानती है’घऱात असताना काही गोष्टींवर स्नेहाला विश्वास बसला नाही. पण घरातून बाहेर आल्यानंतर आता तिला काही गोष्टी चांगल्याच पटलेल्या दिसत आहेत. त्यामुळेच जयची पोलखोल करण्यात तिने काहीही कमी केलेलं नाही.

Bigg Boss Marathi: वाईल्ड कार्ड एंट्रीने पुन्हा आले हे स्पर्धक घरात

असा झाला हायवोल्टेज ड्रामा

स्नेहाची घरात एंट्री झाल्यानंतर घरातील सगळ्यांना फ्रिज करण्यात आले होते. घरातील सगळ्यांसोबत स्नेहाने संवाद साधला. गायत्रीला खूप प्रेमळ शब्दात तिने समजून घेतले. विशाल तिला खरा कळवा. घरातील अनेकांना तिने सुनावले. पण यामध्ये सगळ्यात जास्त तिने उत्कर्ष, मीरा आणि जय यांना अधिक सुनावले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी याच घराचा भाग असलेली स्नेहा त्या ग्रुपमध्ये राहून फक्त संख्येसाठी वापरली जात होती. यावर तिचा विश्वास बसत नव्हता. पण तिला आता ते सगळं कळलेलं आहे. त्यामुळेच जय तिच्या मागून जे काही बोलत होता त्याने दुखावलेल्या स्नेहाने जयला इतके सुनावले की, सगळेच स्तब्ध झाले. तिचे बोलणे हे जणू एखादी स्किट सुरु आहे असेच वाटत होते. स्नेहाने एकदाही या वेळात जयकडे पाहिले नाही. शेवटी तिने त्याला लुझरचा टॅग देऊन त्याच्या गळ्यात लुझरचे पेंडंट घातले जे अनेकांसाठी धक्का देणारे होते. इतकेच नाही तर त्यानंतर जयने जे काही केले तो अनेकांना ड्रामा आणि कंटेटसाठी केलेले कृत्य वाटले. स्नेहाच्या अशा वागण्याने आपण दुखावलो आणि त्यामुळे त्याने आपला हात आपटून फोडून घेतला जे पाहिल्यानंतर हे काय सुरु आहे? असे झाले. पण स्नेहाच्या येण्याने पुन्हा ती या भेडचालचा भाग होते की, ती स्वत:चा खेळ योग्य पद्धतीने खेळते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

स्नेहा टिकू शकेल का घरात

स्नेहा या घरातून जयमुळे बाहेर पडली होती. पण आता तिने आपला खेळ सावरला आहे, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. तिची ग्रंँड एंट्री पाहता आणि तिचा आताचा ऑरा पाहता ती या घरात आता खऱ्या अर्थाने खेळायला आली आहे असे दिसत आहे. घरात आल्या आल्या या नव्या सदस्यांना घरातून काही सदस्यांना बाहेर काढायचे आहे. आता याचा फटका नेमका कोणाला बसणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गायत्रीने टीम बदलल्यामुळे आता ती पूर्णपणे तिच्या प्रतिस्पर्ध्यांशी खेळताना दिसत आहे. त्यामुळे आता याचा धोका उत्कर्ष,जय आणि मीरा यांना बसेल असे दिसत आहे. कारण आतापर्यंत या सगळ्यांनी सेफ खेळ खेळला आहे. पण आता या नवीन स्पर्धकांमुळे त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

आता स्नेहाचा खेळ आणि तृप्ती देसाईचा खेळ कसा बदलतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात होणार पुन्हा राडा

07 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT