ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
blouse-designs-for-small-breast-size-in-marathi

लहान स्तन आकर्षक दिसण्यासाठी वापरा हे ब्लाऊज डिझाईन्स

साडी जितकी सुंदर असते त्याला शोभा डिझाईनर ब्लाऊजने येतेच. पण ब्लाऊजदेखील कितीही सुंदर असला तरीही ब्लाऊजचे फिटिंग जोपर्यंत योग्य नाही तोपर्यंत तो तुम्हाला चांगला उठावदार दिसत नाही. त्यामुळे साडीसह तुम्ही ब्लाऊज शिवता तेव्हा तुम्ही योग्य माप देऊन शिऊन घ्यावे. अनेकदा त्या महिलांना खूपच त्रास होतो ज्यांच्या स्तनांचा आकार लहान असतो. अशा महिलांना ब्लाऊजच्या फिटिंगची समस्या नक्कीच येते. पण जर तुमचे स्तन लहान असतील तर आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही ब्लाऊजचे असे काही डिझाईन्स वापरून पाहू शकता, जे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्हीही तुमची साडी तुमच्या फिगरला अधिक मॅच व्हावी आणि स्तनांचा आकारही साडीवर उठून दिसावा यासाठी या ब्लाऊज डिझाईन्सची निवड करून पाहा. विशेषतः लग्नसराईसाठी वेगवेगळ्या साड्या नेसल्या जातात. अशावेळी तुम्ही या ब्लाऊज डिझाईन्सचे वापर करून घेऊ शकता. 

पॅडेड पफ स्लीव्ह्ज ब्लाऊज (Padded Puff Sleeves Blouse)

आजकाल पॅडेड ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये आहे. या पद्धतीचा ब्लाऊज घालण्याचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे तुम्ही या पद्धतीच्या ब्लाऊजमध्ये कोणत्याही फॅशनची बॅक आणि फ्रंट नेकलाईन शिऊन घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला यामध्ये ब्रा घालण्याची गरज नाही. दुसरा फायदा असा की, पॅडेड ब्लाऊजची फिटिंग (Blouse Fitting) ही एकदम परफेक्ट असते. त्यामुळे तुमच्या साडीचा पदरही तुमच्या ब्लाऊजवर अगदी परफेक्ट राहतो. याशिवाय तुम्ही जर पफ स्लीव्ह्जचा पॅडेड ब्लाऊज घालणार असाल तर लोकांचे लक्ष हे तुमच्या पफ स्लीव्ह्जवर अधिक जाते. त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग दिसून येते आणि तुमच्या लहान स्तनांकडे (Small Breast) लक्ष जात नाही. हे दिसायला अधिक आकर्षक आणि सुंदर दिसते. 

बोटनेक ब्लाऊज डिझाईन्स (Boatneck Blouse Designs)

तुमच्या स्तनांचा आकार लहान असेल, तर तुमची चांगली फिगर दर्शविण्यासाठी बोटनेक ब्लाऊज डिझाईन हा योग्य पर्याय आहे. बोटनेक ब्लाऊज शिवताना तुम्ही त्यामध्ये पॅड नक्की लाऊन घ्या. यामुळे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित होईल. याशिवाय तुम्ही पॅडेड ब्रादेखील घालू शकता. बोटनेक ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर वापरू शकता. मात्र सिल्क साडी, ऑर्गेंझा साडी आणि जॉर्जेट साडीवर हे ब्लाऊज डिजाईन्स अधिक चांगले दिसतात. लक्षात ठेवा बोटनेक ब्लाऊज शिवताना कधीही पूर्ण हाताचे ब्लाऊज शिऊन घेऊ नका. तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज डिझाईन्स अथवा हाफ स्लीव्ह्ज शिवलेत तर अधिक चांगले दिसतील. 

स्वीटहार्ट नेकलाईन (Sweetheart Neckline)

स्वीटहार्ट नेकलाईनवाले ब्लाऊज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. हा ब्लाऊज तुम्हाला अत्यंत ट्रेंडी लुक देतो आणि तसंच लोकांचा फोकस हा मानेजवळ जातो आणि स्तनांकडे लक्ष जात नाही. तुम्ही या पद्धतीच्या ब्लाऊज डिझाईन्सचा वापर साडीवर करू शकता. मात्र सिल्क अथवा कॉटनच्या साडीवर असे ब्लाऊज चांगले दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या साडीची फॅशन करताना योग्य फॅब्रिक पाहून मगच असे ब्लाऊज वापरा. 

ADVERTISEMENT

तुम्हाला या फॅशन टिप्स आवडल्या असतील तर नक्की शेअर आणि लाईक करा. लहान स्तनांना अधिक आकर्षक दाखविण्यासाठी या ब्लाऊज डिझाईन्सची निवड करून तुम्ही नक्की पाहा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT