ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
cooking hacks or tips for deep frying in marathi

एखादा पदार्थ डीप फ्राय करताना करू नका या चुका

पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. बाहेर मुसळधार पाऊस पडू लागला की घरात भजी, बटाटावडे, अळूवडी, कोंथिंबीर वडी, पापड, समोसे असे तळलेले पदार्थ आवर्जून केले जातात. थंड वातावरणात गरमागरम तळलेले पदार्थ खाण्यात एक वेगळीच मौज असते. चहा अथवा जेवणासोबत असे पदार्थ खाण्यामुळे अन्नाची रूची वाढते. मात्र असे  पदार्थ कुरकुरीत आणि खुशखुशीत होण्यासाठी डीप फ्राय केले जातात. गरम तेलात बुडवून तळण्यामुळे पदार्थांला छान खमंग वास आणि रंग येतो. मात्र कोणताही पदार्थ तळताना काही गोष्टी सावध राहून करायला हव्या. कारण तळताना तेल गरम असेल तर सावधानता न बाळगल्यास दुखापत होण्याचा धोका असतो. शिवाय जर तुम्ही एखादा पदार्थ पारंपरिक आणि योग्य पद्धतीने पदार्थ तळला तर तो छान लागतो आणि पोट बिघडत नाही. यासाठी जाणून घ्या तळलेले पदार्थ करण्यासाठी या काही सोप्या आणि सुरक्षित कुकिंग टिप्स… तसंच वाचा या इतरही काही सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी.

पदार्थ तळताना काय लक्षात ठेवाल

tips for deep frying in marathi

कोणताही पदार्थ तळताना आधी तेल मध्यम आचेवर गरम करावा. म्हणजेच कोणताही पदार्थ तेल गरम झालं नसताना कढईत सोडू नये. 

  • तळणाचे पदार्थ कढईत नेहमी एका बाजूने सोडावेत मध्यभागी टाकू नयेत, नाहीतर गरम तेल तुमच्या अंगावर उडू शकतं. 
  • कढईत एखादा पदार्थ तळण्यासाठी सोडल्यानंतर लगेच तो पलटू नये, आधी तो थोडा क्रिस्प झाला की मगच तो पलटावा. 
  • कढीपकोडा अथवा कोप्ता करताना तळलेले पदार्थ पटकन ग्रेव्हीत सोडू नये. ग्रेव्ही अथवा तळलेले पदार्थ यापैकी कोणताही एक पदार्थ नेहमी सामान्य तापमानात असावा. 
  • पदार्थ तळताना तो मंद आंचेवर तळावा, यासाठी आधी तेल गरम करावं मात्र पदार्थ आत सोडल्यावर आंच पुन्हा कमी करावी. ज्यामुळे तो पदार्थ आतून चांगला शिजेल नाहीतर आतून कच्चा राहिला तर तुमचे पोट बिघडू शकेल.
  • तळलेले पदार्थ क्रिस्पी होण्यासाठी बॅटरमध्ये थोडा रवा, तांदळाते पीठ, ब्रेडक्रम, पोहे असे पदार्थ मिसळावे. 
  • तळणासाठी योग्य तेलाची निवड करा. कारण तळण्याच्या पदार्थातून खूप तेल तुमच्या पोटात जाणार असतं. त्यामुळे तेल योग्य दर्जाचं आणि गुणवत्तेचं असेल याची दक्षता ठेवणं गरजेचं आहे.
  • तळण्यापूर्वी स्वयंपाकघर कोरडं असेल याची काळजी घ्या, कारण जर चुकून पाण्याचा अंश तेलात पडला तर त्यातून अपघात होऊ शकतो. 
  • तळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. कारण तळल्यावर तेल उरलं असलं तरी तेल जळल्यामुळे त्यात कार्बनचे कण निर्माण होतात जे तुमच्या आरोग्यासाठी मुळीच हिताचं नसतात.
  • तळलेले पदार्थ काढून ठेवताना तेल टिपण्यासाठी स्वच्छ टीश्यू पेपर वापरा, न्यूज पेपर वापरू नका. कारण न्यूज पेपरच्या शाईतील केमिकल्स त्यातून तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक.

24 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT