आजकाल मोबाईल, लॅपटॉपचा वापर फारच वाढलेला दिसत आहे. मोबाईल शिवाय तर लोकांना जगणंच मुश्किल झालंय असं वाटतंय. त्यात कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कुलचं कल्चर आल्यामुळे स्क्रीन टाईममध्ये अधिकच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सहाजिकच घरातील लोकांचे एकमेकांसोबत संवाद कमी आणि गॅझेटसोबत चॅटिंग जास्त होतंय. घरातील प्रत्येक व्यक्ती मोबाईल अथवा लॅपटॉपमध्ये बिझी झाल्यामुळे नात्यातील बंध काहीसे सैल झाले आहेत. बऱ्याच घरात यामुळे पतीपत्नीच्या नात्यातही दुरावा आल्याचं दिसून येत आहे. जर स्क्रिन टाईममुळे तुमच्या नात्यात असा दुरावा आला असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा.
प्रत्येक कामाची ठराविक वेळ ठरवा
जीवनात वेळ खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेळेचे योग्य व्यवस्थापन करता यायला हवं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंतच्या तुमच्या सर्व वेळेचे नीट नियोजन करा. ज्यामध्ये तुमच्या कामाची वेळ, तुमची स्वतःची कामे, घरातील जबाबदाऱ्या, जोडीदारासाठी ठराविक वेळ असावा. ज्यामुळे तुमचा स्क्रिन टाईम मर्यादित राहिल. तसंच ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर पैशांमुळे बिघडणार नाहीत नातेसंबंध
दिवसभरात एकदा तरी कुटुंबासोबत एकत्र जेवण करा
तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही बिझी असला तरी रात्रीचे जेवण एकत्र कुटुंबासोबतच करा. मात्र लक्षात ठेवा सकाळी नास्ता करताना आणि रात्री डिनर करताना मोबाईल जवळ ठेवू नका. तुमच्या ऑनलाईन मिटिंग्ज, सेशन, क्लासेस त्यानुसार मॅनेज करा. जेवताना फक्त तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. दिवसभरात घडलेल्या गोष्टींची चर्चा करा. एकमेकांच्या समस्या जाणून घ्या. नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात
जोडीदारासाठी खास वेळ ठेवा
जर तुमचे लग्न टिकवायचे असेल, तुमच्या नात्यात कडूपणा येऊ नये असं वाटत असेल तर जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. आठवड्यातून एकदा एकत्र सिनेमा, मॉल अथवा बाहेर फिरायला जा. अगदी काहिच करता आलं नाही तर रात्री लॉंग ड्राईव्हवर जा. त्यावेळी जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवा. ज्यामुळे तुमच्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही. शक्य असेल तर एखादा सरप्राईझ वेकेशन प्लॅन करा. यासोबतच जाणून घ्या अपेक्षांचे ओझे वाढवू शकते नात्यातील तणाव.. तुम्ही करत नाही ना ही चूक