ADVERTISEMENT
home / Dating
एकमेकांशी अजिबात पटत नसले तरी एकत्र राहण्याचा अट्टाहास कितपत योग्य?

एकमेकांशी अजिबात पटत नसले तरी एकत्र राहण्याचा अट्टाहास कितपत योग्य?

भांडणे कुठल्या नात्यात होत नाहीत? अगदी आई वडील व मुलांमध्ये वाद होतात. भावंडांमध्ये तर भांडणे होणे अगदी सामान्यच आहे. मित्रामित्रांमध्येही अगदी टोकाची भांडणे होतात. पण रक्ताच्या नात्यात नाते तोडण्यापेक्षा ते टिकवून ठेवण्यालाच जास्त महत्व दिले जाते.  रक्ताची नाती आपण  सहसा  टाळू शकत नाही म्हणूनच आपण तिथे ऍडजेस्ट करतो. पण जेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा-बायकोमध्ये वाद होतात तेव्हा मात्र ते टोकाला जाऊ शकतात. खरं तर ह्या नात्यात भांडणे होणे अगदी सर्वसामान्य बाब आहे. दोन भिन्न स्वभावांची, भिन्न आवडी-निवडी असलेली, भिन्न घरांत वाढलेली, भिन्न सवयींची दोन माणसे एकत्र आल्यावर वादविवाद भांडणे होणार हे तर सामान्य आहे. पण भांडणे किती आणि कुठल्या विषयावरून होतात , तसेच ती किती वेळात मिटतात हे देखील महत्वाचे आहे. जरी दोन व्यक्ती ह्या चांगल्या असल्या तरीही त्यांचे एकमेकांशी पटत नसेल तर त्यांनी एकमेकांचे नुकसान करण्याआधीच वेगवेगळ्या मार्गांना लागावे. 

मानसिक शांतीही महत्वाची आहे

आपले सगळ्यांशीच पटू शकेल असे नसते. म्हणूनच सतत भांडणे होत असतील तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी त्या टॉक्सिक नात्यातून आपली शारीरिक -मानसिक गुंतवणूक काढून घेणेच योग्य ठरते.  कारण वादविवाद हे निराशाजनकच असतात. त्यातून आनंद मिळत नाही. ज्याला दुसऱ्याला दुखावून आनंद मिळतो, अश्या टॉक्सिक पार्टनरपासून लांब होणेच श्रेयस्कर आहे.सततच्या भांडणांमुळे  नात्यात तणाव वाढतो, चिंता वाढतात आणि आपले मानसिक आरोग्य त्यामुळे धोक्यात येते. आपल्या शरीरावरही ह्याचा विपरीत परिणाम होतो, कामाच्या ठिकाणी चुका होऊ लागतात आणि एकूणच सगळीकडे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जसजशी निराशा वाढत जाते, तसतसा रागही वाढतो. लोक थकून, कंटाळून किंवा शुद्ध निराशेतून वाद घालणे थांबवतात आणि ह्याचा अंतिम परिणाम म्हणजे नात्यात येणारा दुरावा, एकमेकांविषयी वाटणारा परकेपणा असा होतो. अश्या नात्यात नुसते जगाला दाखवण्यासाठी एकत्र राहणे म्हणजे स्वतःवर आणि इतरांवर देखील अन्याय करणे आहे.  

नात्यात मुलींसाठी असतात या गोष्टी महत्त्वाच्या, या गोष्टी असतील तर टिकते नाते

नाते महत्वाचे की जीव?

लहानपणापासूनच आपल्याला कसेही करून नाते टिकवण्याचीच शिकवण दिली जाते तरीही काही वेळा परिस्थिती अशी असते की वेगळे होणे आणि नाते संपवणे शहाणपणाचे ठरते. काही नाती ही हातावर घेतलेल्या जळत्या निखाऱ्याप्रमाणे असतात. तुम्हाला तो निखारा कितीही प्रिय असला तरीही त्या निखाऱ्यामुळे तुम्हाला केवळ जखम व चटकेच मिळतात. त्यामुळे तो निखारा वेळीच टाकून देणे योग्य असते. 

ADVERTISEMENT

कसेही करून नाते टिकवण्याचा अट्टाहास करणे काहीवेळेला महागात पडते आणि त्यामुळे आयुष्यभराचे नुकसान होते. कधीकधी एकमेकांवर प्रचंड प्रेम असूनही नाते एका अश्या वळणावर येऊन ठेपते की आपल्याला त्या नात्याबद्दल संभ्रम वाटू लागतो. सततची भांडणे, भरपूर मतभेद आणि एकमेकांवर अजिबात विश्वास नाही अश्या परिस्थितीत तुम्ही ते नाते टिकवून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही सत्य हेच असते की तुमच्या भल्यासाठी तुम्ही एकमेकांपासून वेगळे होणे ही त्या काळाची गरज असते. अर्थात आपण ज्या व्यक्तीवर जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीपासून वेगळे होण्याचा विचार देखील अगदीच भयानक वाटतो, अशक्य वाटतो. तरीही त्यावेळी ते नाते संपवण्यातच शहाणपण असते. 

मोठे भांडण झाल्यानंतर जर आपल्या आयुष्यात राहण्यासाठी तुम्हाला लोकांकडे अक्षरश: भीक मागावी लागत असेल तर कृपा करून त्या नात्यातून मोकळे व्हा. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सोडून दिले तर जी अपराधी भावना मनात घर करते ती  खरे तर प्रेम नसून सहानुभूतीची भावना असते कारण तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला दुखावलेले बघायची इच्छा नसते.पण कधी कधी हे पाऊल उचलणे गरजेचे होऊन बसते. टॉक्सिक व्यक्ती आणि टॉक्सिक नात्यांपासून लांब राहणेच आपल्या भल्याचे असते.

अधिक वाचा-

तुटलेले नाते पुन्हा जोडण्याचा विचार करत असाल तर

ADVERTISEMENT

Toxic Relationship मध्ये गुंतून राहणं किती आहे धोकादायक, काय करायला हवं

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT