ADVERTISEMENT
home / Love
meaning of different colors of roses

Rose day 2022 : गुलाबाच्या फुलाच्या रंगावरून ठरतात अर्थ, अशा व्यक्त करा भावना

प्रेम नेहमी गुलाबाचं फुल देवून व्यक्त केलं जातं. मग तुम्ही गुलाबाच्या फुलांचा मोठा बुके द्या अथवा एक छोटंसं गुलाबाचं फुल त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही कोणत्या रंगाचं गुलाब एखाद्याला देता यावरून मात्र तुमच्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला समजू शकतात. व्हॅलेंटाईन्स विकची सुरुवातच रोझ डेपासून होते. त्यामुळे तुम्ही मैत्री अथवा प्रेमाची सुरुवात गुलाबाच्या फुलाने नक्कीच करू शकता. यासाठीच रोझ डे साजरा करण्यापूर्वी जाणून गुलाबाच्या रंगाविषयी ही महत्त्वाची माहिती… त्यासोबतच यंदाचा प्रेमदिन साजरा करण्यासाठी जवळच्या लोकांना द्या Valentines Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाइन्स डे कोट्स आणि संदेश

लाल रंगाचे गुलाबाचे फुल

meaning of different colors of roses

जर तु्म्हाला एखादी व्यक्ती मनापासून आवडत असेल आणि तुमच्या मनातील प्रेम भावना तिच्यापर्यंत पोहचवायच्या असतील तर, उत्तम पर्याय म्हणजे त्या व्यक्तीला लाल रंगाचे गुलाबाचे फुल द्या. कारण लाल रंगाचे गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. जर तुम्ही रोझ डेला एखाद्याला लाल रंगाचं गुलाबाचं फुल दिलं तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोज करत आहात असा होतो. या दिवशी खास तयार होण्यासाठी…Valentines  Day: व्हॅलेंटाईन डेला आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा हे ‘रोमॅंटिक ड्रेस’ (Dress For Valentines Day In Marathi)

सफेद रंगाचे गुलाबाचे फुल

meaning of different colors of roses

लाल रंगाच्या गुलाबाने जशी तुम्ही प्रेमाची सुरुवात करता तशीच एखाद्यासोबत नात्याची नवी सुरूवात करण्यासाठी तुम्ही सफेद रंगाचे गुलाबाचे फुल देऊ शकता. कारण सफेद रंग हा शांतीचे प्रतिक मानले जाते. जुनी भांडणे मिटवण्यासाठी, नव्याने नात्याची सुरुवात करण्यासाठी, एखाद्याची माफी मागण्यासाठी सफेद रंगाचे गुलाबाचे फुल देणं नक्कीच परफेक्ट ठरेल.

पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फुल 

meaning of different colors of roses

प्रेमाची सुरूवात नेहमी मैत्रीपासून होते. त्यामुळे जर तुम्हाला रोझ डेला एखाद्या व्यक्तीशी मैत्री करायची असेल तर त्याला पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फुल द्या. कारण पिवळ्या रंगाचे गुलाब मैत्रीचे प्रतिक मानले जाते. पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फुल देऊन तुम्ही एखाद्यासोबत आयुष्यभराच्या मैत्रीसाठी हात पुढे करू शकता. 

ADVERTISEMENT

गुलाबी रंगाचे गुलाबाचे फुल

meaning of different colors of roses

एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला अजून प्रेमभावना नसतील पण त्या व्यक्तीला जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला गुलाबी रंगाचे फुल देऊ शकता. साधारणपणे मुलींना गुलाबी रंग खूप आवडतो. शिवाय पहिल्यांदा डेटवर जाताना एखाद्याला गुलाबी रंगाचे फुल देणं सभ्यतेचं लक्षण मानलं जातं. कारण पटकन लाल रंगाने प्रेम व्यक्त करण्यापेक्षा हळू हळू नात्याची सुरुवात करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Gift For Boyfriend In Marathi)

केशरी रंगाचे गुलाबाचे फुल

meaning of different colors of roses

एखाद्या गोष्टीबद्दल असलेली जिद्द तुम्ही केशरी रंगाच्या फुलातून व्यक्त करू शकता. साधारणपणे जर तुम्ही तुमच्या गुरू अथवा मार्गदर्शकांना केशरी रंगाचे फुल देऊ शकता. ज्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही जे ज्ञान संपादन करत आहात त्याबद्दल तुमच्या मनात असलेली तळमळ यातून व्यक्त होऊ शकते. कारण केशरी रंग हे उत्साह आणि ऊर्जेचं लक्षण आहे. 

03 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT