ADVERTISEMENT
home / Uncategorized
लहान बाळांच्या सवयी

बाळांना लागलेल्या या वाईट सवयी आताच बदला

 घरात बाळ असेल तर त्याचे किती लाड होतात हे सांगायला नको. आताच्या या काळात मुळातच घरात फार कमी माणसं आणि त्यात एखादा लाडोबा आला की, त्याचे लाड कसे करायचे? याकडे घरातल्यांचा अधिक कल असतो. पण बाळांना लाडवताना त्यांना अशा काही सवयी लागतात की, त्या वाईट सवयी बदलणे हे फारच त्रासदायक होऊन जाते. कधी कधी काहीही मनात नसताना आपण मुलांशी काहीतरी संवाद साधतो. अशावेळी त्यातून काही चुकीच्या गोष्टीच बाळ लगेच अंगिकरताना आपल्याला दिसतात. कदाचित लहान बाळांचे पालक म्हणून आपल्याला या सवयी पटकन दिसत नाही. पण एक तिसरी व्यक्ती म्हणून त्या सवयी आपल्याला पटकन दिसून येतात. अशा वाईट सवयी मुलांना लागल्या असतील तर त्या योग्यवेळीच बदलणे फार जास्त गरजेचे असते. तुमच्या बाळांना लागलेल्या अशाच वाईट सवयी तुम्ही एकदा जाणून घ्या आणि त्या कशा सोडवायच्या त्याची तयारी करा. लहान मुलांना ताप येत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करा.

मारण्याची सवय

मारण्याची सवय

खूप जण लहान मुलांना अप कर, हट कर अशी सवय खूप जण लावतात. उगाचच काहीही कारण नसताना खूप जण असे करण्यास सांगतात. लहान मुलांना चांगले काय? वाईट काय? लहान काय आणि मोठे काय यातला कोणताही फरक कळत नाही. त्यामुळे होते असे की, कधी कधी अचानक मुलं काहीही केलेेले नसताना घरी आलेल्यांना पटकन हट किंवा अप करतात. काही वेळा लहान मुलं अचानक मुलांवर असा काही हात उचलतात की, समोरच्याला त्याची अपेक्षा नसते. 

 चार चौघात मुलं असं वागू लागली की, मात्र अपमान वाटतो. त्यामुळे तुम्ही मुलांना ही सवय लागत असेल तर आताच सोडा. कारण पुढे जाऊन मुलांमध्ये ही सवय वाढत जाते. योग्यवेळीच ही सवय बंद केली नाही तर ती पुढे जाऊन मुलांसाठी त्रासदायक ठरु शकते.

बाहेरचे खाण्याची सवय

खूप पालक मुलांना अगदी खूप लहानपणापासून बाहेरचे जास्त खाऊ घालतात. मुलांना बाहेरच्या अन्नपदार्थ खाण्याची सवय लावणे हे योग्य असले तरी देखील खूप जास्त वेळा बाहेरचे पदार्थ खाणे हे बाळांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. खूप पालक बाळ खात नाही म्हणून त्यांना फ्राईज, कोकाकोला किंवा पावाचे चटपटीत पदार्थ खाण्याची सवय लावतात. त्यामुळे होते असे की, घरी बनवलेला साधा डाळ भात बाळांना अगदीच नकोसा होऊन जातो. त्यामुळे बाहेरचे खायचे असले तरी देखील बाळांना जे आवश्यक आहे ते जेवण आधी भरवा. शक्यतो त्यांना बाहेरच्या जेवणाची चटक लागू देऊ नका. 

ADVERTISEMENT

एकटेपणाची सवय

एकटेपणाची सवय

हल्लीची खूप बाळ ही एकटीच असतात. त्यांना काहीही शेअर करायची सवय नसते. त्यामुळे होते असे की, बाळांना कोणी आले तरी त्यांच्यासोबत काहीही शेअर करायची इच्छा नसते. त्यामुळे मुलं हट्टी होतात. अगदी कोणीही त्यांच्या ताटातील किंवा खेळण्याची वस्तू उचलली की, त्यांचा राग राग होतो. घरात एखादी नवीन व्यक्ती आली आणि चुकून त्याने तुमच्या बाळांच्या वस्तूला हात लावला की, लगेचच त्याची चीडचीड सुरु होते. पुढे जाऊन हा स्वभाव एकलकोंड्या स्वभावाकडे नेण्यास प्रवृत्त करतो. मुलांना कायम Sharing with caring हा नियम कायम शिकवा. तरच पुढे जाऊन मुले ॲडजस्ट करायला तयार होतात. 

तुमच्या मुलांनाही या वाईट सवयी लागल्या असतील तर त्य आताच योग्य वेळी बदला.

18 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT