ADVERTISEMENT
home / आरोग्य
lahan-mulanchya-tapasathi-upay-in-marathi

लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे | Lahan Mulancha Tap Kami Karnyache Upay

लहान मुलांना ताप येणे हे अत्यंत कॉमन आहे. पण लहान मुलांना ताप आल्यावर पालक घाबरून जातात. ज्यांच्या घरात मोठी माणसं आहेत, ते आपल्या अनुभवावरून लहान मुलांना ताप आल्यावर घरगुती उपाय करण्यावर अधिक विश्वास ठेवतात. तर लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे, त्याला नक्की डॉक्टरांकडे घेऊन जायचं की घरात पहिले उपाय करून पाहायचा याबाबतीही पालक संभ्रमात असतात. पण त्याआधी लहान मुलांना ताप येण्यामागील कारण (लहान मुलांना ताप का येतो) हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसंच लहान मुलांच्या तापावर घरगुती उपाय काय करावा (Lahan Mulanchya Tapavar Upay) हेदेखील आपण या लेखातून पाहणार आहोत. 

लहान मुलांना ताप येण्यामागील कारण

लहान मुलांना ताप येण्यामागील कारण  | लहान मुलांना ताप का येतो?
लहान मुलांना ताप येण्यामागील कारण  (लहान मुलांना ताप का येतो)

लहान मुलांच्या बाबतीत ताप आल्यानंतर योग्य निर्णय घेण्यासाठी मुळात लहान मुलांना ताप येण्यामागील कारण (लहान मुलांना ताप का येतो) जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ताप येणे म्हणजे खरं तर संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाणारी एक स्वसंरक्षणाची यंत्रणा आहे. ताप येणे म्हणजे शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेला बाधा आणणे. पण लहान मुलांना ताप येण्याचे नक्की कारण काय आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या लहान मुलाला ताप आला असेल आणि तरीही बाळ सक्रिय असेल तर तुम्ही घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. पण अशावेळी त्याच्या खाण्यापिण्यावर आणि लघ्वीकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे. पण जर मुलांना दोन दिवस सतत ताप असेल आणि साधारण 1-2 च्या वर ताप असेल तर मात्र नक्कीच डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे.

लहान मुलांना नक्की ताप का येतो याची महत्त्वाची कारणे – 

  • जर आपल्या बाळाला सर्दी झाली असेल तर त्यामुळे बाळाला ताप येतो
  • आपल्या लहान मुलांना लसीकरण केल्यानंतर ताप येऊ शकतो
  • तर आपल्या लहान बाळांना दात येतात तेव्हा ताप येतो

लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे

लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे
लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे

बऱ्य़ाचदा लहान मुलांना ताप आल्यावर घरातील पातळ औषधांचा वापर करण्यात येतो. पण हा नक्कीच तापावर सर्वात चांगाल उपाय नाही. लहान मुलांना ताप आल्यावर नेहमी नैसर्गिक आणि घरगुती उपायांची निवड करावी. जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत नाही. 

ADVERTISEMENT
  • अशीच औषधे द्यावीत ज्याने लहान मुलांची पचनशक्ती कमी होणार नाही
  • तसंच लहान मुलांच्या यकृताला अथवा मेंदूवर दुष्परिणाम होणार नाहीत अशीच लहान मुलांच्या तापावर औषध द्यावीत
  • एक – दोन दिवस ताप राहिल्यास, बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा 
  • ताप 101 – 102 च्या वर आला आहे असं दिसून आल्यास थंड पाण्याच्या पट्टी ठेवाव्यात 
  • दर दोन तासाने लहान मुलांचा ताप तपासावा 
  • तळपायाला काशाच्या वाटीने घासावे, जेणेकरून अंगातील ताप कमी होण्यास मदत होते

लहान मुलांच्या जुलाबावर घरगुती उपाय

लहान मुलांच्या तापावर घरगुती उपाय | Lahan Mulanchya Tapavar Gharguti Upay

लहान मुलांना ताप आल्यावर लगेच डॉक्टरांकडे धावत जाणं हे कधीही योग्य नाही. त्याआधी लहान मुलांच्या तापावर घरगुती उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे, त्यासाठी तुम्ही नक्की काय घरगुती उपाय करू शकता याबाबत अधिक माहिती. 

मीठ – पाण्याच्या पट्ट्या (Salt – Water Patti)

मीठ - पाण्याच्या पट्ट्या (Salt - Water Patti)
मीठ – पाण्याच्या पट्ट्या (Salt – Water Patti)

लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मनात सर्वप्रथम जर घरगुती उपाय काही येत असेल तर तो म्हणजे तापामध्ये कपाळावर मीठ – पाण्याच्या गार पट्ट्या ठेवणे. हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे लहान बाळांचा ताप लवकर उतरण्यास मदत मिळते. 

  • थंड पाण्यामध्ये 2 चमचे अॅप्पल साईडर व्हिनेगर घाला
  • त्यात कॉटनचा कपडा बुडवा आणि लहान बाळाच्या कपाळावर पट्टी ठेवा आणि एक मिनिट ठेऊन पुन्हा काढा 
  • ताप कमी होईपर्यंत असं करा 

शरीरातील उष्णता काढून टाकण्यासाठी याचा खूपच चांगला उपयोग होतो. तसंच तुमचे बाळ अगदी लहान असेल तरीही हा उपाय अत्यंत योग्य ठरतो. अगदी डॉक्टरही हाच उपाय सर्वात पहिल्यांदा सांगतात. 

ADVERTISEMENT

स्पंज बाथ (Sponge Bath)

तुमचे बाळ जर नवजात असेल आणि त्याला ताप आला असेल तर त्यासाठी तुम्ही स्पंज बाथचा उपयोग करून घेऊ शकता. तर थोड्या मोठ्या मुलांसाठी टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यांना स्पंजने पुसणे अथवा अगदी पटकन आंघोळ घालणे अधिक चांगले ठरू शकते. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास, शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत मिळते. ताप असताना लहान मुलांना थंड पाण्याने आंघोळ घालणे सहसा टाळावे. थंड पाण्यामुळे मुलांना हुडहुडी भरण्याची शक्यता असते. 

याशिवाय तुम्ही थंड पाण्यात कोलन वॉटर मिक्स करूनही लहान मुलांना स्पंजिंग करू शकता. यामुळे ताप उतरण्यास मदत मिळते. 

पंख्याचा योग्य वापर (Always Use Fan)

बऱ्याचदा आपल्या मुलाला ताप आल्यानंतर पंखा बंद केला जातो. अनेक जण अगदी जुन्या काळातील लोक पंखा बंद करायला सांगतात. पण असं अजिबात करू नका. आपल्या मुलाला हवा हसतीखेळती असेल अशाच खोलीमध्ये ठेवा. ही खोली हवेशीर आणि उबदार असेल याची काळजी घ्या. तसंच ताप आला असेल पंखा अजिबात बंद करू नका. खूप थंडी वाजत असेल तर पंख्यांची गती थोडी कमी करा. यामुळे मुलाच्या अंगातील तापमान योग्य राखण्यास मदत मिळते. 

नियमित अंतर ठेऊन आहार द्या (To Give Healthy Food)

नियमित अंतर ठेऊन आहार द्या (To Give Healthy Food)

बरेचदा लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे हे कळत नाही आणि मुलांनाही या काळात भूक लागत नसते. पण तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरात ताप असताना लहान मुलांना विटामिन एस, बी, सी तसंच कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे या काळात मुलांना भाताची तूप घातलेली पेज अथवा मऊ भात, उकडलेल्या भाज्यांचे सूप, चिकन सूप द्या. जेणेकरून, मुलांचे शरीर संसर्गाशी योग्य पद्धतीने सामना करू शकते आणि पांढऱ्या पेशींमध्ये योग्य वाढ होऊ शकते. तसंच दर तीन ते चार तासाने आपल्या मुलांच्या पोटात योग्य आणि त्याला पचण्याजोगे खाणे जात आहे की नाही याची काळजी तुम्ही घ्या. मुलांना संतुलित आहार देणे या काळात अधिक गरजेचे आहे. तसंच या काळात मुलांना जंक फूड, मसालेदार खाणे देणे टाळा. मऊ डाळ – तांदूळ खिचडी, कुस्करलेले केळे, उकडलेला बटाटा, अन्नधान्य, सुकामेवा अशा पद्धतीचे खआणे तुम्ही द्या. 

ADVERTISEMENT

कपड्यांची निवड (How To Select Cloths)

लहान मुलांना ताप आलेला असताना जास्त कपडे घालावेत असा बराच ठिकाणी समज आहे. मात्र हे चुकीचे आहे. ताप आलेला असताना लहान मुलांनी शरीराची उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत हलके आणि स्वच्छ कपडे परिधान करणे आवश्यक आहे. कपड्यांचे अनेक स्तर घातल्यास, ताप अधिक वाढतो. त्यामुळे मुलाला थंडी वाजत असल्यास, तुम्ही चादर अथवा ब्लँकेटचा वापर करावा मात्र कपडे अगदी हलके आणि पातळ घालावेत हे कायम लक्षात ठेवा. 

विश्रांती आणि झोप (Sleep)

विश्रांती आणि झोप (Sleep)

लहान असो वा मोठी व्यक्ती असो, कोणालाही विश्रांती आणि झोप मिळणे हे अत्यंत गरजेचे असते. पुरेशी झोप आणि विश्रांती मिळाल्यावर मुलांना लवकर उत्साह आणि ऊर्जा मिळते. विश्रांती मिळाल्यावर शरीराची झालेली झीज ही भरून निघते. तसंच मुलांच्या शरीराची हालचाल कमी होईल याकडे जास्त लक्ष द्या. त्यांच्या आवडीचे खेळ त्यांच्याबरोबर तुम्ही थोडा वेळ खेळा, गोष्टी सांगणे, गप्पा मारणे अशा गोष्टी करा जेणेकरून त्यांची ऊर्जा वाचेल आणि औषध दिल्यावर ते अधिक झोपतील याकडे तुम्ही लक्ष द्या. 

कांदा (Onion To Remove Fever)

कांदा (Onion To Remove Fever)

आपल्याला अनेकवेळा आई अथवा आजीकडून कांद्याच्या औषधी गुणांविषयी सांगण्यात आलेले असते. लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे यासाठी घरगुती उपाय करताना आपण कांद्याचा उपयोग करून घेऊ शकतो. कांदा हा शरीराचे उष्ण तापमान कमी करण्यास उपयोगी ठरतो, तसंच कांद्यामुळे तापातील वेदनाही कमी होतात. 

  • कांद्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत आणि तुम्ही आपल्या लहान मुलांच्या पायांवर 2-3 तुकडे काही वेळ ठेवा 
  • ताप कमी करण्यासाठी तुम्ही हा प्रयोग दिवसातून किमान दोन वेळा करू शकता 

आलं (Ginger For Fever)

आलं (Ginger For Fever)

ताप हा सांसर्गिक आजार आहे आणि असा संसर्ग नष्ट करण्यासाठी आल्यामध्ये अनेक गुण आढळतात. आल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन घाम येण्यास मदत मिळते. तसंच शरीरामध्ये पसरलेले विषाणू आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास आल्याची मदत मिळते. 

ADVERTISEMENT
  • गरम पाण्यात तुम्ही 2 चमचे आल्याची पावडर घाला (किसलेले आले घातले तरीही चालेल) आणि पाण्यात व्यवस्थित मिक्स करा
  • या पाण्याने तुम्ही तुमच्या लहान बाळाला आंघोळ घाला. यामुळे शरीराची उष्णता कमी होते. मात्र आपल्या लहान मुलांना आंघोळ घालताना त्यांच्या डोळ्यांची काळजी घ्यायला विसरू नका. कारण आल्यात तिखटपणा असतो आणि डोळ्याला हानी पोहचवू शकतो

कॅमोमाईल चहा (Camomile Tea)

कॅमोमाईल चहा (Camomile Tea)

कॅमोमाईल चहा हा तापावर चांगला उपाय ठरतो. कॅमोमाईल चहाचे अनेक फायदे आहेत. यासाठी तुम्ही सोपी पद्धत वापरावी 

  • पाणी साधारण एक मिनिटपर्यंत उकळून घ्या आणि त्याने कॅमोमाईलची पाने घाला
  • त्यानंतर त्यात मध घाला आणि उकळून घ्या 
  • आपल्या लहान मुलाला दिवसातून दोन वेळा जितके थेंब देता येईल तितके द्या कारण मुलांना याची चव अजिबात आवडत नाही

मध आणि लिंबाचा रस (Honey And Lime Juice)

मध आणि लिंबाचा रस (Honey And Lime Juice)

विटामिन सी हे पोटात गेल्यास अधिक शक्ती मिळवते आणि आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे लिंबातील विटामिन सी आपल्या लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरते. मध शरीराला पोषण देते. ताप आला असताना या दोन्ही पदार्थांचे मिश्रण हे अत्यंत प्रभावी ठरते. 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपल्या बाळाला प्यायला द्या. यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळते. 

मोहरीचे तेल लसूण घालून 

तापावर मोहरीचे तेल आणि लसूण दोन्ही अत्यंत प्रभावी ठरतात. तसंच यामुळे घाम येऊन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते. 

  • 2 चमचे मोहरीचे तेल गरम करून घ्या आणि त्यात 1 चमचा लसूण पेस्ट घाला
  • साधारण दोन मिनिट्स हे मिश्रण तसंच ठेवा 
  • त्यानंतर आपल्या लहान मुलांच्या तळहात, पाय, छाती, पाय आणि मानेला झोपण्याच्या आधी लावा. जेणेकरून ताप पटकन कमी होण्यास मदत मिळते

मनुके 

मनुके

मनुक्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुण असतात, ज्यामुळे ताप उतरण्यास मदत मिळते. त्यामुळे लहान मुलांना ताप आल्यावर मनुकांचा वापर करता येतो. 

ADVERTISEMENT
  • अर्धा कप पाण्यात 20-25 मनुका साधारण एक तास भिजवा 
  • मनुका मऊ झाल्यावर पाणी काढा आणि क्रश करून घ्या
  • त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि मग हे मिश्रण लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तुम्ही द्या. यामुळे ताप निघून जाण्यास मदत मिळते

लहान मुलांचा व्हायरल ताप तापावर घरगुती उपाय  

व्हायरल म्हणचे विषाणूजन्य ताप (Viral Fever). अर्थात हवेतील बदलामुळे लहान मुलांना संसर्ग होतो. बरेचदा उन्हाळ्यात हीट स्ट्रोक होतो. हीट स्ट्रोकपासून मुलांचे संरक्षण करावे लागते. तसंच या तापावरही घरगुती उपाय करून काळजी घेतली जाऊ शकते. अशा व्हायरल तापावर घरगुती उपाय काय आहेत, ते जाणून घेऊया 

तुळशीची पाने (Basil Leaves) 

तुळशीचे फायदे - Tulsi Benefits In Marathi

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसंच जंतूनाशक गुणधर्मही असतात. तुळस ही अगदी पूर्वपरंपरागत तापावर औषध म्हणून वापरण्यात येते. व्हायरल तापावर तुळशीचा चांगला उपयोग करून घेता येतो. 

  • साधारण तुळशीची 20 पाने एक लीटर पाण्यात उकळा आणि उकळताना यात अर्धा चमचा लवंग पूड घाला
  • हे पाणी अर्धे होईपर्यंत आटवा 
  • थंड झाल्यावर आपल्या लहान मुलाला दर 2 तासाने पाजा. यामुळे ताप लवकर जाण्यास मदत मिळते  

बडीशेप (Fennel Seeds)

बडीशेप (Fennel Seeds)

बडिशेप ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये मोनोटेरपेन्स आणि फ्लेव्होनॉईट्स घटक असतात. शरीराचे तापमान यामुळेच प्रभावीपणे कमी होते आणि त्यामुळे व्हायरल तापावर याचा योग्य परिणाम होतो. ताप कमी होण्यासाठी तुम्ही बडिशेपेचा काढा करून आपल्या लहान मुलाला देऊ शकता. 

धणे (Coriander Seeds)

धणे (Coriander Seeds)

धन्यातील फायटोन्यूट्रिएंट्स आणि विटामिन्स हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदेशीर ठऱतात. तसंच धणे व्हायरल ताप कमी करण्यासाठी अधिक चांगले ठरतात. 

ADVERTISEMENT
  • उकळत्या पाण्यामध्ये धणे घाला, त्यात थोडी साखर घाला आणि त्याचा काढा तयार करा
  • थंड झाल्यावर गाळून घ्या आणि तुमच्या लहान मुलांना हे पाजा. ताप लवकर जाण्यास मदत मिळते 

तांदळाची पेज 

आपल्याला लहानपणापासूनच तांदळाची पेज ताप आल्यावर पिण्याची सवय असते. पण यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का? रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत करण्यसाठी तांदळाच्या पेजेचा उपयोग होतो. ताप आल्यावर प्रतिकारशक्ती कमी होते आणि इतर कोणतेही जड पदार्थ शरीरात पचत नाहीत. त्यामुळे तांदळाची पेज तुम्ही तुमच्या लहान मुलांना द्या. साधा ताप असो वा व्हायरल ताप असो यावर तांदळाची पेज हा उत्तम उपाय ठरतो. जेणेकरून शरीरात ऊर्जाही टिकून राहते आणि प्रतिकारशक्तीही वाढते. 

नारळाचे तेल

नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याचे गुण असतात. तुम्ही लहान मुलांच्या अंगाला नारळाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करा अथवा जेवणातून थोडेसे नारळाचे तेल मुलांच्या पोटात जाईल असं जेवण तुम्ही तयार करू शकता. 

मेथीचे दाणे 

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी तत्वे असतात. प्रभावीपणे विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. 

  • मेथीचे दाणे तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि सकाळी पाणी गाळून घ्या 
  • हे पाणी तुम्ही तुमच्या लहान मुलाला प्यायला द्या. यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळते 

लहान मुलांच्या तापावर औषध देण्याआधी

  • लहान बाळाला अथवा लहान मुलांना ताप आल्यास तुम्ही कोणतेही औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे बाळ 3 महिन्यांपेक्षा लहान असेल तर स्वतःच्या मनाने कोणतेही औषध देणं सहसा तुम्ही टाळा
  • औषध देण्यापूर्वी तुम्ही पुरेशी काळजी घ्या. कोणतेही ओरल ड्रग अर्थात औषध देण्यापूर्वी ताप तुम्ही तपासून पाहणे योग्य ठरेल. ताप 100 degrees F पेक्षा कमी असेल आणि बाळाचं अंग गरम वाटत असेल तर तुम्ही कोणतीही गोळी अथवा औषध देणे टाळा 
  • बाळाच्या वजनानुसार औषधाचा डोस ठरवा. औषध देण्यापूर्वी डोसचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा
  • लहान मुलांना ताप आल्यानंतर प्रथम त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याचा घड्या ठेवा, जो अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा उपाय आहे. कोमट पाण्याने लहान मुलांचे अंग पुसून घ्या

प्रश्नोत्तरे (FAQs)

प्रश्न – लहान मुलांना तापात पॅरासिटेमॉल देणे योग्य आहे का?
उत्तर – लहान मुलांना तापात तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध देऊ नये. मोठ्यांसाठी ही गोळी वापरणे योग्य आहे. मात्र लहान मुलांच्या बाबतीत कोणतेही पाऊल स्वतःहून उचलू नका. 

ADVERTISEMENT

प्रश्न – लहान मुलांना तापात काय खायला द्यावे?
उत्तर – लहान मुलांना ताप असेल तर तुम्ही दालखिचडी, चिकन सूप, भाज्यांचे सूप, दलिया, फळांचा ताजा रस, आलं-ओवा, काढा असे पदार्थ खायला देणे योग्य ठरते. 

प्रश्न – मुलांचा ताप कमी करण्यासाठी हिंगाचा वापर करू शकतो का? 
उत्तर – साधारणपणे बाळ एक महिन्याचे असल्यापासून ते पाच वर्षांच्या लहान मुलांपर्यंत तुम्हाला ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून हिंगाचा वापर करण्यात येऊ शकतो. तुम्ही एका लहान चमच्यात पाणी आणि चिमूटभर हिंग घ्या आणि त्यावर कॉटनची पट्टी भिजवून लहान मुलांच्या डोक्यावर ठेवा. यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळते. 

निष्कर्ष –  लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे,  लहान मुलांच्या तापावर घरगुती उपाय (Lahan Mulanchya Tapavar Upay), लहान मुलांना ताप का येतो, लहान मुलांच्या तापावर औषध यावर महत्त्वाची माहिती देण्याचा या लेखात आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हालादेखील यापैकी कोणत्याही घरगुती उपायाचा वापर करायचा असल्यास, नक्की करू शकता. मात्र याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. 

14 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT