आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन (Jagtik Mahila Din Quotes In Marathi) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरिही आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या महिला दिन माहिती, का साजरा केला जातो महिला दिन, शिवाय या खास दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांना पाठवा या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश (Womens Day Wishes In Marathi), जागतिक महिला दिन स्टेटस मराठी (Womens Day Status In Marathi), महिला दिन विशेष मराठी कविता, महिला दिवस कोट्स मराठी (Womens Day Quotes In Marathi), मेसेजेस मराठी (Womens Day SMS In Marathi) आणि सुविचार (Womens Day Thoughts In Marathi)
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Inspirational Women’s Day Quotes In Marathi
खरं तर फक्त ८ मार्च महिला दिन मनवून फायदा नाही, म्हणजे एकच दिवस आपल्या आई, बहीण, मैत्रीण यांना special अनुभव देऊन फायदा नाही. त्यांना रोजच आनंद देणे आपले कर्तव्य आहे. या महिला दिनानिमित्त तुमच्या जवळच्या महिलांना गिफ्ट्स देऊन तुम्ही त्यांना आनंद देऊ शकतात याशिवाय महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्यासोबत काही लोकप्रिय महिलांचे प्रेरणादायी संदेश / कोट्स , जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा – Women’s Day Quotes In Marathi शेअर करत आहोत, या शुभेच्छा पाठवून सुद्धा तुम्ही हा दिवस त्यांच्या सोबत साजरा करू शकतात.
कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे आणि दृष्टीकोनविना कृती करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. म्हणूनच कृतीला दृष्टीकोनाची जोड द्या तुमचे जग बदलू शकेल – सुधा मुर्ती
स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता – पी. व्ही. सिंधू
स्वप्नांचा पाठलाग करा आणि संयमी राहा – अॅंजेलिक केर्बर
तुम्ही एकतर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःच समुद्र व्हावे लागेल. – ऑप्रा विन्फ्रे
तुम्हाला तुमच्या शत्रुंसमोर उभं राहण्यासाठी फार धैर्याची गरज असते. मात्र त्याहून जास्त संयम लागतो तुमच्या प्रियजनांसोबत उभं राहण्यासाठी – जे. के. रोलिंग
इतरांना धक्का न देताही तुम्ही शिखर गाठू शकता – टेलर स्विफ्ट
जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते – ब्रिघम यंग
संशय हा एक खूप मोठा शत्रू आहे. आपण कोण आहोत आहेत आपला जन्म कशासाठी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे – जेनिफर लोपेझ
प्रत्येक व्यक्तीने कठीण परिस्थितीला तोंड देण्यास आणि जोखिम घेण्यास तयार असावं – प्रतिभाताई पाटील
तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे – अॅटिकस
महिला नेहमीच विजयी राहतील – महादेवी वर्मा
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात – मोपासा
महिलांना अबला म्हणणं हा त्यांचा अपमान आहे- महात्मा गांधी
महिला या पृथ्वीप्रमाणे धैर्यवान, शांतीसंपन्न आणि सहिष्णू असतात – प्रेमचंद
जी महिला आदर्श स्त्री असते ती आदर्श पत्नी होऊ शकते, महिलांच्या हातात लक्ष्मी नांदते – प्रेमचंद
ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य व दुःख कायम वास करतात – सदगुरू श्री वामनराव पै
घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या पावलांने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते – सदगुरू श्री वामनराव पै
स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीची अपमान आहे – सुर्यकांत त्रिपाठी निराला
स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे – भगवतीचरण वर्मा
एखाद्या कठोर आणि दुराचारी व्यवहाराला प्रेम आणि मायेने बदलण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे – शरदचंद्र
बेस्ट महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश | Women’s Day Wishes In Marathi
महिला दिनासाठी शुभेच्छा संदेश – Mahila Dinachya Hardik Shubhechha
महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना आपण बघतोय आणि ज्या महिलांमध्ये कार्यक्षमता आहे अशा महिलांना पोत्साहन देणे किंवा त्यांना किंवा त्यांना यशस्वी महिलांच्या यशोगाथा सांगून प्रोत्सहन देणे आपले कर्तव्य आहे. म्हणून महिलादिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास महिलांना प्रोत्साहन म्हणून काही शुभेच्छा संदेश (womens day messages in marathi) तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. (Happy Women’s Day In Marathi)
विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू. एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याने घडवली सृजनांची सावली, निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. महिला दिनाच्या शुभेच्छा. (Happy Women’s Day In Marathi)
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता. महिला दिनाच्या शुभेच्छा. (Happy Women’s Day In Marathi)
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा. (Happy Women’s Day In Marathi)
वाचा – महिला दिनाच्या दिवशी सौंदर्यात घाला भर, दिसा आकर्षक
लेटेस्ट महिला दिनाच्या शुभेच्छा | Mahila Din Quotes In Marathi
Women’s Day Banner With Quotes In Marathi
काही विचार जीवन जगण्याचं बळ देतात. यासाठी काही प्रसिद्ध महिलांचे हे विचार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
कोणतीही टीका गांभिर्याने घ्या पण वैयक्तिक नको कारण टीकेमधील सत्यता आणि अचूकपणा तपासणं गरजेचं आहे. अन्यथा तिच्याकडे दुर्लक्ष करणंच बरं – हिलरी क्लिंटन
जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाचे महत्त्व समजते – मलाला युसूफजाई
जर तुम्हाला डोअरमॅट व्हायचं नसेल तर वरच्या मजल्याच्या दिशेने झेप घ्या – अल अॅनन
प्रत्येक महिलेचं संरक्षक कवच म्हणजे तिचं धैर्य – एलिझाबेथ कॅडी स्टॅनन
स्वतःशी कधीच तडजोड करू नका. कारण तुम्हाला जे हवं आहे हे काल आणि उद्या नाहीतर तुम्हाला आजच मिळणार आहे – जेनिस जोपलिन
लोक प्रयत्न करायचं सोडून देतात कारण त्यांना त्यांच्या हातात काहीच नाही हे वाटत असतं. – अॅलिस वॉकर
तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काय करायचं आहे हे माहीत असणे – शैयला मॅरे बेथेल
प्रत्येकीकडे गुड न्यूज आहे. तुम्ही किती ग्रेट आहात, तुम्ही इतरांवर किती प्रेम करू शकता आणि काय काय साध्य करू शकता, तुमच्या क्षमता काय आहे हे तुम्हाला माहीत नाही – अॅने फ्रॅंक
तुम्ही फार सुंदर आहात मात्र तुम्ही किती सामर्थ्यवान आहात हे तुम्हालाच माहीत नाही – मेलिसा इथरिज
तुम्हाला तुमच्यावर सर्वात जास्त कोण प्रेम करतं हे जाणून घ्यायचं असेल तर आरश्यात पाहा – बायरन केटी
एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’ आणि रोजच असावा ‘जागतिक महिला दिन’
खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर मोठ मोठी शिखरं सर करणाऱ्या माझ्या परिचयातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
वाचा – महिलांनी आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा
नवीन महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश | Women’s day Special Quotes, Status In Marathi
महिला दिनाच्या शुभेच्छा – Happy Women’s Day In Marathi
महिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना सशक्त करण्यासाठी काही शुभेच्छा संदेश नक्की वाचा.
यशस्वी व्हायचं असेल तर तयार व्हा आणि कामाला लागा. कारण तुम्हाला आता प्रचंड मेहनत घ्यायची आहे – टोरी बर्च
मी यशस्वी आहे कारण मला आयुष्यात कामे न करण्याची कारणे देणं आवडत नाही – फ्लोरेन्स नाईटिंगेल
आपल्या स्वतःच्या अटींवर यशाची व्याख्या तयार करा. तुमच्या स्वतःच्या नियमांवरच ते मिळवा आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल अभिमान बाळगा – अॅने स्विनी
तुमचं सामर्थ्यच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत असतं – मॅरेल स्ट्रिप
आपला प्रत्येक निर्णय योग्य असेलच असं नाही. कधी कधी आपला निर्णयही चुकू शकतो. हे माहीत असेल तर अपयश तुमच्या यशाच्या आड येणार नाही उलट येणारं अपयश तुमच्या यशाचा एक भाग असेल – एरियाना हफिंग्टन
मी कधीच यशाचं स्वप्न पाहत बसत नाही उलट स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागते – एस्टी लॉडर
मी कोणताच पक्षी नाही किंवा कोणतंही जाळं मला अडवू शकत नाही. कारण मी एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे मी माझ्या तत्वावर जगते – शार्लोट ब्रोंटे
तुमच्या आयुष्याची अभिनेत्री व्हा म्हणजे तुम्ही कोणाला बळी पडणार नाही – नोरा एफ्रोन
पुरूष महिलांशिवाय काय करतील? फक्त चिडचिड आणि चिडचिड – मार्क ट्वेन
एक स्त्री म्हणून माझा कोणताच देश नाही. एक स्त्री म्हणून मला कोणताच देश नको. एक स्त्री म्हणून हे संपूर्ण जगच माझा देश आहे – व्हर्जिनिया वुल्फ
कोणताच देश तोपर्यंत प्रगतीपथावर पोहचू शकत नाही जोपर्यंत त्या देशातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवत नाहीत.
देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची कितीपण पूजा करा, नवरात्रीचा अखंड उपवास करा, पण घरातील स्त्रीला आदर नाही दिला तर सर्व काही व्यर्थ आहे
मैत्रिणीसाठी महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश | Women’s Day Wishes For Female Friend In Marathi)
महिला आजकाल प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत. म्हणूनच तुमच्या सहकाऱ्यांसोबत, मैत्रिणीसाठी महिला दिनानिमित्त शुभेच्छा शेअर करा
यशस्वी महिला कोणालाच आवडत नाहीत. मला वाटतं वैज्ञानिक जगात चांगले सहकारी न मिळणं हा महिलांसाठी असलेला सर्वात मोठा धोका आहे – ख्रिस्टिन नुस्लेन वोलहार्ट
खरी उर्जा तुमच्यात आहे तिला फक्त ओळखा.
जीवनात नेहमी मोठा विचार करा कारण विचार जीवनाला आकार देतात.
कोणतीच स्त्री अशा पुरूषासोबत काम करू शकत नाही जो कतृत्ववान नाही.
जे पुरूष महिलांचा सन्मान करतात त्यांचा सन्मान संपूर्ण जग करतं.
जेव्हा स्त्री स्वतःच स्वतःची मैत्रीण होते तेव्हा तिचं आयुष्य सुखकर होतं.
एक कणखर स्त्रीच दुसऱ्या स्त्रीमध्ये तिच्यासारखा आत्मविश्वास निर्माण करू शकते.
प्रोत्साहनपर पुस्तकं वाचणं हा शहाणपण मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.
चांगली लेडी बॉस असेल तर त्या कंपनीचं भविष्य नक्कीच उज्वल ठरू शकतं.
पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य नक्कीच जास्त असतं.
जी महिला अन्यायाविरूद्ध आवाज उठवते तिच खरी सामर्थ्यशाली आहे.
महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, म्हणून त्यांच्याविषयी बदला आता तुमचे विचार
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Women’s Day Status In Marathi
कॉर्पोरेट विश्वातील महिलांना सतत नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं. यासाठीच हे विचार त्यांना नक्कीच बळ देतील.
अशी कोणतीच गोष्ट नाही ज्या महिला करू शकत नाहीत – मिशेल ओबामा
एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते – ऑप्रा
जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या पुरूषाला विचारा मात्र जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर ती एखाद्या महिलेलाच सांगा – मार्गारेट थॅचर
स्वतःसाठी विचार करणे ही एक ध्यैर्यपूर्ण कृती आहे – कोको चॅनल
वाचा – स्वाभिमान जपणारे उत्कृष्ट मराठी कोट्स (Self Respect Quotes In Marathi)
जीवन ही एक परिक्षा आहे जिथे कोणताच अभ्यासक्रम नाही, प्रश्नपत्रिकादेखील सेट केलेली नाही एवढंच नाही तर तुमच्याकडे कोणत्याही उत्तरपत्रिकेचं आदर्श मॉडेलही नाही. – सुधा मुर्ती
यश, पुरस्कार, पदवी किंवा पैशांपेक्षा चांगले नातेसंबंध, दया आणि मानसिक शांती माणसासाठी फार महत्त्वाची आहे – सुधा मुर्ती
आपल्याला स्वतःविषयीची निर्माण केलेली धारणा बदलण्याची गरज आहे. तरच आपण महिला म्हणून उभं राहू आणि नेतृत्व करू शकू – बियॉन्से
कोणतीच महिला तिच्या शरीराविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही असं नाही. कारण जेव्हा तिच्या हक्कावर हल्ला होतो तेव्हा ती लढू शकते – कमला हॅरीस
जी स्त्री तिचं मत मांडू शकते ती कणखरच असते – मेलिंडा गेट्स
स्त्रीवाद महिलांना कणखर बनवू शकत नाही कारण त्या आधीच कणखर आहेत. फक्त लोकांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कणखर करण्याची गरज आहे – जी. डी. अॅंडरसन
स्त्रीयांना द्या इतका मान की वाढेल आपल्या देशाचा मान
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. महिला दिनाच्या शुभेच्छा
बायकोसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश | Women’s Day Status In Marathi For Wife
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा – Women’s Day In Marathi
बायको ही प्रेयसी, सहचारिणी, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावत असते. म्हणूनच तिला या खास दिवशी एखादा खास मेसेज पाठवायलाच हवा.
प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत…तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा
यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सुखदुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा
आईसाठी महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश | Women’s Day Quotes For Mother In Marathi
आई ही व्यक्तीच अशी आहे तिच्यामुळे या जगात आपला जन्म होतो. आईची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही खूपच छान संधी आहे.
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्री कितीही भित्री असली तरी जेव्हा प्रश्न तिच्या पिलांचा असतो तेव्हा ती वाघीण होते. म्हणूनच आई ही मुलांसाठी सर्वस्व असते. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आई काय करते पेक्षा आई काय काय नाही करत हा प्रश्न मला पडतो आणि आईच्या संस्कारांची जाणिव होते. आई तुझे किती उपकार मानू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आई नसेल तर मुलं पोरकी होतात पण खूप कमी लोकांना माहीत असेल अशा पोरक्या झालेल्या बाळांवरही आई सुक्ष्म स्वरूपात कृपेची बरसात करतच असते.
आई तू मला जन्म दिलास पण त्याचवेळी तुझाही दुसरा जन्म झाला. तुझ्या या उपकारांचे पांग कसे आणि कधी फेडू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Mahila din marathi).
आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.
मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या अनंत मातांना माझा शाष्टांग नमस्कार… जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा
तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई
माझ्यावर तुझे प्रेम अनंत, तुझ्या प्रेमाला नाही सीमा, तुझ्या कतृत्व आणि मातृत्वाला कुठलीच नाही सीमा. आई महिला दिनाच्या शुभेच्छा
अधिक वाचा –
#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट
महिलांविषयी आदर हा कायमस्वरुपी असायला हवा – वैदेही परशुरामी
जाहिराती ज्यांनी दाखवून समाजाला दाखवून दिले महिलांचे अनोखे रुप