महिला सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसणार नाहीत. महिला आणि पुरुष हा भेद कमी झाला असला, तरी समाजात आजही काही ठिकाणी महिलांना थोडी वेगळी वागणूक दिली जाते. महिला म्हटले की, त्या नाजूक आणि त्यांना काहीच जमणार नाही, असे आजही समजत जात असले. तरी याच समाजात राहून महिलांनी त्यांची एक ओळख निर्माण केली आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांना आभार संदेश पाठवावे. या दिवशी महिला दिनाचे संदेश पाठवून तुम्ही त्यांचा सन्मान करत. असा पण महिलांचा हा आदर त्या दिवसापुरता असता कामा नये. समाजातील प्रत्येक महिलेने स्वत:चे महत्व ओळखत सक्षमीकरणाचा मार्ग स्विकारायला हवा आणि इतर महिला भगिनींनाही सक्षमीकरणासाठी तयार करायला हवेत. आज आम्ही अशीच काही स्त्री घोषवाक्य शोधून काढली आहेत. जी महिला सक्षमीकरणासाठी उत्तम आहेत ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
महिला सक्षमीकरण घोषवाक्ये | Women Empowerment Slogans In Marathi
महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. त्या करत असलेल्या कामात त्यांना थोडी प्रेरणा दिली की त्यांनाही त्यातून प्रेरणा मिळते. त्यासाठीच ही महिला सक्षमीकरण घोषवाक्य (Women Empowerment Slogans In Marathi).
- स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान
- नारी आता अबला नाही, कारण अजून आमचा संघर्ष काही संपला नाही
- जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही
- नारीत आहे शक्ती भारी, तुम्ही तिला का समजता बिचारी
- ती वस्तू नाही भोगाची तर देवता आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची
- करु नका कधीही महिलांचे शोषण, नाहीतर देशाचे होईल कुपोषण
- मुलींना द्या शिक्षणाचा अधिकार, करेल तुमच्या पिढ्यांचा उद्धार
- स्त्रियांना समजू नका बेकार, कारण त्याच आहे जीवनाचा आधार
- नारी घे तू उंच भरारी, फिरुन पाहू नकोस तू माघारी
- स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी
शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी - महिलांना द्या सन्मान, देश बनेल नक्कीच महान
- सशक्त नारी घडवते सशक्त समाज
- द्या शिक्षणाला गती, व्हा फुले सावित्री
- होईल स्त्रियांची प्रगती तरच होईल जगाची प्रगती
- द्याल स्त्रियांना मान- सन्मान, मिळेल तुम्हाला प्रेमाचा मान
- स्त्री ही ईश्वराने तयार केलेली महान शक्ती आहे, जिचा मान सगळ्यांनी करायला हवा
- स्त्रियांना मान असेल देशाचा अभिमान
- महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, करु नका त्यांच्याबद्दल वाईट विचार
- कोणत्याही क्षेत्रात नाही त्या मागे, मग का दाबता त्याचे गळे
- अजिबात समजू नकोस तू स्वत:ला साधीसुधी
कारण तूच आहेस देशाची खरी प्रगती|
महिला सक्षमीकरण कोट्स (Women Empowerment Quotes In Marathi)
काही विचार असे असतात ज्यामुळे करत असलेल्या कामात महिलांना प्रेरणा मिळू शकते. अशावेळी तुम्ही पाठवा हे महिला सक्षमीकरण कोट्स (Women Empowerment Quotes In Marathi).
- उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.
- सुटला झुळझुळ वास दरवळला सुगंध, स्त्री शिक्षण हाच खरा आनंद
- विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तरी साजरा कर तुझा दिवस तू - ती आहे म्हणून सारे विश्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहे
आणि केवळ ती आहे म्हणून सगळीकडे प्रेम आहे - स्त्री एक व्याख्या कधीही कोणाला न समजणारी
कधीही कोणास न उमगलेली
आणि कधीही कुणास न जाणवलेली - स्त्रीच्या विचारांना चालना द्याल
तर नेहमीच प्रगती पथावर राहाल - महिलांना त्यांच्या पायावर उभे केले तर
देशाचा कोणताही प्रश्न ती सोडवू शकेल - महिला आहेत देशाचा सगळ्यात मोठा पाया
त्यांच्याचमुळे शक्य झाल्या इतक्या यशस्वी मोहीमा - शिवाजी महाराजांच्या यशामागे होती त्यांची जिजाऊ
आता सगळ्या जिजाऊंना गरज आहे शिवाजी सारख्या विचारांची
जो देईल तिची साथ आणि प्रगती करण्याची एक संधी - तू सूर्य, तू चंद्र… तूच आहेस जगातील सगळ्यात महत्वाची गोष्ट
- स्त्रियांना द्याल योग्य मान,
तिचा करुन सन्मान ती करेल उद्धाराचे काम - सोडून द्या वाईट चालीरीती,
महिलांना द्या शिक्षणाची गती - ए स्त्री तू नको समजूस स्वत:ला कमजोर..
कारण तुझ्याचमुळे आहे सगळे काटेकोर - स्त्री आहे एक आदिशक्ती, जी करु शकते. सगळ्या गोष्टी शक्य
- एक स्त्री शिकवाल तर
पुढीला सगळ्या पिढ्या होतील
सुशिक्षित आणि यशस्वी - स्त्रिया आहेत वर्तमानाचा आधार आणि भविष्याची गरज
- स्त्री म्हणून जन्म तुझा…
आहे आमच्यासाठी अभिमान…
प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुला मिळू दे यश - घडविण्यास राष्ट्राचा विकास,
मुलींच्या शिक्षणांचा हवा ध्यास - महिलांना समजण्यास केली चुकी,
तर मिळणार नाही जन्मभराचा आधार - स्त्रियांना द्या प्रत्येक पाऊली साथ
त्यामुळे होईल सगळ्यांचीच प्रगती हमखास
महिला दिनानिमित्त काय गिफ्ट्स देता येतील तुमच्या आयुष्यातील स्पेशल ‘महिलांना’
महिला सक्षमीकरण चारोळ्या (Women Empowerment Marathi Charloya)
चारोळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला महिलांना संदेश द्यायला असेल तर तुम्हाला या चारोळ्याही (Women Empowerment Marathi Charloya) पाठवता येतील. जागतिक महिला दिन माहिती देखील तुम्हाला जाणून घ्यायला हवी
- भंगणाऱ्या स्वप्नांची तू एकमात्र आस
तू प्रेरणा, तू करुणा, तूच आहेस विश्वास
प्रत्येक नव- जीवनाचा तर आधारही तूच
प्रत्येक दिवसासाठी खास आहेस तू - तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे - स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात
स्त्री म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कर्तृत्वाला सगळ्यांचा सलाम - तू सुंदरी, सौदामिनी
विश्वाची स्वामिनी
स्वकर्तृत्वे घालसी
तू आकाशाला गवसणी| - झाला तुझा जन्म, म्हणून आलो आम्ही पृथ्वीतलावरी
कोणाच्या जाचाने नाही होणार तू कमजोर..
आलेल्या परिस्थितीला करुन दोन हात
होशील तू अधिक समर्थ - कोणं म्हणत मी एकटी आहे
माझ्यासोबत एक संपूर्ण स्त्री आहे
जी सगळ्या अडथळ्यांना पार करण्यास समर्थ आहे - स्त्रियांचा केलात सन्मान
तर ती देईल प्रेम
तिच्या अवमानाने ओढावून घ्याल
दु:खाचे डोंगर - ताई, आई अशी विविध रुपं तुझी
लिलया पार पाडतेस
इतके सगळे करुन तू जगात सर्वश्रेष्ठ ठरतेस - मुक्त तू, स्वतंत्र तू
सक्षम तू, स्वयंसिद्ध तू - आई, बायको, मुलगी आहे जीवनाचा आधार
त्यांच्याचमुळे आहे जीवनाला आधार
करु नका त्यांना दूर - स्त्री आहे जीवनाचा आधार,द्या तिला योग्य मान आणि सन्मान
- वेगवेगळ्या भूमिका निभावताना
अस्तित्व तुझे तू सोडू नकोस
उंच भराऱ्या मारणे तू सोडू नकोस - स्त्री निभावते अनेक भूमिका…
तरी करत नाही कसली अपेक्षा
एकदा राहा पाठिशी उभे तिच्या
तुम्हाला ती देईल फक्त प्रेम आणि माया - प्रेमाचे रुप, मायेची छाया.. स्त्री म्हणजे एक शुद्ध प्रेमाचा मायाळू झरा
दुखवू नका मन तिचे..नाहीतर झरा घेईल रुप धबधब्याचे - लक्ष्मी, सरस्वती, चामुंडा, चंडीच…
रुपं तिची अनेक
प्रेम, माया, राग, लोभ सगळ्याचा आहे ती सुंदर संगम - ऐ स्त्री… तू घाबरु नकोस
काट्या कुट्यातून वाट काढून तू यशस्वी हो - आभार मान देवाचे…आलीस तू स्त्री म्हणूनी
आदर्श ठेवूनी जाशील
ताठ मानेने जग तू तुझे आयुष्य
प्रत्येक ठिकाणी हो यशस्वी - यशाची शिखरे गाठत
स्वप्न तुझी पुरी होऊ दे
तुझ्या आयुष्यात रोज नवे रंग येऊ दे - स्त्री जन्म मिळणे आहे फारच भाग्याचे
तिच्यातच सामावले आहे यश साऱ्या जगाचे - काळ बदलला, तुही बदललीस
चुलं-मूल अशी चाकोरीबद्ध दिशा सोडून प्रगती पथावर निघालीस
कन्या दिन साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi)
शिक्षणाचा अधिकार असणारी महिला घोषवाक्य (Right To Education For Women Slogans In Marathi)
शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे. स्त्री शिक्षणाचे महत्व सांगणारी ही घोषवाक्यही (Right To Education For Women Slogans In Marathi) तुम्हाला पाठवायला काहीच हरकत नाही.
- सुख, समृद्धीचा झरा… स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्गच खरा
- अरे शिक्षण, शिक्षण.. आधी हाती घेऊ लेखन…तेव्हा होईल खरा सुखी संसार सुरु
- मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण
- नर असो वा नारी, चढा शिक्षणाची पायरी
- शिक्षण हाच आहे जीवनाचा खरा अर्थ, त्याशिवाय जीवन आहे व्यर्थ
- मुलासारखे मुलीला शिक्षीत करु, दोघांमधला भेदभाव दूर सारु
- जागर शिक्षणाचा, स्त्रिच्या विकासाचा
- विचार करा पाऊल उचला आणि स्त्री शिक्षणाचे शस्त्र द्या मुलीला
- माता होईल शिक्षित, तर देश राहील सुरक्षित
- स्त्री शिक्षणाची धरा कास, देशाचा होईल विकास
- शिक्षणाचा आहे सगळ्यांना अधिकार, महिलांनाही द्या त्यांचा हा अधिकार
- मुलगी शिकली, प्रगती झाली
- मुलींना द्याल शिकू, तर उजळून निघेल विश्व जणू
- स्त्री शिक्षणाची आहे समाजाला गरज, काळाला आहे महिलांची गरज
- तिला शिकवा आणि विकासाची उंच शिखरे सर करा
- मुलींचा जन्म हा लक्ष्मी, सरस्वतीच्या जन्मासारखा आहे, व्यर्थ जाऊ देऊ नका
- मुलगा मुलगी एक समान, द्यावे त्यांना शिक्षण छान
- मुलींच्या हाती द्याल पाटी- पेन, तीच घडवेल संसार सारा
- आता होऊया दक्ष, स्त्री शिक्षण हेच आपले लक्ष्य
- शिक्षणाच्या दानाने सोडवला बंधनाचा फास, स्त्री घेत आहेत आता मोकळा श्वास
महिला सक्षमीकरण हे सोपे नाही. एखाद्या खचलेल्या महिलेला ही स्त्री घोषवाक्य (Right To Education For Women Slogans In Marathi) पाठवा सक्षमीकरणासाठी प्रेरणा द्या.