ADVERTISEMENT
home / Planning
लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

 लग्न हा मुलींच्या आयुष्यातील असा सोहळा आहे. ज्या दिवशी प्रत्येकीला परफेक्ट आणि सुंदर दिसायचे असते. या नव्या वर्षात तुम्हीही लग्न करणार असाल तर काही गोष्टींची तयारी करायला नक्कीच घेतली असेल. घरात लग्न म्हटलं की, त्या दिवसापासूनच तयारीला सुरुवात होते. पाहुण्यांची यादी, साड्यांची खरेदी, बुकिंग, जेवणं अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत गडबड ही सुरुच असते. अशात थकवा येणं, झोप पूर्ण न होणं, घरात पाहुण्यांची गर्दी असल्यामुळे प्रायव्हसी न मिळणं असा बऱ्याच गोष्टी अनावधानाने होत राहतात. पाहुण्यांची उठबस करताना अनेकदा आरोग्याकडे मात्र अनेक नववधूंचे दुर्लक्ष होते आणि मग महत्वाच्या दिवशीच नेमके मरगळल्यासारखे वाटते. साधारण महिनाभरावर जरी तुमचं लग्न आलं असेल तर काही हेल्थ टिप्स तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण त्याचा फायदा तुम्हाला चांगलाच होतो. चला जाणून घेऊया या हेल्थ टिप्स

मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

फळांचा करा समावेश

फळांचा करा समावेश

Giphy

ADVERTISEMENT

कितीही गडबड असली तरी प्रत्येक दिवशी दोन फळ खायला मुळीच विसरु नका. जर तुम्ही फळ रोजच्या रोज खाल्ली तर तुमच्या पोटाचा कोटा साफ राहील . फळांमुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. त्यामुळे तुम्ही फिरण्यासाठी सक्षम होता. शरीर सुदृढ राहावे यासाठीच ‘Eat Apple A Day Keep Doctor Away’ असे म्हणतात ते उगाचच नाही. फळांच्या सेवनाचे फायदे लक्षात घेत उत्तम आरोग्य आणि उत्तम त्वचा यासाठी फळांचे सेवन अगदी रोजच्या रोज करा. 

उदा. फळ तुम्ही कोणतंही खा चालेल. अगदी केळं हे फळ सुद्धा तुमच्या शरीरासाठी तितकचं फायदेशीर आहे. 

10 मिनिटं तरी करा व्यायाम

चाला

Giphy

ADVERTISEMENT

लग्नाच्या गडबडीत सगळ्यांनाच जीमला जाण्याचा वेळ मिळेल असे मुळीच सांगता येत नाही. कारण बरेचदा कामाचा सगळा व्याप हा मुलीच्याच अंगावर असतो आणि सध्याच्या काळात नववधूच तिला आवश्यक असलेल्या वस्तू अगदी योग्य निवडू शकते. त्यामुळे तिच्यावर भार हा अगदी साहजिक आहे. पण असे असले तरी झोपण्याच्या आधी किंवा झोपेतून उठल्यावर स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, शीर्षासन असे काही व्यायाम प्रकार आवर्जून करा. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता आणि फिटही राहता.

तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी (Preparation For The Bride In Marathi)

जागरण टाळा

जागरण टाळा

Giphy

ADVERTISEMENT

आता ही गोष्ट अनेकांना टाळता येत नाही. लग्नाची तारीख जशी जवळ येते. तशी अनेकांना झोप लागत नाही. त्यांना सतत काहीतरी राहिले असेच वाटत राहते. सगळा कार्यक्रम नीट पार पडेल ना या भीतीत अनेकांची झोप उडालेली असते. पण रात्री किमान 10 ला तरी पाठ टेकवा. काही काळासाठी तुम्हाला झोप लागणार नाही.पण जर तुम्ही दिवसभर फार पळापळ केली असेल तर तुम्हाला झोप येणारच. त्यामुळे जागरण टाळा. जे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी मुळीच चांगले नाही. 

अंगावर काढू नका

अंगावर काढू नका

Giphy

धावपळ, टेन्शन  या सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो. अनेकदा या काळातील धावपळ काही मुलींना अगदीच बारीक करुन टाकते. तर काहींचे वजन वाढत राहते.   काहींना सौम्यशी अंगदुखी, पोटदुखी. पिरेड्सचे मागे – पुढे होणे असे काही ना काही सुरुच असते. पण अनेकदा या गोष्टी क्षुल्लक आहे असे समजून याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी नेमके लग्नाच्या दिवशीच या सगळ्यागोष्टी आधीच जाणवू लागतात. त्यामुळे लग्नाच्या आधीच योग्य डॉक्टरांना भेटून त्यांचा योग्य सल्ला घेणे हे नेहमीच चांगले.  डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने तुम्हाला नको त्या आजारांपासून वाचता येईल. 

ADVERTISEMENT

बाहेरचे पदार्थ टाळा

बाहेरचे पदार्थ टाळा

Giphy

आता शॉपिंग किंवा पत्रिका वाटपाच्या कार्यक्रमाला बाहेर पडल्यानंतर बाहेर खाणे आलेच. पण शक्यतो नववधूने आणि त्यांच्या कुटुंबियांनी बाहेर खाणं टाळलेलंच बरं. जर तुम्हाला घरचे काही पदार्थ नेता आले तर फार उत्तम. कारण असे पदार्थसोबत नेल्यामुळे तुम्हाला फुड पॉईझन किंवा त्रास होण्याची शक्यता फार धुसर असते आणि जर घरचे पदार्थ सोबत नेणे शक्य नसतील तरी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. बाहेर खातानाही तिखट- चपटीत पदार्थ टाळा. म्हणजे तुम्हाला त्याचाही त्रास होणार नाही. साधी डाळ खिचडी आणि ताक यामुळेही तुमच्या पोटाला आधार मिळेल. 


आता या काही हेल्थ टिप्स वाचल्यानंतर लगेचच करायचा घ्या. लग्नाच्या दिवशी तुम्ही सुंदर दिसाल ही आमची गॅरंटी. टॅग करा तुमच्या मैत्रिणीला जिचे लग्न ठरले आहे. कारण तिला या हेल्थ टिप्सची फारच गरज आहे. 

ADVERTISEMENT

नववधूच्या बॅगेत ‘या’ गोष्टी असायलाच हव्या (Ideas For Wedding Gift Bag In Marathi)

 

 

 

ADVERTISEMENT
01 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT