ADVERTISEMENT
home / Recipes
healthy snacks you can enjoy with your evening tea

संध्याकाळच्या चहासोबत बनवा ‘हे’ मस्त हेल्दी स्नॅक्सचे प्रकार

दिवसभर काम केल्यामुळे आलेला थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी एक मस्त फक्कड चहा प्यावं असं कोणाला नाही वाटणार… चहाप्रेमींसाठी तर ही एक संधीच असते. पण या चहासोबत काही तरी चटकदार खावं असं तर नक्कीच वाटत असतं. पण संध्याकाळी काही चमचमीत खाल्लं तर रात्री जेवणानंतर पोट जड होतं. त्याचप्रमाणे फिटनेसचा विचार करता संध्याकाळी स्नॅक्स खावं की नाही असा विचार अनेक जण करत बसतात. ज्यामुळे चहासोबत चटकदार स्नॅक्सची मजा घेता येत नाही. पण जर तुम्ही असे पदार्थ खाल्ले जे चविष्ट असतीलच पण पौष्टिकही असतील तर तुम्हाला चिंता करण्याचं काहिच कारण नाही. आम्ही यासाठीच तुमच्यासोबत शेअर करत आहोत असे पदार्थ ज्यामुळे तुमच्या वजनावर फार फरक पडणार नाही.

संध्याकाळसाठी चविष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स

संध्याकाळी अथवा चहासोबत तुम्ही हे पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. कारण यामुळे जिभेला चव येईलच पण शरीराचे पोषणही होईल.

मुगडाळीची भेळ

भेळीसारखा चटकदार पदार्थ संध्याकाळी चहासोबत असेल तर त्याहून आणखी छान काय असेल बरं… हो पण ही भेळ बनवताना थोडी काळजी घ्यायची आहे. म्हणजेच भेळीसाठी वापरण्यात येणारे पदार्थ चवीसोबत शरीरासाठी योग्य असायला हवे. म्हणूनच कुरमुऱ्यामंध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, शेव, भाजलेले शेंगदाणे, काकडी, चाट मसाला, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ टाकाच पण पौष्टिक मुगडाळ आणि डाळिंबाचे दाणेही वापरा. यासाठी मुगडाळ काही तास भिजत ठेवा आणि उकडवून ती मस्त तव्यावर भाजून घ्या. ज्यामुळे ती कुरकुरीत आणि चविष्ट लागेल.

रोस्टेड मखाणा 

निरोगी आणि फिट राहायचं असेल तर मखाणा तुमच्या आहारात असायलाच हवा. कारण मखाणा चवीला छान लागतोच पण त्यामध्ये पुरेसे फायबर्स असल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. मधल्या वेळेत मखाणा खाण्यामुळे तुमची भूकही भागली जाते. यासाठी मस्त मखाणा, ऑलिव्ह ऑईल, लाल तिखट, मीठ, काळीमिरी पावडर, जिरा पावडर एकत्र करा आणि तव्यावर मखाणा रोस्ट करा. जाणून घ्या मखाना खाण्याचे फायदे (Makhana Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

नाचणीची बिस्किटे 

चहासोबत खारी, बिस्किट, टोस्ट, बटर असे पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती वेळीच रोखता यायला हवी. कारण हे पदार्थ मैद्यापासून बनवलेले असतात. ज्यामुळ तुमचे वजन तर वाढतेच शिवाय अपचनाच्या समस्या निर्माण होतात. मात्र जर तुम्ही या बिस्किटांऐवजी नाचणीपासून तयार केलेली बिस्किटे खाणार असाल तर तुम्हाला चिंता काळजी करण्याची गरज नाही. कारण यातून तुम्हाला भरपूर कॅल्शिअम, फायबर्स आणि अनेक पोषक तत्त्वं मिळतील. यासाठी खास नाचणी सत्व आणि नाचणी रेसिपीज (Nachni Satva Recipe In Marathi)

ओट्स उतप्पा

चहासोबत ओट्सचा उत्तपा खाण्यामुळे तुमची भूक भागेलच शिवाय आरोग्यही सुधारेल. कारण ओट्समध्ये भरपूर फायबर्स आणि पोषक घटक असतात. उतप्पा खाऊनही तुमचे वजन वाढत नाही. यासाठी फक्त काही मिनीटे ओट ताकात भिजवा. त्यात तुमच्या आवडीनुसार कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून टाका आणि गरम तव्यावर मस्त उत्तप्पा तयार करा. पण त्याआधी जाणून घ्या ओट्स खाण्याचे फायदे (Oats Benefits In Marathi)

थमंग थालीपीठ

थालीपीठ हा असा एक पदार्थ आहे जो चवीला तर मस्त असतोच शिवाय आरोग्यासाठीही योग्य असतो. म्हणूनच आई आपल्याला लहानपणापासून खमंग भाजणी थालीपीठ खाऊ घातले. पण काळाच्या ओघात सध्या थालीपीठ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजारात विकत मिळणारे, तेलकट, फॅट वाढवणारे पदार्थ खाण्यापेक्षा संध्याकाळी चहासोबत मस्त तुमच्या आवडीचं थालीपीठ खा. आधीच भाजणी तयार असेल तर थालीपीठ करायला मुळीच वेळ लागत नाही. 

23 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT