माणसाने केसांची काळजी घेणे अगदी सामान्य आहे. केस काळेभोर आणि सुंदर दिसण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. आयुर्वेदिक औषध केस काळे करण्यासाठी शोधतो, जेणेकरून दुष्परिणाम होण्याची रिस्क नसते. सलून मध्ये जातो सर्व काही करतो. हिवाळ्यातील कोरडे वातावरण तुमच्या त्वचा आणि केसांचे खूप नुकसान करते. कारण या काळात त्वचा कोरडी झाल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ज्याचा परिणाम केस कोरडे आणि रूक्ष दिसू लागतात. अशा वेळी हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी खास हेअर मास्क लावण्याची गरज आहे. होममेड मास्कने हेअर स्पा केल्यास केसांचे योग्य पोषण होते आणि केस मऊ मजबूत होतात.
नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल
केसांसाठी नेहमीच नारळाचे तेल हे उत्तम ठरते. कारण नारळाच्या तेलामध्ये केस आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करणारे गुणधर्म असतात. नारळाच्या तेलासोबत ऑलिव्ह ऑईल केसांना लावण्यामुळे केस मऊ तरल होतातच शिवाय केसांचे गळणेही कमी होते.
कसा कराल वापर –
एका वाटीमध्ये चार मोठे चमचे नारळाचे तेल आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. दोन्ही तेल एकत्र मिक्स करा आणि केसांच्या मुळांना हळूवारपणे लाा. वीस मिनीटे केसांना मसाज करा आणि स्टीम देण्यासाठी गरम टॉवेल गुंडाळा. दोन्ही तेल केसात मुरल्यामुळे केसांचे चांगले पोषण होते.
निरोगी केसांसाठी करा घरगुती हेअर मास्कचा उपयोग
अॅव्होकॅडो आणि केळं
अॅव्होकॅडो आणि केळ्यामध्ये केसांचे चांगले पोषण करणारे घटक असतात. यासाठीच हिवाळ्यात केसांवर हा मास्क लावणे नक्कीच फायद्याचे ठरेल.
कसा कराल वापर –
केस व्यवस्थित सोडवू घ्या. एक अॅव्होकॅडो आणि एक केळं ऑलिव्ह ऑईल मिसळून एकत्र करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. वीस मिनीटे हेअर मास्क केसांमध्ये राहू द्या त्यानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ करा.
हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस
कोरफडाचा गर
कोरफडामध्ये त्वचेच्या अनेक समस्या दूर करणारे आणि त्वचेला मऊपणा देणारे घटक असतात.
कसा कराल वापर –
दोन चमचे कोरफडाचा गर आणि नारळाचे तेल एकत्र करा. यामध्ये तुम्ही कोणतेही हेअर ऑईल मिसळू शकता. हा मास्क तुमच्या केसांच्या मुळांना लावा आणि वीस मिनीटांनी केस स्वच्छ करा. ज्यामुळे केस स्वच्छ तर होतीलच शिवाय केसांचे योग्य पोषण झाल्यामुळे मऊ आणि मजबूत होतील.
केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उत्तम आहे अंड्याचा हेअर मास्क (Egg Hair Mask In Marathi)