केस सुंदर दिसावेत यासाठी हेअर वॉश, स्पा, कंडिशनिंग आणि केसांसाठी आवश्यक असा बऱ्याच ट्रिटमेंट्स आपण करतो. केसांवर काहीही करताना आपल्यालाच नाही तर हेअर एक्सपर्टना देखील बराच विचार करावा लागतो. केसांवर काहीही करायला गेल्यानंतर तुम्हाला ते नक्की काही प्रश्न विचारतात.त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला वर्जिन हेअर (virgin Hair) असा एक प्रश्न विचारला जातो. तुमचे केस वर्जिन आहेत का? असा प्रश्न विचारत असतील तर असा प्रश्न का विचारला जातो आणि अशा केसांनी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आता आपण जाणून घेऊया.
वर्जिन हेअर म्हणजे काय?
ज्या केसांवर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. जे केस तुमचे मुळात किंवा जन्मत: जसे असतात त्यांना वर्जिन हेअर म्हटले जाते. केसांवर निरनिराळ्या प्रक्रिया केल्या जातात. स्ट्रेटनिंग, टाँग, स्मुथिंग,क्युओडी अशा काही हेअरस्टाईल किंवा हेअर ट्रिटमेंट करताना तुमच्या केसांवर क्रिम्स, सोल्युशन किंवा प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तुमचे मूळ केस कसे होते याचा अंदाज येत नाही. तुम्ही एखाद्या सलोनमध्ये हेअर कलर, हेअर ट्रिटमेंट किंवा केस कापायला गेल्यानंतर तुम्हाला तुमचे केस वर्जिन आहेत की नाही हे विचारण्यात येते. त्यानंतरच एक्सपर्ट तुम्हाला हेअर ट्रिटमेंट करण्याचा सल्ला देतात.
वर्जिन हेअर असणाऱ्यांनी घ्यावी ही काळजी
जर तुमच्या केसांवर कोणतीही प्रक्रिया केलेली नसेल तर तुमच्या केसांवर काहीही करताना तुम्ही थोडासा विचार करायला हवा. हीच गोष्ट तुम्ही केसांवर काहीही केले असेल तरीदेखील लागू पडते
- केसांना रंग करताना तुम्हाला हेअर एक्सपर्ट विचारतात. कारण जर तुम्ही केसांना या आधी रंग केला असेल तर तुम्हाला आधी हा प्रश्न विचारतात. अशा केसांवर पुन्हा रंग करताना तुम्हाला अपेक्षित असलेला रंग कदाचित मिळू शकत नाही
- एखादा हेअर कट करताना जर तुम्ही केसांचे स्ट्रेटनिंग किंवा टाँग केले असेल तर एखादा हेअर कट करताना तुम्हाला त्याची देखभाल करणे कठीण जाऊ शकते. खूप हेअर कट करताना केस कसे आहेत म्हणजे वेव्ही, कर्ल की सूपर स्ट्रेट याच्यावर हेअरकटचा लुक अवलंबून असतो. तुमच्या केसांवर काही केले असेल तर केसांच्या वाढीनंतर त्यामध्ये बराच फरक पडू शकतो. त्यामुळे केस कापताना असे प्रश्न विचारतात
- खूप जणांना केसांचा लुक बदलायला आवडत नाही. जर त्यांचे केस सरळ केलेले असतील तर तोच लुक तसाच मिळावा यासाठी ते केसांची सतत काळजी घेतात. तुमच्या हेअरएक्सपर्टला या गोष्टी माहीत असल्या तरी देखील नव्या माणसाला केसांवर काहीही करताना त्याची मात्रा, प्रमाण किती असावे हे माहीत असायला हवे. यासाठी केस वर्जिन आहे का नाही विचारले जाते.
- खूप जणांच्या केसांवर आधीच प्रयोग केलेला असेल आणि जर त्यावर जास्त प्रमाणात असलेली केमिकल्स वापरली गेली तरी देखील केस गळण्याचा, केस तुटण्याचा त्रास होऊ शकतो.
आता केसांवर कोणताही प्रयोग करण्याआधी तुम्ही केस वर्जिन आहेत की नाही त्याची योग्य माहिती एक्सपर्टला द्या.
आवळा शॅम्पूच्या वापराने होतील केस सुंदर (Best Amla Shampoo For Hair In Marathi)