लांबसडक आणि काळेभोर केस हे सगळ्यांनाच आवडतात. पण काहीवेळा केस छान वाढलेले असतानाही अचानक तुटू लागतात. केस दुंभगणे हे वेगळे पण केसांचे तुटणे हे अधिक चटका लावून जाते. कारण केस तुटल्यानंतर ते डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. केस का तुटतात असा विचार करत असाल तर तुमच्या काही रोजच्याच सवयी त्यासाठी कारणीभूत ठरतात. केसांची काळजी घेताना कधी कधी काही गोष्टींचा आपण तितकासा विचार करत नाही. अगदी क्षुल्लक कारणांमुळे मग केस तुटण्याचा त्रास हा आपल्याला होऊ लागतो. तुमचेही केस गळत नाहीत पण तुटत असतील तर तुम्ही या चुका नक्कीच करत आहात
शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस
केसांना निवडलेला क्लचर
खूप वेळा काहीतरी केसांना थोडा फॅन्सी लुक देण्याच्या नादात आपण अनेकदा असे काही क्लचर निवडतो की, अशा क्लचरमध्ये केस अडकू लागतात. एखादा केस तुटल्यानंतर आपल्याला एवढे काही जाणवत नाही. पण जर सतत क्लचर लावल्यामुळे आणि काढल्यामुळे केस त्य क्लिपमध्ये अडकत राहतात.तुम्ही केसांसाठी निवडलेला क्लचर हा योग्य आहे की नाही ते निवडा कारण तुम्ही तसे केले तरच तुमचे केस तुटणार नाही आणि चांगले राहण्यास मदत मिळेल.
केस घट्ट बांधणे
खूप जणांना केस घट्ट बांधण्याची सवय असते. जर तुम्ही केस सतत घट्ट बांधत असाल तर केसांवर त्याचा ताण पडतो अशामुळे केस तुटण्याची शक्यता असते. जर तुम्ही तेल लावून केसांची वेणी बांधत असाल किंवा हाय पोनीटेल घालत असाल तर त्यामुळेही तुमचे केस तुटू शकतात. अशा पद्धतीने केस बांधले तर केसांची हेअरलाईन मागे जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही केस अजिबात घट्ट बांधू नका.
केसांची वाढ होईल दुपटीने, घरीच बनवा कडीपत्ता तेल
केस झटकणे
केस झटकण्याची सवय ही कधीही चुकीची. केस धुतल्यानंतर जर तुम्ही ते झटकत असाल तर त्यामुळेही केस डॅमेज होतात. जर तुम्ही चुकूनही केसांच्या बाबतीत असे काही करत असाल तर केस झटकणे टाळा.केस झटकल्यामुळे केस तुटू शकतात. ओले केस हे डॅमेज होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केस अजिबात झटकू नका. धुतल्यानंतर म्हणजे केस ओले असताना किंवा केस वाळल्यानंतरही तुम्ही केस झटकू नका.
कॅप किंवा टोपी घातल्यानंतर
केसांचे संरक्षण करणयासाठी तुम्ही कॅप किंवा टोपी घालत असाल तरी देखील तुमचे केस तुटण्याची शक्यता असतो. त्यामुळे शक्यतो केसांना टोपी किंवा कॅप घालण्यापेक्षा तुम्ही स्कार्फ बांधा. स्कार्फ बांधल्यामुळे तुमचे केस चांगलेही राहतात. केस तुटण्याची शक्यता ही कमी होते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी ही एक सवयही लावून घ्या
आता तुमचेही केस तुटत असतील तर तुम्ही केसांची नक्की अशापद्धतीने काळजी घ्या.
उन्हाळ्यात त्वचेवरील केस काढणे पडू शकते महागात