ADVERTISEMENT
home / Family
कुटुंबासोबत जोडीदाराची भेट करून देण्यापूर्वी अशी करा पूर्वतयारी

कुटुंबासोबत जोडीदाराची भेट करून देण्यापूर्वी अशी करा पूर्वतयारी

लग्नाआधी प्रियकर अथवा प्रेयसीची भेट आईवडिलांसोबत करणं म्हणजे एक मोठी परीक्षाच असते. कारण तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे ही गोष्ट तुमच्याी आईवडिलांना मान्य असेलच असं नाही. पण जेव्हा अशी वेळ आयुष्यात येते तेव्हा आईवडिलांचा मानसन्मान आणि तुमचे प्रेम दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की, आईवडिलांनी त्यांचे प्रेम समजून घ्यावे. मात्र कधी कधी कधी आईवडील ही त्यांच्या बाजूने बरोबर असतात. अशा वेळी तुमच्या मनाप्रमाणे घडण्यासाठी थोडी पूर्वतयारी तुम्हाला नक्कीच करायला हवी.

कसं कराल प्लॅनिंग

पहिल्यांदा तुमच्या जोडीदाराला आईवडिलांसमोर घरी नेताना काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी. कारण तरंच तुम्हाला हवा तसा परिणाम झटपट मिळेल.

पेहराव –

पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला घरी नेता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा स्वभाव आणि आवड नक्कीच माहीत असतो. तुमच्या पार्टनरमध्ये तुम्ही कोणते गुण पाहिले हेही तुम्हाला माहीत असतं. म्हणूनच आईवडील आणि पार्टनरची पहिली भेट खास होण्यासाठी या गोष्टीची घ्या काळजी घ्या. पहिल्या भेटीत माणसाचा पेहराव सर्वात आधी नजरेस पडतो. त्यामुळे जर या भेटीत त्याने अथवा तिने आईवडीलांना आवडेल असा पेहराव केला तर तुमचं पुढचं काम अधिक सोपं होईल. यासाठी पार्टनरला अशा वेळी असा पेहराव करायला सांगा ज्यामुळे ते तुमच्या आईवडिलांना सहज इम्प्रेस करतील.

जोडीदारासोबत नातं मजबूत असल्याचे संकेत (Sign Of A Healthy Relationship)

ADVERTISEMENT

नम्र स्वभाव

जी माणसं नम्रपणे आणि शांततेत बोलतात ती सर्वांना पटकन आवडतात. त्यामुळे तुमच्या पार्टनरचा मूळ स्वभाव कसाही असू दे पण पहिल्यांदा आईवडिलांना भेटल्यावर त्यांना नम्रपणे उत्तर द्यायला सांगा. कारण जरी तुमच्या पार्टनरला आईवडिलांचे काही प्रश्न नाही आवडले तरी पहिल्या भेटीतील त्यांचा नम्रपणा एक चांगली इमेज नक्कीच बनवू शकतो.  

आदरभाव

जर तुमचा होणारा जोडीदार अथवा होणारी जोडीदार तुमच्या आईवडिलांची काळजी घेणारी असेल तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या भेटीत ती अथवा तो तुमच्या आईवडिलांशी कसा अथवा कशी वागते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. यासाठी तुमच्या आईवडिलांच्या स्वभावाबद्दल आणि आवडीनिवडीबद्दल तुमच्या पार्टनरला आधीच माहिती द्या. तुमचे आईवडील काय प्रश्न विचारतील आणि त्याची काय उत्तरे अपेक्षित आहेत हे जर तुमच्या जोडीदाराला आधीच माहीत असेल तर तुमच्या नातं पक्कं व्हायला चांगली मदत होईल.

Birthday Wishes For Girlfriend In Marathi | तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

भेटवस्तू 

पहिल्यांदा घरी येताना काहीतरी गिफ्ट अथवा भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. तुमच्या घरी येताना तुमच्या आईवडिलांसाठी जोडीदाराने कोणती भेटवस्तू आणावी यासाठी तुम्ही मदत केली तर जास्त चांगला परिणाम होईल. कारण तुमच्या आईवडिलांचा स्वभाव आणि आवड तुम्हीच ओळखू शकता. त्यामुळे तुमच्या आईवडिलांना आवडेल असंच गिफ्ट त्यांच्यासाठी निवडा. कारण भेटवस्तूचे मोल पैशात नाही तर तुमच्या भावनेत गुंतलेले असते. शिवाय तुमच्या होणाऱ्या जोडीदाराने भेटवस्तू निवडताना आईवडिलांचा विचार केलाय हीच गोष्ट तुमच्या पालकांना सुखावणारी असेल. त्यामुळे तुमच्या नात्याला नक्कीच परवानगी मिळेल.

ADVERTISEMENT

Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Aai Birthday Wishes In Marathi

08 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT